पाकिस्तानला अडचणीत आणण्यासाठी भारताने उचललं हे महत्त्वाचं पाऊल

पाकिस्तानला अडचणीत आणण्यासाठी भारताने उचललं हे महत्त्वाचं पाऊल

भारताने पाकिस्तानचा दावा खोडून काढला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मार्च : 'पाकिस्तानने भारताविरोधात एफ-16 विमान वापरलं. त्याचप्रमाणे एमरॉन मिसाईलचाही वापर केला. याबाबतचे पुरावे आम्ही अमेरिकेला दिले आहेत,' अशी माहिती पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

'पाकिस्ताननं दावा केला होता की त्यांनी नंतर भारताची दोन विमानं पाडली. प्रत्यक्षात भारताच एकच विमान होतं आणि तेही त्यांच्या एफ-16 ला पाडताना पडलं होतं. ज्यामधे विंग कमांडर अभिनंदन होते,' असं म्हणत भारताने पाकिस्तानचा दावा खोडून काढला आहे.

परराष्ट्र खात्याच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

-पाकिस्तान केवळ म्हणतंय की आम्ही दहशतवाद्यांविरोधात कारवाई करतोय. मात्र त्यांच्या संरक्षणमंत्र्यांनीच मान्य केलं की मौलाना मसूद अझहर त्यांच्याच देशात आहे.

-पाकिस्तान दहशतवाद्याविरोधात काहीही कारवाई करत नाही.

-पाकिस्तान अजूनही हल्ल्याची जबाबदारी घेण्याचं टाळत आहे.

-संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्य देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी मसूद अजहरला दहशतवादी घोषित केलं आहे.

-बालाकोटमधील हल्ले यशस्वी झाले आहेत. आम्हाला जे साध्य करायचं होतं ते आम्ही साध्य केलं आहे. ज्यांना प्रश्न पडतायत त्यांनी हल्ल्याचे ठिकाण पाहून यावे.

VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?

First published: March 9, 2019, 11:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading