मी फाशी घेतोय म्हणत लटकला, खेळता खेळता 14 वर्षीय मुलाच्या आयुष्याचाच झाला खेळ

मी फाशी घेतोय म्हणत लटकला, खेळता खेळता 14 वर्षीय मुलाच्या आयुष्याचाच झाला खेळ

घरात लहान भावंडांसोबत खेळताना मोठ्या मुलाने छताच्या पंख्याला दोरी बांधली आणि फाशी अशी घेतात म्हणाला. त्यातच मुलाचा मृत्यू झाला.

  • Share this:

जयपूर, 12 एप्रिल : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात एका 14 वर्षांच्या मुलानं खेळता खेळता गळ्यात फास अडकवला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फास लावून घेतलेला मुलगा आणि इतर काही मुलं खेळत होती. त्यावेळी मुलाने खोलीतील पंख्याला दोरी बांधली आणि फाशी अशी घेतात म्हणला. त्यानंतर तो फासावर तसाच लटकत राहिला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अटलबंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नीम दा गेट या गावात एक महिला तिच्या मुलांसह भाड्याच्या घरात राहते. यावेळी महिला घराबाहेर काहीतरी काम करत होती. तेव्हा घरात दोन मुलं आणि दोन मुली होत्या.  त्यावेळी खेळता खेळता मोठ्या मुलाने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

सर्व मुलं खेळत असताना महिलेचा मोठा मुलगा समीर त्याच्या भावंडांना फाशी कशी घेतात हे दाखवत होता. त्यानं दोरी फॅनला बांधली आणि फास गळ्यात अडकवला. त्यानंतर लहान बहीण भावांना म्हणाला की मी फाशी घेत आहे. घाबरलेली लहान मुलं बाहेर येऊन ओरडायला लागली.

हे वाचा : कोरोनाचा कहर असताना दिल्लीत भूकंपाचे धक्के, 'देवा काय आहे मनात?'

लहान मुलांच्या ओरडण्यामुळे शेजारच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. तोपर्यंत समीर पंख्याला लटकलेला होता. खेळता खेळता 14 वर्षाच्या मुलाच्या आय़ुष्याचा खेळ झाला. यामुळे आईला धक्का बसला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकऱणाची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

हे वाचा : LockDown : कंटाळा आल्यावर मित्राकडे जाण्यासाठी जुगाड, सुटकेसमध्ये बसला आणि...

First published: April 12, 2020, 7:53 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading