'टू जी'च्या आरोपींना होऊ शकते जन्मठेप

22 ऑक्टोबरटू जी घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने आज सर्व 14 आरोपींविरोधात गुन्हे निश्चित केले. पतियाळा हाऊस कोर्टात विशेष न्यायाधीश ओ पी सैनी यांच्यापुढे आज या प्रकरणाची सुनावणी झाली. आणि सर्व आरोपांविरोधात सीबीआयने दाखल केलेले सर्व आरोप कोर्टाने मान्य केले. सर्वच आरोपींना 409 कलमाखाली आरोप निश्चित करण्यात आल्याने त्यांना धक्का बसला. राजा आणि बेहुरा यांच्यावर फसवणुकीच्या आरोपाखाली 420 कलमसुद्धा लावण्यात आला. तर द्रमुकच्या खासदार आणि करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणं, अफरातफर यासह इतर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. रिलायन्स टेलिकम्युनिकेशन, युनिटेक वायरलेस, स्वान टेलिकॉम यांच्यावर गुन्हेगारी कटाचा आरोप ठेवण्यात आला. हे आरोप सिद्ध झाले तर सर्व 14 आरोपींना जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तर कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सीबीआयने 7 महिन्यांपूर्वी याबाबतची चार्जशीट दाखल केली होती. हे सर्व जण या आरोपांविरोधात हायकोर्टात अपील करणार आहेत.2 जी घोटाळा, आरोप निश्चित ए.राजा माजी दूरसंचार मंत्री आरोप - गुन्हेगारी कट, पदाचा दुरुपयोग, फसवणूक, अफरातफर, लाचखोरीकनिमोळी खासदार, द्रमुकआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापर, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणंसिद्धार्थ बेहुरा माजी दूरसंचार सचिव आरोप - गुन्हेगारी कट, अफरातफर, लाचखोरी, पदाचा गैरवापर आर.के. चंडोलिया राजांचे माजी सहकारी आरोप - गुन्हेगारी कट, अफरातफर, लाचखोरी, पदाचा गैरवापर शाहीद बलवा प्रमोटर, स्वान टेलिकॉमआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणंविनोद गोएंकाएमडी, डी.बी. रिऍल्टीसंचालक, स्वॉन टेलिकॉमआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणंसंजय चंद्रा एमडी, युनिटेक लिमिटेड आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापरगौतम दोषी सीनिअर एक्झिक्युटिव्ह, ADAGआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, लाचखोरी, पदाचा गैरवापरसुरेंद्र पिपाडा सीनिअर एक्झिक्युटिव्ह, ADAGआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, लाचखोरी, पदाचा गैरवापरहरी नायर सीनिअर एक्झिक्युटिव्ह, ADAGआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, लाचखोरी, पदाचा गैरवापरसरथ कुमार एमडी, कलाईग्नार टीव्ही आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, लाचखोरी, पदाचा गैरवापर, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणंकरीम मोरानी चित्रपट निर्माता आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापर, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणंराजीव अगरवाल संचालक, डी.बी. रिऍल्टी ग्रुप आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापर, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणंअसीफ बलवा संचालक, डी.बी. रिऍल्टी ग्रुप आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापर, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणंतर, याप्रकरणी माजी अर्थमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली. या घोटाळ्याची पूर्ण जबाबदारी काँग्रेसची आहे, असं भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, द्रमुक अध्यक्ष करुणानिधी यांनी आज तिहार तुरुंगात जाऊन आपली मुलगी कनिमोळींची भेट घेतली. जवळपास 1 तास त्यांच्यात चर्चा झाली. दोघांची ही दुसरी भेट आहे. कनिमोळीसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे करुणानिधी आज दिल्लीत होते. त्यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2011 09:44 AM IST

'टू जी'च्या आरोपींना होऊ शकते जन्मठेप

22 ऑक्टोबर

टू जी घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने आज सर्व 14 आरोपींविरोधात गुन्हे निश्चित केले. पतियाळा हाऊस कोर्टात विशेष न्यायाधीश ओ पी सैनी यांच्यापुढे आज या प्रकरणाची सुनावणी झाली. आणि सर्व आरोपांविरोधात सीबीआयने दाखल केलेले सर्व आरोप कोर्टाने मान्य केले. सर्वच आरोपींना 409 कलमाखाली आरोप निश्चित करण्यात आल्याने त्यांना धक्का बसला. राजा आणि बेहुरा यांच्यावर फसवणुकीच्या आरोपाखाली 420 कलमसुद्धा लावण्यात आला. तर द्रमुकच्या खासदार आणि करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणं, अफरातफर यासह इतर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. रिलायन्स टेलिकम्युनिकेशन, युनिटेक वायरलेस, स्वान टेलिकॉम यांच्यावर गुन्हेगारी कटाचा आरोप ठेवण्यात आला. हे आरोप सिद्ध झाले तर सर्व 14 आरोपींना जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तर कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सीबीआयने 7 महिन्यांपूर्वी याबाबतची चार्जशीट दाखल केली होती. हे सर्व जण या आरोपांविरोधात हायकोर्टात अपील करणार आहेत.

2 जी घोटाळा, आरोप निश्चित

ए.राजा माजी दूरसंचार मंत्री आरोप - गुन्हेगारी कट, पदाचा दुरुपयोग, फसवणूक, अफरातफर, लाचखोरी

कनिमोळी खासदार, द्रमुकआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापर, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणं

सिद्धार्थ बेहुरा माजी दूरसंचार सचिव आरोप - गुन्हेगारी कट, अफरातफर, लाचखोरी, पदाचा गैरवापर

आर.के. चंडोलिया राजांचे माजी सहकारी आरोप - गुन्हेगारी कट, अफरातफर, लाचखोरी, पदाचा गैरवापर

शाहीद बलवा प्रमोटर, स्वान टेलिकॉमआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणं

विनोद गोएंकाएमडी, डी.बी. रिऍल्टीसंचालक, स्वॉन टेलिकॉमआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणं

संजय चंद्रा एमडी, युनिटेक लिमिटेड आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापर

गौतम दोषी सीनिअर एक्झिक्युटिव्ह, ADAGआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, लाचखोरी, पदाचा गैरवापरसुरेंद्र पिपाडा सीनिअर एक्झिक्युटिव्ह, ADAGआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, लाचखोरी, पदाचा गैरवापर

हरी नायर सीनिअर एक्झिक्युटिव्ह, ADAGआरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, लाचखोरी, पदाचा गैरवापर

सरथ कुमार एमडी, कलाईग्नार टीव्ही आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, लाचखोरी, पदाचा गैरवापर, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणं

करीम मोरानी चित्रपट निर्माता आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापर, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणं

राजीव अगरवाल संचालक, डी.बी. रिऍल्टी ग्रुप आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापर, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणंअसीफ बलवा संचालक, डी.बी. रिऍल्टी ग्रुप आरोप - गुन्हेगारी कट, फसवणूक, अफरातफर, पदाचा गैरवापर, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देणं

तर, याप्रकरणी माजी अर्थमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली. या घोटाळ्याची पूर्ण जबाबदारी काँग्रेसची आहे, असं भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, द्रमुक अध्यक्ष करुणानिधी यांनी आज तिहार तुरुंगात जाऊन आपली मुलगी कनिमोळींची भेट घेतली. जवळपास 1 तास त्यांच्यात चर्चा झाली. दोघांची ही दुसरी भेट आहे. कनिमोळीसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे करुणानिधी आज दिल्लीत होते. त्यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2011 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...