Elec-widget

'मॅजिक पेन'मुळे वाळूमाफियांच्या मुजोरीला उधाण

'मॅजिक पेन'मुळे वाळूमाफियांच्या मुजोरीला उधाण

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग22 जानेवारीपरवान्यापेक्षा जास्त होड्या घेऊन वाळू उचलणारे ठेकेदार... मुदत संपूनही फसवेगिरी करुन वापरण्यात येणारे पासेस आणि या सगळ्याला कारणीभूत असणारं एक मॅजिक पेन...परिस्थिती सगळीच तशी गोंधळात टाकणारी आहे. कोकणातल्या रेतीची वाहतूक....खरं तर या वाहतुकीला परवाना फक्त एका वेळेचा आहे. तसा नियमही आहे. पण एकाच पासवर सर्रास कित्येकवेळा रेतीवाहतूक केली जातेय आणि त्यासाठी वाळू व्यापारी लढवतायत ही अशी शक्कल एक मॅजिक पेनमुळे.या पेनने पासवर लिहिलेली तारीख लायटर वापरून कोणतीही खाडाखोड न करता, सहज पुसून टाकता येते. तलाठ्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्वच अधिका-यांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. महसूल विभागातल्या अधिकार्‍यांनाच हाताशी धरून कोकणातल्या वाळू व्यापार्‍यांनी सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवला. सिंधुदुर्गातल्या मोचेमाड खाडीत वाळू काढणारे व्यापारी एकाच वेळच्या परवान्यावर शेकडो वेळा वाहतूक करत आहे. शेतकरी हितवर्धक समितीचे प्रकाश रेगे म्हणतात, "हा पेन. विशिष्ठ प्रकारचं आहे. या पेनने तारीख आणि नंबर लिहितात. गेले दोन महिने असं चालू आहे.. अशी एखादी ज्वाळा लावली की ते निघून जातं. पुन्हा लिहितात. हे आम्ही जिल्हाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिलंय.एवढा गैरव्यवहार होत असून, अधिकारी तद्दन सरकारी छापाचीच उत्तरं देत आहे.मंडळ अधिकारी राजेश्वर राठोड म्हणतात, जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिलेयत की वाळू बंद ठेवा म्हणून तरीही ही वाळू वाहतूक सुरू अस्लयाचं आढळलय ..आम्ही कारवाई करू पण पेनाच्या बाबतीतही आम्ही शहानिशा करू.या बेसुमार वाळूउपशामुळे शेतकर्‍यांच्या माडबागायतींही धोक्यात आहेत फक्त 56 होड्यांना परवानगी असताना प्रत्यक्षात 150 होड्यांनी वाळू काढली जात् ा आहे.शेतकरी संजय भांजी म्हणतात, आमच्या विहिरींचं पाणी खारं झालं शेतीचं नुकसान झालं आहे. तरीही ह्यांच्यावर कारवाई करत नाहीत. आमचं पुनर्वसन तरी करा.सरकारने या प्रकाराची वेळीच दखल घेतली नाही, तर मोचेमाडच्या शेतकरी हितवर्धस समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • Share this:

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

22 जानेवारी

परवान्यापेक्षा जास्त होड्या घेऊन वाळू उचलणारे ठेकेदार... मुदत संपूनही फसवेगिरी करुन वापरण्यात येणारे पासेस आणि या सगळ्याला कारणीभूत असणारं एक मॅजिक पेन...परिस्थिती सगळीच तशी गोंधळात टाकणारी आहे. कोकणातल्या रेतीची वाहतूक....खरं तर या वाहतुकीला परवाना फक्त एका वेळेचा आहे. तसा नियमही आहे. पण एकाच पासवर सर्रास कित्येकवेळा रेतीवाहतूक केली जातेय आणि त्यासाठी वाळू व्यापारी लढवतायत ही अशी शक्कल एक मॅजिक पेनमुळे.या पेनने पासवर लिहिलेली तारीख लायटर वापरून कोणतीही खाडाखोड न करता, सहज पुसून टाकता येते. तलाठ्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्वच अधिका-यांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. महसूल विभागातल्या अधिकार्‍यांनाच हाताशी धरून कोकणातल्या वाळू व्यापार्‍यांनी सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवला. सिंधुदुर्गातल्या मोचेमाड खाडीत वाळू काढणारे व्यापारी एकाच वेळच्या परवान्यावर शेकडो वेळा वाहतूक करत आहे. शेतकरी हितवर्धक समितीचे प्रकाश रेगे म्हणतात, "हा पेन. विशिष्ठ प्रकारचं आहे. या पेनने तारीख आणि नंबर लिहितात. गेले दोन महिने असं चालू आहे.. अशी एखादी ज्वाळा लावली की ते निघून जातं. पुन्हा लिहितात. हे आम्ही जिल्हाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिलंय.एवढा गैरव्यवहार होत असून, अधिकारी तद्दन सरकारी छापाचीच उत्तरं देत आहे.मंडळ अधिकारी राजेश्वर राठोड म्हणतात, जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिलेयत की वाळू बंद ठेवा म्हणून तरीही ही वाळू वाहतूक सुरू अस्लयाचं आढळलय ..आम्ही कारवाई करू पण पेनाच्या बाबतीतही आम्ही शहानिशा करू.या बेसुमार वाळूउपशामुळे शेतकर्‍यांच्या माडबागायतींही धोक्यात आहेत फक्त 56 होड्यांना परवानगी असताना प्रत्यक्षात 150 होड्यांनी वाळू काढली जात् ा आहे.शेतकरी संजय भांजी म्हणतात, आमच्या विहिरींचं पाणी खारं झालं शेतीचं नुकसान झालं आहे. तरीही ह्यांच्यावर कारवाई करत नाहीत. आमचं पुनर्वसन तरी करा.सरकारने या प्रकाराची वेळीच दखल घेतली नाही, तर मोचेमाडच्या शेतकरी हितवर्धस समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 12:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...