...म्हणून तिच्या लग्नात मोदींनी पत्र पाठवून दिल्या शुभेच्छा

...म्हणून तिच्या लग्नात मोदींनी पत्र पाठवून दिल्या शुभेच्छा

भोपाळमधील नव दाम्पत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या.

  • Share this:

भोपाळ, 9 मार्च : लग्नात जर परिसरातील नेता, नगरसेवक, आमदार, खासदार किंवा बहुचर्चित व्यक्ती आली तर अनेकांना खूप आनंद होतो. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण, जर देशाच्या पंतप्रधानांनी तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा खास पत्र पाठवून दिल्या तर? केवळ विचार करूनच मनाला आनंद मिळतो नाही का? पण, हाच अनुभव भोपाळमधील कमलेश यांना आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमलेश यांच्या बहिणीला पत्र पाठवून पुढील आयुष्यास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सध्या संपूर्ण भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच पत्राची चर्चा सुरू आहे.

भाजपच्या बैठकीत ठरला मोदींसाठी मतदारसंघ, निवडणूक जिंकण्यासाठी 'हा' आहे मास्टरप्लॅन

का पाठवलं पंतप्रधान मोदींना पत्र

कमलेश यांची बहिण तुलशीचं 19 फेब्रुवारी रोजी लग्न झालं. या लग्नाची पत्रिका छापत कमलेश यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी पत्रिकेतून लोकांना भाजपला मत देण्याचं आव्हान केलं होतं. शिवाय, त्यावर त्यांनी सरकारी योजनांची देखील माहिती दिली होती. बहिणीच्या लग्नाची ही पत्रिका कमलेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पाठवली होती. अखेर त्याची दखल घेत नरेंद्र मोदी यांनी कमलेश यांना पत्र पाठवत बहिणीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

काय म्हटलं आहे पत्रात?

लग्नाचं आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. पत्रिकेतून तुम्ही सरकारी योजनांबाबत जनजागृती केलात तुमचं हे पाऊल कौतुकास्पद आहे. देशातील एक जिम्मेदार नागरिक म्हणून तुम्ही केलेल्या या कामगिरीबद्दल धन्यवाद. नव दाम्पत्याला शुभ आशिर्वाद.

Special Report : रेस्क्यूचा थरार, 50 फूट खोल विहिरीतून 2 बिबट्यांना काढलं बाहेर

First published: March 9, 2019, 10:30 AM IST
Tags: pm modi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading