Elec-widget

गद्दाफीचा मृत्यू वादात

गद्दाफीचा मृत्यू वादात

21 ऑक्टोबरलिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा गुरुवारी त्याच्या सिर्ते या जन्मगावात मूत्यू झाला. गद्दाफी गोळीबारात ठार झाला की त्याला पकडल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या, हा वाद आता निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे लिबियात मात्र जल्लोष सुरू आहे. तर गद्दाफीच्या मृत्यू प्रकरणाची दखल संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने घेतली. गद्दाफीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे संकेत मानवाधिकार आयोगाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे. सध्या लिबियातल्या अत्याचाराची संयुक्त राष्ट्राच्या समितीकडून चौकशी सुरू आहे. हीच समिती गद्दाफीच्या मृत्यूचा तपासही करू शकते. गद्दाफीच्या मृत्यूचा वाद सुरू असल्याने त्याचा दफनविधी लांबणीवर टाकण्याचा निर्णय लिबियातल्या एनटीसी (NTC) म्हणजेच नॅशनल ट्रान्झिशनल काऊन्सिलनं घेतला. सध्या त्याचा मृतदेह मिस्रता या शहरात एका कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला आहेत. इस्लाम धर्माच्या विधींनुसार गद्दाफीचा अंत्यविधी केला जाणार आहे. पण गद्दाफीची कबर धार्मिक ठिकाण बनू नये, यासाठी त्याच्या दफनविधीची जागा गुप्त ठेवण्यात येणार आहे. गद्दाफीच्या मृत्यूची कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यासाठी लिबियाच्या बाहेरून तटस्थ समितीला बोलावण्याची शक्यता एनटीसीनं व्यक्त केली. लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीच्या खात्मा होण्याचे शेवटचे दृश्यं आज प्रसिध्द झाले. सिर्ते या त्याच्या जन्मगावात बंडखोरांच्या हल्ल्यानंतर जखमी झालेला गद्दाफी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी सैनिकांनी त्याला घेरलं. आणि गोळ्या घातल्या, त्यानंतर थोड्यात वेळात त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्याकडे असणारी त्याची सोनेरी बंदूक. 42 वर्ष लिबियावर एकहाती सत्ता गाजवलेल्या हुकूमशहाची बंदूक बघण्यासाठी बंडखोरांच्या सैनिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. आपल्या अखेरच्या क्षणी गद्दाफी पाईप्समध्ये लपून बसला होता. गद्दाफीच्या मृत्यूची बातमी देशभरात पसरली. आणि जल्लोष सुरू झाला. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना आपल्या ब्लॅकबेरी मोबाईलवरून गद्दाफी संपल्याची बातमी मिळाली. त्यावेळी त्या एका मुलाखतीची तयारी करत होत्या. थोड्याच वेळात अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी गद्दाफीचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला. आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी त्याची घोषणा केली.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, गद्दाफीची राजवट संपल्याचं आज आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. शेवटच्या मोठया हुकूमशाही सत्तेचा अंत झालाय. आता नव्या सरकारचं लिबियावर नियंत्रण येईल. जगातल्या सर्वाधिक काळ सत्तेवर राहणार्‍या हुकूमशहाचा अंत झाला. दरम्यान, गद्दाफीचा मृत्यू नेमका कसा झाला यावरूनही मतभेद निर्माण झालेत. आतड्यात गोळी लागल्यानं गद्दाफीचा मृत्यू झाला, असं त्याच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम करणारे डॉक्टर इब्राहिम टिका यांनी अल अरेबिया टेलिव्हिजनला सांगितलंय. पण गद्दाफीच्या हाताला गोळी लागली होती, असं अंतरिम सरकारचे पंतप्रधान महमूद जिब्रिल यांनी सांगितलं. आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असताना गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं होतं. गद्दाफीसोबत त्याचा मुलगा मोत्तस्सिम हासुद्धा ठार झाला. त्याचा मृत्यू गद्दाफीनंतर झाला, असं डॉक्टर टिका यांनी सांगितलं. गद्दाफीचा दुसरा मुलगा सैफ-अल-इस्लाम याचा ठावठिकाणा अजून लागलेला नाही. गद्दाफीच्या मृत्यूनंतर आता लिबियात लोकशाही सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू झाली आहेत. लिबियाच्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा एनटीसीकडून केली जाणार आहे. शिवाय लिबियातीलं युद्ध संपल्याने नाटोच्या फौजा टप्प्याटप्प्यानं काढून घेतल्या जाणार आहेत. त्याची घोषणा एक ते दोन दिवसात होऊ शकते. गद्दाफीचा अंत झाल्याने आता लिबियात लोकशाहीचा मार्ग मोकळा झाल्याचं मत युरोपियन देशांनी व्यक्त केलंय. तर अमेरिका आणि युरोपातल्या देशांनी गद्दाफी याच्या मृत्यबद्दल आनंद व्यक्त केला असला तरी व्हेनेझ्युएलाचे अध्यक्ष ह्युगो शावेझ यांनी दुःख व्यक्त केलंय. गद्दाफी यांची हत्या झालीय. एक महान योद्धा, क्रांतिकारी आणि हुतात्मा म्हणून त्यांची ओळख कायम राहील असं शावेझ यांनी म्हटलं आहे. लिबियातल्या तेलाचा ताबा मिळवण्यासाठी नाटोचे प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी म्हटलंय. 17 फेब्रुवारी 2011 या दिवसापासून लिबियात गद्दाफी याच्याविरोधात आंदोलन पेटलं होतं. गद्दाफी याच्या मृत्युमुळे हे आंदोलन यशस्वी झालंय. लिबियाची 42 वर्षांच्या हुकूमशाहीतून सुटका झालीय. आता आव्हान आहे ते म्हणजे लिबियाची घडी बसवण्याचं.

