लिबियातला रक्तरंजित प्रवास

लिबियातला रक्तरंजित प्रवास

20 ऑक्टोबरफेब्रुवारीपासून लिबियात गद्दाफीच्या रावटीविरोधात आंदोलन पेटलं होतं. आज त्याचा शेवट झाला. गेले 8 महिने धुमसणार्‍या लिबियात बंडखोरांचा जल्लोष आहे, तो हुकूमशहा गद्दाफीला संपवलं याचाच..एक नजर लिबियातल्या या 8 महिन्यातल्या रक्तरंजित प्रवासावर.....मध्य आशियात ट्युनिशिया, इजिप्त लिबिया, सीरिया या देशात यावर्षीच्या सुरुवातीला सत्ताधारी हुकूमशहांविरोधात आंदोलन पेटलं. मानविधाकार कार्यकर्ता फेथी टार्बेल याच्या अटकेमुळे लिबियातल्या बेंगझाईतही हिंसाचाराला सुरुवात झाली. पूर्व लिबियाकडे गद्दाफींचं पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारने राजीनामा द्यावा आणि सत्ता सोडावी अशी बंडखोरांची मागणी होती. 2011 च्या फेब्रुवारीमध्ये गद्दाफींनी या मागण्या मान्य न करण्याची घोषणा केली. आणि लिबियात आंदोलनाला सुरुवात झाली. आणि आदोलनं चिघळलं. ट्युनिशिया आणि इजिप्तपासून प्रेरणा घेत गेल्या फेब्रुवारीपासून लिबियातही जनआंदोलन पेटलं. आणि त्याला अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा मिळाला. अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या सैन्यानं मार्च महिन्यात गद्दाफीविरोधात लष्करी कारवाई सुरू केली. 17 मार्च नंतर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राने लिबियात हस्तक्षेप केला. आणि तिथं नो फ्लाय झोन जाहीर केलं. 18 मार्चच्या रात्री संयुक्त राष्ट्रांनी लिबियावर हल्ला चढवला. त्यानंतर बंडखोरांनी मिसरता हे महत्त्वाचं शहर ताब्यात घेतलं. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने गद्दाफी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध लादले. याच महिन्यात एनटीसी (NTC) म्हणजेच रिबेल नॅशनल ट्रांझिशनल काऊन्सिलने बेंगझाईमध्ये स्वतःला लिबियाचे एकमेव प्रतिनिधी म्हणून जाहीर केलं. 19 मार्च रोजी नाटोनं लिबियावर पहिला हवाई हल्ला केला. 30 एप्रिल रोजी त्रिपोलीत नाटोच्या मिसाईल हल्ल्यात गद्दाफीचा सर्वात लहान मुलगा आणि तीन नातवंडांचा मृत्यू झाला. 21 ऑगस्ट रोजी बंडखोरांनी त्रिपोलीत प्रवेश केला. आणि त्यानंतर गद्दाफी आपल्या दोन मुलांसह त्रिपोलीच्या बाहेर पळून गेला. याच काळात अमेरिकेच्या परराष्ट्रमत्री हिलरी क्लिंटन यांनी लिबियाला भेट दिली. आणि गद्दाफी मृत किंवा जिवंत सापडण्याची आशा व्यक्त केली. 20 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गद्दाफींच्या समर्थकांना शरण येण्याचं आवाहन केलं. पण आपलं जन्मगाव सिर्तेमधून गद्दाफी समर्थकांना लढा सुरूच ठेवला. गेल्या मंगळवारपासून बंडखोरांच्या फौजांनी सिर्तेवर हल्ल्याचा रेटा वाढवला. त्याची दोन मुलं अजून नेमकी कुठं लपलेली आहेत, याचा पत्ता लागलेला नाहीय.

  • Share this:

20 ऑक्टोबर

फेब्रुवारीपासून लिबियात गद्दाफीच्या रावटीविरोधात आंदोलन पेटलं होतं. आज त्याचा शेवट झाला. गेले 8 महिने धुमसणार्‍या लिबियात बंडखोरांचा जल्लोष आहे, तो हुकूमशहा गद्दाफीला संपवलं याचाच..एक नजर लिबियातल्या या 8 महिन्यातल्या रक्तरंजित प्रवासावर.....मध्य आशियात ट्युनिशिया, इजिप्त लिबिया, सीरिया या देशात यावर्षीच्या सुरुवातीला सत्ताधारी हुकूमशहांविरोधात आंदोलन पेटलं. मानविधाकार कार्यकर्ता फेथी टार्बेल याच्या अटकेमुळे लिबियातल्या बेंगझाईतही हिंसाचाराला सुरुवात झाली. पूर्व लिबियाकडे गद्दाफींचं पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारने राजीनामा द्यावा आणि सत्ता सोडावी अशी बंडखोरांची मागणी होती. 2011 च्या फेब्रुवारीमध्ये गद्दाफींनी या मागण्या मान्य न करण्याची घोषणा केली. आणि लिबियात आंदोलनाला सुरुवात झाली. आणि आदोलनं चिघळलं.

ट्युनिशिया आणि इजिप्तपासून प्रेरणा घेत गेल्या फेब्रुवारीपासून लिबियातही जनआंदोलन पेटलं. आणि त्याला अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा मिळाला. अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या सैन्यानं मार्च महिन्यात गद्दाफीविरोधात लष्करी कारवाई सुरू केली. 17 मार्च नंतर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राने लिबियात हस्तक्षेप केला. आणि तिथं नो फ्लाय झोन जाहीर केलं. 18 मार्चच्या रात्री संयुक्त राष्ट्रांनी लिबियावर हल्ला चढवला. त्यानंतर बंडखोरांनी मिसरता हे महत्त्वाचं शहर ताब्यात घेतलं.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने गद्दाफी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध लादले. याच महिन्यात एनटीसी (NTC) म्हणजेच रिबेल नॅशनल ट्रांझिशनल काऊन्सिलने बेंगझाईमध्ये स्वतःला लिबियाचे एकमेव प्रतिनिधी म्हणून जाहीर केलं. 19 मार्च रोजी नाटोनं लिबियावर पहिला हवाई हल्ला केला. 30 एप्रिल रोजी त्रिपोलीत नाटोच्या मिसाईल हल्ल्यात गद्दाफीचा सर्वात लहान मुलगा आणि तीन नातवंडांचा मृत्यू झाला. 21 ऑगस्ट रोजी बंडखोरांनी त्रिपोलीत प्रवेश केला. आणि त्यानंतर गद्दाफी आपल्या दोन मुलांसह त्रिपोलीच्या बाहेर पळून गेला. याच काळात अमेरिकेच्या परराष्ट्रमत्री हिलरी क्लिंटन यांनी लिबियाला भेट दिली. आणि गद्दाफी मृत किंवा जिवंत सापडण्याची आशा व्यक्त केली.

20 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गद्दाफींच्या समर्थकांना शरण येण्याचं आवाहन केलं. पण आपलं जन्मगाव सिर्तेमधून गद्दाफी समर्थकांना लढा सुरूच ठेवला. गेल्या मंगळवारपासून बंडखोरांच्या फौजांनी सिर्तेवर हल्ल्याचा रेटा वाढवला. त्याची दोन मुलं अजून नेमकी कुठं लपलेली आहेत, याचा पत्ता लागलेला नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2011 05:04 PM IST

ताज्या बातम्या