मसूद अझहरचा मृत्यू आजारपणामुळेच की पाकिस्तानकडून दिशाभूल?

मसूद अझहरचा मृत्यू आजारपणामुळेच की पाकिस्तानकडून दिशाभूल?

पाकिस्तानकडून तो आजाराने ग्रस्त होता, असं सांगण्यात येत आहे. पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

  • Share this:

इस्लामाबाद, 3 मार्च : जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा याचा मृत्यू झाला आहे. मसूद अझहरचा 2 मार्च रोजीच (शनिवारी) मृत्यू झाल्याची माहिती आहे. याबाबत गुप्तहेर खात्यातील उच्चस्तरीय सूत्रांकडून 'CNN News18' ला माहिती मिळाली आहे. पाकिस्तानकडून तो आजाराने ग्रस्त होता, असं सांगण्यात येत आहे. पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पुलवाना इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मसूद अझहर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. कारण तो म्होरक्या असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी उचलली. त्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत दहशवाद्यांच्या तळावर हल्ला केला.

आता मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने त्याचा मृत्यू नक्की कशाने झाला, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्तानकडून सांगण्यात येतंय त्याप्रमाणे खरंच त्याचा मृत्यू आजारपणाने झाला का, हे आगामी काळात पाहावं लागेल.

कंदहार विमान अपहरणानंतर जैश-ए-मोहम्मदला बळ

सीआरपीएफच्या ताफ्यातील गाड्या आयईडीने उड़वून देणाऱ्या या संघटनेचा हा पहिलाच हल्ला नाही. 1999 च्या कंदहार विमान अपहरणापासून जैशने आपल्या कारवायांना सुरुवात केली. 1994 ला काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीन चा सदस्य असल्याच्या कारणावरुन अजहर मसूदला अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं.

VIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे

First published: March 3, 2019, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading