समाजवादीत मोहन सिंगांचे प्रवक्तेपद काढले

समाजवादीत मोहन सिंगांचे प्रवक्तेपद काढले

05 जानेवारीउत्तर प्रदेशात फक्त भाजपच नाही तर समाजवादी पक्षालाही वादाचं ग्रहण लागलं आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन सिंग यांचं पक्ष प्रवक्ते पद काढून टाकण्यात आलं आहे. बहुजन समाज पक्षातून काढून टाकण्यात आलेले आमदार डी. पी. यादव यांना समाजवादी पक्षात घेण्याचा मोहन सिंग यांचा आग्रह होता. पण यादव यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्याला विरोध केला होता. त्यावरुन मोहन सिंग नाराज झाले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्याच विरोधात बोलायला सुरुवात केली. अखेर त्यांच्याकडून प्रवक्तेपद काढून टाकण्यात आलं.

  • Share this:

05 जानेवारी

उत्तर प्रदेशात फक्त भाजपच नाही तर समाजवादी पक्षालाही वादाचं ग्रहण लागलं आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन सिंग यांचं पक्ष प्रवक्ते पद काढून टाकण्यात आलं आहे. बहुजन समाज पक्षातून काढून टाकण्यात आलेले आमदार डी. पी. यादव यांना समाजवादी पक्षात घेण्याचा मोहन सिंग यांचा आग्रह होता. पण यादव यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्याला विरोध केला होता. त्यावरुन मोहन सिंग नाराज झाले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्याच विरोधात बोलायला सुरुवात केली. अखेर त्यांच्याकडून प्रवक्तेपद काढून टाकण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 05:35 PM IST

ताज्या बातम्या