विंडीजला धूळ चारत भारताने मालिका जिंकली

08 डिसेंबरवीरेंद्र सेहवागची रेकॉर्डब्रेक डबल सेंच्युरी आणि भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने इंदूर वनडेत वेस्टइंडिजचा 153 रन्सने पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने सीरिजही 3-1 अशी जिंकली. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने वन डेत रेकॉर्डब्रेक 418 रन्सचा डोंगर उभा केला. विजयाचे हे अवघड आव्हान समोर ठेऊन खेळणार्‍या विंडीजची टीम 265 रन्सवर ऑलआऊट झाली. देनेश रामदिनने केलेल्या झुंजार 96 रन्सच्या खेळीमुळे विंडीजने किमान 250 रन्सचा टप्पा पार केला. पण इतर बॅट्समनची त्याला चांगली साथ मिळाली नाही. भारतातर्फे राहुल शर्मा आणि रविंद जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर सुरेश रैनाला 2 विकेट घेण्यात यश आलं.भारतीय टीमच्या विजयाचा हिरो होता तो अर्थातच कॅप्टन वीरेंद्र सेहवाग. आज सेहवागने इतिहास रचला. डबल सेंच्युरी तर त्याने केलीच. डबल सेंच्युरी तर त्याने केलीच. शिवाय वन डेमधला हायएस्ट वैयक्तिक स्कोअर त्याने केला. यापूर्वी हा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. आफ्रिकन टीमविरुद्ध त्याने दोनशे रन केले होते. तो रेकॉर्ड आज सेहवागने सहज मोडला. सुरुवातीपासूनच तो आक्रमक होता. आणि सेंच्युरी त्याने पूर्ण केली ती 69 बॉलमध्ये पाच सिक्स मारत. त्यानंतरही त्याचा वेग कमी झाला नाही. आणि 43व्या ओव्हरमध्ये त्याने डबल सेंच्युरीही पार केली. एकूण 219 रन त्याने केले ते 148 बॉलमध्ये. यात त्याने 7 सिक्स आणि 25 फोर मारले. त्याच बरोबर सेहवागने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मागे टाकला. 2010 मध्ये झालेल्या ग्वालिअर वन डेत सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुध्द नॉटआऊट 200 रन्स केले होते. वन डे क्रिकेटमधला हा सर्वोत्तम स्कोर होता. पण आता हा रेकॉर्ड सेहवागने मागे टाकला. सेहवागच्या या रेकॉर्डमुळे भारतीय टीमनेही रेकॉर्डब्रेक स्कोअर उभारला. निर्धारित पन्नास ओव्हर्समध्ये टीमने 400 टप्पा ओलांडला. विंडीज टीमसमोर आता विजयासाठी 419 रन्सचं आव्हान आहे. भारतीय टीमचा वन डे क्रिकेटमधला हा हायएस्ट स्कोअर ठरला. यापूर्वी 2006 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय टीमने 414 रन केले होते. कोणत्याही टीमने चारशेचा टप्पा ओलांडण्याची क्रिकेटच्या इतिहासात ही फक्त चौथी खेप आहे. अर्थात आज चारशे पैकी 219 रन एकट्या सेहवागने केले. पण त्याव्यतिरिक्त गौतम गंभीरने 67 तर सुरेश रैनाने 55 रन केले. रोहीत शर्मा आणि विराट कोहलीनेही शेवटी फटकेबाजी केली आणि भारताने पाच विकेटवर 418 रन केले. वीरेंद्र सेहवागने हा रेकॉर्ड केल्यानंतर त्याच्या नजफगढ इथल्या घराजवळ क्रिकेटप्रेमींनी एकच गर्दी केली. सेहवागच्या या कामगिरीचे संपूर्ण देशाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईने दिली. सेहवागला सेलिब्रिटींच्या शुभेच्छा केविन पीटरसन- सेहवागसारखी इनिंग खेळण्यासाठी मी काहीही हरायला तयार आहे.सानिया मिर्झा- सेहवागला सलाम! काय इनिंग होती ही.राजदीप सरदेसाई -- कुठल्याही मॅचची तयारी सेहवाग कशी करतो तर मॅचपूर्वी....संजय मांजरेकर - सचिनचा रेकॉर्ड जो मोडू शकेल असं वाटत होतं, त्याने तो मोडलायुवराज सिंग- रिचर्ड्सला मी पाहिलं नाही. पण त्याचं दु:ख नाही. कारण, मी सेहवागला खेळताना पाहिलंय.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2011 04:04 PM IST