  • Share this:

21 ऑक्टोबर

लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा गुरुवारी त्याच्या सिर्ते या जन्मगावात मूत्यू झाला. गद्दाफी गोळीबारात ठार झाला की त्याला पकडल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या, हा वाद आता निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे लिबियात मात्र जल्लोष सुरू आहे. तर गद्दाफीच्या मृत्यू प्रकरणाची दखल संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने घेतली. गद्दाफीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे संकेत मानवाधिकार आयोगाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.

सध्या लिबियातल्या अत्याचाराची संयुक्त राष्ट्राच्या समितीकडून चौकशी सुरू आहे. हीच समिती गद्दाफीच्या मृत्यूचा तपासही करू शकते. गद्दाफीच्या मृत्यूचा वाद सुरू असल्याने त्याचा दफनविधी लांबणीवर टाकण्याचा निर्णय लिबियातल्या एनटीसी (NTC) म्हणजेच नॅशनल ट्रान्झिशनल काऊन्सिलनं घेतला. सध्या त्याचा मृतदेह मिस्रता या शहरात एका कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला आहेत. इस्लाम धर्माच्या विधींनुसार गद्दाफीचा अंत्यविधी केला जाणार आहे. पण गद्दाफीची कबर धार्मिक ठिकाण बनू नये, यासाठी त्याच्या दफनविधीची जागा गुप्त ठेवण्यात येणार आहे. गद्दाफीच्या मृत्यूची कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यासाठी लिबियाच्या बाहेरून तटस्थ समितीला बोलावण्याची शक्यता एनटीसीनं व्यक्त केली.

लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीच्या खात्मा होण्याचे शेवटचे दृश्यं आज प्रसिध्द झाले. सिर्ते या त्याच्या जन्मगावात बंडखोरांच्या हल्ल्यानंतर जखमी झालेला गद्दाफी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी सैनिकांनी त्याला घेरलं. आणि गोळ्या घातल्या, त्यानंतर थोड्यात वेळात त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्याकडे असणारी त्याची सोनेरी बंदूक. 42 वर्ष लिबियावर एकहाती सत्ता गाजवलेल्या हुकूमशहाची बंदूक बघण्यासाठी बंडखोरांच्या सैनिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. आपल्या अखेरच्या क्षणी गद्दाफी पाईप्समध्ये लपून बसला होता. गद्दाफीच्या मृत्यूची बातमी देशभरात पसरली. आणि जल्लोष सुरू झाला.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना आपल्या ब्लॅकबेरी मोबाईलवरून गद्दाफी संपल्याची बातमी मिळाली. त्यावेळी त्या एका मुलाखतीची तयारी करत होत्या. थोड्याच वेळात अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी गद्दाफीचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला. आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी त्याची घोषणा केली.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, गद्दाफीची राजवट संपल्याचं आज आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. शेवटच्या मोठया हुकूमशाही सत्तेचा अंत झालाय. आता नव्या सरकारचं लिबियावर नियंत्रण येईल. जगातल्या सर्वाधिक काळ सत्तेवर राहणार्‍या हुकूमशहाचा अंत झाला.

दरम्यान, गद्दाफीचा मृत्यू नेमका कसा झाला यावरूनही मतभेद निर्माण झालेत. आतड्यात गोळी लागल्यानं गद्दाफीचा मृत्यू झाला, असं त्याच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम करणारे डॉक्टर इब्राहिम टिका यांनी अल अरेबिया टेलिव्हिजनला सांगितलंय. पण गद्दाफीच्या हाताला गोळी लागली होती, असं अंतरिम सरकारचे पंतप्रधान महमूद जिब्रिल यांनी सांगितलं. आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असताना गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं होतं. गद्दाफीसोबत त्याचा मुलगा मोत्तस्सिम हासुद्धा ठार झाला. त्याचा मृत्यू गद्दाफीनंतर झाला, असं डॉक्टर टिका यांनी सांगितलं. गद्दाफीचा दुसरा मुलगा सैफ-अल-इस्लाम याचा ठावठिकाणा अजून लागलेला नाही.

गद्दाफीच्या मृत्यूनंतर आता लिबियात लोकशाही सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू झाली आहेत. लिबियाच्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा एनटीसीकडून केली जाणार आहे. शिवाय लिबियातीलं युद्ध संपल्याने नाटोच्या फौजा टप्प्याटप्प्यानं काढून घेतल्या जाणार आहेत. त्याची घोषणा एक ते दोन दिवसात होऊ शकते. गद्दाफीचा अंत झाल्याने आता लिबियात लोकशाहीचा मार्ग मोकळा झाल्याचं मत युरोपियन देशांनी व्यक्त केलंय.

तर अमेरिका आणि युरोपातल्या देशांनी गद्दाफी याच्या मृत्यबद्दल आनंद व्यक्त केला असला तरी व्हेनेझ्युएलाचे अध्यक्ष ह्युगो शावेझ यांनी दुःख व्यक्त केलंय. गद्दाफी यांची हत्या झालीय. एक महान योद्धा, क्रांतिकारी आणि हुतात्मा म्हणून त्यांची ओळख कायम राहील असं शावेझ यांनी म्हटलं आहे. लिबियातल्या तेलाचा ताबा मिळवण्यासाठी नाटोचे प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी म्हटलंय.

17 फेब्रुवारी 2011 या दिवसापासून लिबियात गद्दाफी याच्याविरोधात आंदोलन पेटलं होतं. गद्दाफी याच्या मृत्युमुळे हे आंदोलन यशस्वी झालंय. लिबियाची 42 वर्षांच्या हुकूमशाहीतून सुटका झालीय. आता आव्हान आहे ते म्हणजे लिबियाची घडी बसवण्याचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...