सरकार झुकले, शेतकरी जिंकले !

सरकार झुकले, शेतकरी जिंकले !

11 नोव्हेंबरराज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या ऊस दरवाढ आंदोलनापुढे सरकार झुकले. पुण्यात साखर संकुलात झालेल्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली. ऊसदरासाठी सरकारने जो प्रस्ताव दिलाय त्यात कोल्हापूर विभागासाठी 2050 रुपये, पुणे विभागासाठी 1850 रुपये आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रुपयांचा पहिला हप्ता असेल, या मुद्यावर सरकार आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची सहमती झाली. त्यानंतर सरकारच्यावतीने लेखी हमी दिल्यानंतर शेतकरी संघटनेनं त्याला मान्यता दिली. मात्र हा केवळ पहिला हप्ता आहे, तो अंतिम दर नव्हे, असा खुलासाही सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. तर बारामतीत राजू शेट्टी यांनी लेखी हमी मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. ज्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये जाहीर करताच बारामतीत उपस्थित असलेल्या शेतकर्‍यांनी एकच जल्लोष केला.ऊसाला पहिला हप्ता 2,350 रुपये देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलन पुकारले. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातला शेतकरी रस्त्यावर उतरला. राज्यभरात ठिकठिकणी आंदोलन,रास्ता रोको, मोर्चा सुरू झाली. मात्र सरकाने शेतकर्‍यांच्या या आंदोलनाची काडीमात्र दखल घेतली नाही. शेतकर्‍यांना ऊसाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी राजू शेट्टी यांनी विठ्ठलाकडे धाव घेतली. आणि पंढपूर ते बारामती पदयात्रेची घोषणा केली. पंढरपूरच्या विठ्ठलांला साकडं घालून कृषीमंत्री शरद पवार यांच्या गावी बारामतीला हजारो शेतकर्‍यांसह राजू शेट्टी यांची पदयात्रा धडकली. आणि 'साहेब मी तुमच्या गावात शेतकर्‍यांची कैफियत घेऊन आलो आहे, शेतकर्‍यांच्या न्यायासाठी टगेगिरीला आता गांधीगिरीने उत्तर देण्याचं आम्ही ठरवलं आहे यासाठी बेमदुत उपोषण करणार अशी घोषणा राजू शेट्टी यांनी करून टाकली. तिकडे राज्यभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला. ठिकठिकाणी जाळपोळ, साखर कारखान्यात जाणार्‍या ऊस उत्पादकांच्या गाड्यांची टायर फोडणे, हवा सोडणे सुरु झाले. सांगली,कोल्हापूर, नाशिक, पुणे, सोलापूरमध्ये शेतकर्‍यांचा उद्रेकच झाला. शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले असताना राजकीय संघटनांनीही आंदोलनात उडी घेतली. शिवसेना, मनसेने आघाडी घेत शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. एव्हान सोलापुरात शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन उभारले. तर मनसेनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मनसेच्या आमदारांसह कार्यकर्त्यांना अटक झाली. तर दुसरीकडे शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चेच्या फेरी सुरू झाली. एकापाठोपाठ एक तीन फेर्‍या झाल्यानंतर ऊस दरावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. अखेर आज 11-11-11 च्या दिनी पुण्यात साखर संकुलात बैठक झाली. आणि शेतकर्‍यांच्या पदरी यश पडले. तिन्ही शेतकरी संघटनांनी कोल्हापूर विभाग 2150, पुणे विभाग आणि उर्वरीत महाराष्ट्र विभागासाठी 2100 दराचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात आला. शेतकर्‍यांच्या प्रस्तावाचा विचार करत सरकारने आपला प्रस्ताव दिला. या प्रस्तावात कोल्हापूर विभागासाठी 2050 रुपये, पुणे विभागासाठी 1850 रुपये आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रुपयांचा पहिला हप्ता असेल असा प्रस्ताव दिला. अखेर या प्रस्तावर सरकार आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची सहमती झाली. त्यानंतर सरकारच्यावतीने लेखी हमी दिल्यानंतर शेतकरी संघटनेनं त्याला मान्यता दिली. मात्र हा केवळ पहिला हप्ता आहे, तो अंतिम दर नव्हे, असा खुलासाही सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. तर बारामतीत राजू शेट्टी यांनी लेखी हमी मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. पुण्यात नव्या दरवाढीची घोषणा करताच बारामती शेतकर्‍यांनी एकच जल्लोष केला.3 विभाग, 3 दर कोल्हापूर विभाग कोल्हापूर, सांगली, सातारा दर - 2050 रु.पुणे विभाग पुणे, अहमदनगर, सोलापूरदर - 1850 रु.उर्वरित महाराष्ट्र खानदेश, विदर्भ, मराठवाडादर - 1800 रु.