विंडीजला धूळ चारत भारताने मालिका जिंकली

08 डिसेंबर

वीरेंद्र सेहवागची रेकॉर्डब्रेक डबल सेंच्युरी आणि भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने इंदूर वनडेत वेस्टइंडिजचा 153 रन्सने पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने सीरिजही 3-1 अशी जिंकली. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने वन डेत रेकॉर्डब्रेक 418 रन्सचा डोंगर उभा केला. विजयाचे हे अवघड आव्हान समोर ठेऊन खेळणार्‍या विंडीजची टीम 265 रन्सवर ऑलआऊट झाली. देनेश रामदिनने केलेल्या झुंजार 96 रन्सच्या खेळीमुळे विंडीजने किमान 250 रन्सचा टप्पा पार केला. पण इतर बॅट्समनची त्याला चांगली साथ मिळाली नाही. भारतातर्फे राहुल शर्मा आणि रविंद जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर सुरेश रैनाला 2 विकेट घेण्यात यश आलं.भारतीय टीमच्या विजयाचा हिरो होता तो अर्थातच कॅप्टन वीरेंद्र सेहवाग. आज सेहवागने इतिहास रचला. डबल सेंच्युरी तर त्याने केलीच. डबल सेंच्युरी तर त्याने केलीच. शिवाय वन डेमधला हायएस्ट वैयक्तिक स्कोअर त्याने केला. यापूर्वी हा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. आफ्रिकन टीमविरुद्ध त्याने दोनशे रन केले होते. तो रेकॉर्ड आज सेहवागने सहज मोडला.

सुरुवातीपासूनच तो आक्रमक होता. आणि सेंच्युरी त्याने पूर्ण केली ती 69 बॉलमध्ये पाच सिक्स मारत. त्यानंतरही त्याचा वेग कमी झाला नाही. आणि 43व्या ओव्हरमध्ये त्याने डबल सेंच्युरीही पार केली. एकूण 219 रन त्याने केले ते 148 बॉलमध्ये. यात त्याने 7 सिक्स आणि 25 फोर मारले. त्याच बरोबर सेहवागने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मागे टाकला. 2010 मध्ये झालेल्या ग्वालिअर वन डेत सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुध्द नॉटआऊट 200 रन्स केले होते. वन डे क्रिकेटमधला हा सर्वोत्तम स्कोर होता. पण आता हा रेकॉर्ड सेहवागने मागे टाकला.

सेहवागच्या या रेकॉर्डमुळे भारतीय टीमनेही रेकॉर्डब्रेक स्कोअर उभारला. निर्धारित पन्नास ओव्हर्समध्ये टीमने 400 टप्पा ओलांडला. विंडीज टीमसमोर आता विजयासाठी 419 रन्सचं आव्हान आहे. भारतीय टीमचा वन डे क्रिकेटमधला हा हायएस्ट स्कोअर ठरला. यापूर्वी 2006 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय टीमने 414 रन केले होते.

कोणत्याही टीमने चारशेचा टप्पा ओलांडण्याची क्रिकेटच्या इतिहासात ही फक्त चौथी खेप आहे. अर्थात आज चारशे पैकी 219 रन एकट्या सेहवागने केले. पण त्याव्यतिरिक्त गौतम गंभीरने 67 तर सुरेश रैनाने 55 रन केले. रोहीत शर्मा आणि विराट कोहलीनेही शेवटी फटकेबाजी केली आणि भारताने पाच विकेटवर 418 रन केले.

वीरेंद्र सेहवागने हा रेकॉर्ड केल्यानंतर त्याच्या नजफगढ इथल्या घराजवळ क्रिकेटप्रेमींनी एकच गर्दी केली. सेहवागच्या या कामगिरीचे संपूर्ण देशाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईने दिली.

सेहवागला सेलिब्रिटींच्या शुभेच्छा

केविन पीटरसन- सेहवागसारखी इनिंग खेळण्यासाठी मी काहीही हरायला तयार आहे.सानिया मिर्झा- सेहवागला सलाम! काय इनिंग होती ही.

राजदीप सरदेसाई -- कुठल्याही मॅचची तयारी सेहवाग कशी करतो तर मॅचपूर्वी....

संजय मांजरेकर - सचिनचा रेकॉर्ड जो मोडू शकेल असं वाटत होतं, त्याने तो मोडला

युवराज सिंग- रिचर्ड्सला मी पाहिलं नाही. पण त्याचं दु:ख नाही. कारण, मी सेहवागला खेळताना पाहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2011 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...