टू जी प्रकरणी 5 उद्योगपतींना जामीन

23 नोव्हेंबर2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकलेल्या पाच बड्या अधिकार्‍यांना आज जामीन मिळाला. या महाघोटाळ्यातल्या कोणत्याही आरोपीला आजपर्यंत जामीन देण्यात आला नव्हता. पण सुप्रीम कोर्टानंच 5 आरोपींची जामिनावर सुटका केल्यामुळे आता मुख्य आरोपी ए. राजा आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना तिहार तुरुंगाबाहेर पडण्याचे वेध लागले आहे. तिहार तुरुंगात सहा महिने घालवल्यानंतर.. अखेरीस बुधवारी या पाच कॉर्पोरेट अधिकार्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स टेलीकॉमचे गौतम दोशी, हरी नायर आणि सुरेंद्र पिपारा.. युनिटेकचे संजय चंद्रा आणि स्वॉन टेलीकॉमचे विनोद गोएंका यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. 2 जी स्पेक्ट्रम महाघोटाळ्यात कोणत्याही आरोपीला जामीन मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं.. एखाद्या आरोपीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवणं न्याय नाही. तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आरोपींना तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. पण कोणत्याही आरोपीने देशाबाहेर जाऊ नये. आरोपींनी आपले पासपोर्ट्स कोर्टात जमा करावेत. तसेच जामिनावर असताना कोणत्याही साक्षीदारास भेटू नये. स्पेक्ट्रम घोटाळ्यातल्या इतर आरोपींच्या वकिलांनीही या आदेशाचं स्वागत केलं. त्यांना अपेक्षा आहे की आता इतर आरोपींना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 23, 2011 01:06 PM IST

टू जी प्रकरणी 5 उद्योगपतींना जामीन

23 नोव्हेंबर

2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकलेल्या पाच बड्या अधिकार्‍यांना आज जामीन मिळाला. या महाघोटाळ्यातल्या कोणत्याही आरोपीला आजपर्यंत जामीन देण्यात आला नव्हता. पण सुप्रीम कोर्टानंच 5 आरोपींची जामिनावर सुटका केल्यामुळे आता मुख्य आरोपी ए. राजा आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना तिहार तुरुंगाबाहेर पडण्याचे वेध लागले आहे.

तिहार तुरुंगात सहा महिने घालवल्यानंतर.. अखेरीस बुधवारी या पाच कॉर्पोरेट अधिकार्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स टेलीकॉमचे गौतम दोशी, हरी नायर आणि सुरेंद्र पिपारा.. युनिटेकचे संजय चंद्रा आणि स्वॉन टेलीकॉमचे विनोद गोएंका यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. 2 जी स्पेक्ट्रम महाघोटाळ्यात कोणत्याही आरोपीला जामीन मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं.. एखाद्या आरोपीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवणं न्याय नाही. तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आरोपींना तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. पण कोणत्याही आरोपीने देशाबाहेर जाऊ नये. आरोपींनी आपले पासपोर्ट्स कोर्टात जमा करावेत. तसेच जामिनावर असताना कोणत्याही साक्षीदारास भेटू नये.

स्पेक्ट्रम घोटाळ्यातल्या इतर आरोपींच्या वकिलांनीही या आदेशाचं स्वागत केलं. त्यांना अपेक्षा आहे की आता इतर आरोपींना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 01:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...