माहीमच्या नेचर पार्कमध्ये उभं राहतंय बटरफ्लाय गार्डन

18 नोव्हेंबररोहिणी गोसावीमुंबईतील धारावीसारख्या अतिशय गजबजलेल्या ठिकाणी मन मोहून टाकणारी फुलं आणि रंगीबेरंगी फुलपाखरांची कल्पना करणं जरा कठीणच आहे. पण धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानात हे दृश्य आपल्याला पाहता येईल. या उद्यानात बटरफ्लाय गार्डन तयार करण्याचं काम सुरू आहे. एका फुलावरून दुसर्‍या फुलाकडे उडत जाणारी रंगीबेरंगी फुलपाखरं पाहण्यात मुलंही रमून गेली आहेत. ' आम्हाला घरी किंवा शाळेत एवढ्या प्रकारची फुलपाखरं बघायला मिळत नाही. इथे खूप रंगीबेरंगी आणि खूप प्रकारची फुलपाखरं बघायला मिळाली ', असं लहानगी समृध्दी राणे सांगत होती. फुलपाखरांसाठी इथं कदंब, रिठा रोई अशा प्रकारची खास झाडं इथं लावण्यात आली आहेत. काही सेकंदाच्या आत एका फुलावरून उडून जाणारी फुलपाखरं कदंबाच्या फळावरुन मात्र लवकर उडत नाही. कारण कदंबाच्या फळाच्या रसामुळे त्यांना एक प्रकारची नशा चढते. 'आम्हाला इथं खूप काही शिकायला मिळालं. आता आम्हीही तशीच फुलझाडं लावू ', असं दुर्गेश सावंत सांगत होता. गेल्या दोन वर्षांपासून हे गार्डन तयार करण्याचं काम सुरू आहे. आणखी वर्षभर हे काम चालेल. 37 एकरच्या या नेचर पार्कमधली साडेतीन एकर जागा या फुलपाखरांसाठी राखून ठेवण्यात आलीय. सध्या 75 प्रकारची फुलपाखरं गार्डनमध्ये बघायला मिळतात. ' फुलपाखरं ही हवा शुद्ध करण्याचं आणि वातावरणात वेगळेपणा आणण्याचं काम करतात. शहरात राहणार्‍या लोकांना आकर्षित करण्यासाठीच हे गार्डन तयार करण्यात आलंय ' असं महाराष्ट्र नेचर पार्कचे उपंचालक अविनाश कुबल यांनी सांगितलं फुलपाखरू हे परागीकरण आणि फलिकरणाचं काम करतात, त्यामुळं बीजरोपणाला मदत होते. अशा प्रकारच्या निसर्गोद्यानांमध्ये झाडांची संख्या नैसगिर्करित्या वाढावी, हा एक उद्देशही अशी बटरफ्लाय गार्डन तयार करण्यामागे असतो. हे गार्डन पूर्ण झाल्यानंतर जवळपास 100 प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरं इथं पहायला मिळणार आहेत.

  • Share this:

Tags:
First Published: Nov 18, 2008 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading