'नीट'च्या परीक्षेवर 1 वर्षाची स्थगिती

08 डिसेंबरराज्यात 2011-2012 नीट (NEET) च्या परीक्षेवर महाराष्ट्रात एक वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निकाल दिला. लातूरच्या अनिरूद्ध जाधव यांच्यासह काही पालकांनी याचिका दाखल केली होती. त्यावर हा निर्णय दिला गेला. यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नीट परीक्षेतून महाराष्ट्राला एक वर्षासाठी वगळण्यात यावं अशी केंद्राकडे मागणी केली होती. एमसीआय (MCI) अर्थात मेडिकल काऊन्सील ऑफ इंडिया च्या सूत्रांनी देखील यावर्षी राज्यात 'नीट' होणार नसल्याची माहिती दिली होती. पण अधिकृत घोषणा झाली होती.आज हायकोर्टाच्या या निकालामुळे लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे. आता राज्यातल्या वैद्यकीय अभ्यासक्रमचे प्रवेश सेट (CET) नुसारच होणार आहेत. मध्यंतरी पालकांनी पुकारलेल्या या लढ्याची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही दखल घेतली होती या प्रकरणी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहोत असं आश्वासन पालकांना दिले होते. देशभरात समान अभ्यासक्रम झाल्याशिवाय 'नीट' च्या परीक्षा घेऊ नये तसेच सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच परीक्षा ठेवावी अशी मागणी पालक संघटनेने केली होती.त्याचबरोबर बारावी आणि प्रवेश परीक्षा या दोन्ही गुण धरुन प्रवेश देण्यात यावा अशी मागणी संघटनेने केली होती. अखेर पालकांच्या या लढ्याला यश मिळाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात 'नीट'ची परीक्षेपासून विद्यार्थांना मुक्तता मिळाली आहेत.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2011 11:52 AM IST

'नीट'च्या परीक्षेवर 1 वर्षाची स्थगिती

08 डिसेंबर

राज्यात 2011-2012 नीट (NEET) च्या परीक्षेवर महाराष्ट्रात एक वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निकाल दिला. लातूरच्या अनिरूद्ध जाधव यांच्यासह काही पालकांनी याचिका दाखल केली होती. त्यावर हा निर्णय दिला गेला. यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नीट परीक्षेतून महाराष्ट्राला एक वर्षासाठी वगळण्यात यावं अशी केंद्राकडे मागणी केली होती. एमसीआय (MCI) अर्थात मेडिकल काऊन्सील ऑफ इंडिया च्या सूत्रांनी देखील यावर्षी राज्यात 'नीट' होणार नसल्याची माहिती दिली होती. पण अधिकृत घोषणा झाली होती.आज हायकोर्टाच्या या निकालामुळे लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे. आता राज्यातल्या वैद्यकीय अभ्यासक्रमचे प्रवेश सेट (CET) नुसारच होणार आहेत. मध्यंतरी पालकांनी पुकारलेल्या या लढ्याची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही दखल घेतली होती या प्रकरणी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहोत असं आश्वासन पालकांना दिले होते. देशभरात समान अभ्यासक्रम झाल्याशिवाय 'नीट' च्या परीक्षा घेऊ नये तसेच सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच परीक्षा ठेवावी अशी मागणी पालक संघटनेने केली होती.त्याचबरोबर बारावी आणि प्रवेश परीक्षा या दोन्ही गुण धरुन प्रवेश देण्यात यावा अशी मागणी संघटनेने केली होती. अखेर पालकांच्या या लढ्याला यश मिळाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात 'नीट'ची परीक्षेपासून विद्यार्थांना मुक्तता मिळाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2011 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...