  • Share this:

11 नोव्हेंबर

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या ऊस दरवाढ आंदोलनापुढे सरकार झुकले. पुण्यात साखर संकुलात झालेल्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली. ऊसदरासाठी सरकारने जो प्रस्ताव दिलाय त्यात कोल्हापूर विभागासाठी 2050 रुपये, पुणे विभागासाठी 1850 रुपये आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रुपयांचा पहिला हप्ता असेल, या मुद्यावर सरकार आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची सहमती झाली. त्यानंतर सरकारच्यावतीने लेखी हमी दिल्यानंतर शेतकरी संघटनेनं त्याला मान्यता दिली. मात्र हा केवळ पहिला हप्ता आहे, तो अंतिम दर नव्हे, असा खुलासाही सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. तर बारामतीत राजू शेट्टी यांनी लेखी हमी मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. ज्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये जाहीर करताच बारामतीत उपस्थित असलेल्या शेतकर्‍यांनी एकच जल्लोष केला.ऊसाला पहिला हप्ता 2,350 रुपये देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलन पुकारले. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातला शेतकरी रस्त्यावर उतरला. राज्यभरात ठिकठिकणी आंदोलन,रास्ता रोको, मोर्चा सुरू झाली. मात्र सरकाने शेतकर्‍यांच्या या आंदोलनाची काडीमात्र दखल घेतली नाही. शेतकर्‍यांना ऊसाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी राजू शेट्टी यांनी विठ्ठलाकडे धाव घेतली. आणि पंढपूर ते बारामती पदयात्रेची घोषणा केली. पंढरपूरच्या विठ्ठलांला साकडं घालून कृषीमंत्री शरद पवार यांच्या गावी बारामतीला हजारो शेतकर्‍यांसह राजू शेट्टी यांची पदयात्रा धडकली.

आणि 'साहेब मी तुमच्या गावात शेतकर्‍यांची कैफियत घेऊन आलो आहे, शेतकर्‍यांच्या न्यायासाठी टगेगिरीला आता गांधीगिरीने उत्तर देण्याचं आम्ही ठरवलं आहे यासाठी बेमदुत उपोषण करणार अशी घोषणा राजू शेट्टी यांनी करून टाकली. तिकडे राज्यभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला. ठिकठिकाणी जाळपोळ, साखर कारखान्यात जाणार्‍या ऊस उत्पादकांच्या गाड्यांची टायर फोडणे, हवा सोडणे सुरु झाले. सांगली,कोल्हापूर, नाशिक, पुणे, सोलापूरमध्ये शेतकर्‍यांचा उद्रेकच झाला. शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले असताना राजकीय संघटनांनीही आंदोलनात उडी घेतली. शिवसेना, मनसेने आघाडी घेत शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. एव्हान सोलापुरात शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन उभारले.

तर मनसेनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मनसेच्या आमदारांसह कार्यकर्त्यांना अटक झाली. तर दुसरीकडे शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चेच्या फेरी सुरू झाली. एकापाठोपाठ एक तीन फेर्‍या झाल्यानंतर ऊस दरावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. अखेर आज 11-11-11 च्या दिनी पुण्यात साखर संकुलात बैठक झाली. आणि शेतकर्‍यांच्या पदरी यश पडले. तिन्ही शेतकरी संघटनांनी कोल्हापूर विभाग 2150, पुणे विभाग आणि उर्वरीत महाराष्ट्र विभागासाठी 2100 दराचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात आला. शेतकर्‍यांच्या प्रस्तावाचा विचार करत सरकारने आपला प्रस्ताव दिला.

या प्रस्तावात कोल्हापूर विभागासाठी 2050 रुपये, पुणे विभागासाठी 1850 रुपये आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रुपयांचा पहिला हप्ता असेल असा प्रस्ताव दिला. अखेर या प्रस्तावर सरकार आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची सहमती झाली. त्यानंतर सरकारच्यावतीने लेखी हमी दिल्यानंतर शेतकरी संघटनेनं त्याला मान्यता दिली. मात्र हा केवळ पहिला हप्ता आहे, तो अंतिम दर नव्हे, असा खुलासाही सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. तर बारामतीत राजू शेट्टी यांनी लेखी हमी मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. पुण्यात नव्या दरवाढीची घोषणा करताच बारामती शेतकर्‍यांनी एकच जल्लोष केला.

3 विभाग, 3 दर

कोल्हापूर विभाग कोल्हापूर, सांगली, सातारा दर - 2050 रु.

पुणे विभाग पुणे, अहमदनगर, सोलापूरदर - 1850 रु.

उर्वरित महाराष्ट्र खानदेश, विदर्भ, मराठवाडादर - 1800 रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2011 01:43 PM IST

ताज्या बातम्या