मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईदच्या संघटनेवर पाकिस्तानची बंदी

मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईदच्या संघटनेवर पाकिस्तानची बंदी

पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने एक आदेश काढून दहशतवाद विरोधी कायद्याखाली या संघटनांवर बंदी घातली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद 5 मार्च  : मुंबईवरच्या हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद याच्या 'जमात उल दवा' आणि फिलाह ए इन्सानियत फाऊंडेशन या संघनांवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने एक आदेश काढून दहशतवाद विरोधी कायद्याखाली या संघटनांवर बंदी घातली आहे.

हाफीज हा लष्कर ए तैय्यबाचा संस्थापक आहे. मात्र लष्कर वर बंदी असल्याने त्याने 'जमात उल दवा' आणि फिलाह ए इन्सानियत फाऊंडेशन या संघटनांव्दारे आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. या संघटनांच्या माध्यमातून तो दहशतवादी कारवायांसाठी देणग्याही गोळ्या करत असते. संयुक्त राष्ट्रानेही हाफिजला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केलं होतं.

या पैशाचा वापर हा दहशतवादी कारवायांसाठी केला जातो असा आरोप आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही हाफीज सईदला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केलं आहे. त्याच्यावर 10 मिलिनियन डॉलरचं इनामही घोषीत करण्यात आलं आहे. त्यानंतर तातडीने त्याच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. भारताचा आणि आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्याने पाकिस्तानने ही कारवाई केल्याचं बोललं जातेय.

भारत आणि पाकिस्तानातल्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी 21 फेब्रुवारीला राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला होता मात्र आदेश काढण्यात आले नव्हते. त्या बैठकीला ISIचे प्रमुख, लष्करप्रमुख यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुंबईवरच्या हल्ल्याची योजना हाफीज सईदनेच बनवली होती.

मात्र केवळ धुळफेक करण्यासाठीच अशी बंदी घालण्यात आल्याचा अंदाज संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

First published: March 5, 2019, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading