ईशान्य भारतात भूकंपाचे 100 बळी

21 सप्टेंबररविवारी बसलेल्या भूकंपाच्या तडाख्यातून सिक्कीम अजून सावरलेलं नाही. भूकंपातल्या मृतांचा आकडा 100 वर गेला आहे. त्यातले 70 जण सिक्कीममधले आहेत. नुकसानीचा आकडा 1 लाख कोटींच्या घरात आहे अशी माहिती सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी दिली. बचावकार्य सुरू आहे. पण लोकांमध्ये अजून भीती कायम आहे.ईशान्य भारतात रविवारी झालेल्या भूकंपाचा सर्वाधिक फटका सिक्कीमला बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात, रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 9 जिल्हे अजूनही संपर्काच्या बाहेर आहेत. 2 हजारापेक्षा जास्त घरं जमीनदोस्त झाली आहेत. तर जवळपास 1 लाख घरांचं नुकसान झालं आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा हा आकडा तब्बल 1 लाख कोटींच्या घरात आहे. या धक्क्यातून सावरायला सिक्कीमला अनेक महिने लागणार आहेत.मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बागडोरा आणि गंगटोकला जाणारे दोन नॅशनल हायवेज खुले करण्यात लष्कराला यश आलंय. पण, इतर भागात मदतकार्य पोहोचवण्याचे मोठं संकट लष्करापुढे आहे. 400 परदेशी पर्यटक भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या उत्तर सिक्कीममध्ये अडकले आहेत. रस्ते बंद झाल्याने लोकांना भूकंप प्रभावित भागातून बाहेर पडणं कठीण बनलं आहे.गंगटोकसह काही महत्त्वाची शहरं वगळता इतर ठिकाणी अजून मोबाईल आणि फोनची सेवा सुरू झालेली नाही. रविवारच्या धक्क्यातून लोक अजून सावरले नाहीत. पुन्हा भूकंप होईल, या भीतीपोटी घरात जायलाही लोक घाबरत आहेत.दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज सिक्कीमला भेट दिली. आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. राहुल गांधी आज मेघालयला जाणार होते. पण आपला नियोजीत दौरा रद्द करत ते सिक्कीमला गेले. त्यांनी भूकंपग्रस्तांची भेट घेतली आणि तिथली परिस्थिती जाणून घेतली. तुम्हाला भूकंपग्रस्तांसाठी मदत करायची असेल किंवा अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता.सिक्कीम भूकंप हेल्पलाईन अधिक माहितीसाठी संपर्क कराई-मेल - http://www.disasterresponse@indianredcross.orgफोन - 011 2371 6441 फॅक्स - 011 2371 7454तुम्ही सिक्कीमच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी चेक किंवा डीडीनं मदत पाठवू शकता त्यासाठी पत्ता आहे.प्रधान सचिव,मुख्यमंत्री कार्यालयगंगटोक, सिक्कीम-737101

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2011 05:08 PM IST

ईशान्य भारतात भूकंपाचे 100 बळी

21 सप्टेंबर

रविवारी बसलेल्या भूकंपाच्या तडाख्यातून सिक्कीम अजून सावरलेलं नाही. भूकंपातल्या मृतांचा आकडा 100 वर गेला आहे. त्यातले 70 जण सिक्कीममधले आहेत. नुकसानीचा आकडा 1 लाख कोटींच्या घरात आहे अशी माहिती सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी दिली. बचावकार्य सुरू आहे. पण लोकांमध्ये अजून भीती कायम आहे.

ईशान्य भारतात रविवारी झालेल्या भूकंपाचा सर्वाधिक फटका सिक्कीमला बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात, रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 9 जिल्हे अजूनही संपर्काच्या बाहेर आहेत. 2 हजारापेक्षा जास्त घरं जमीनदोस्त झाली आहेत. तर जवळपास 1 लाख घरांचं नुकसान झालं आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा हा आकडा तब्बल 1 लाख कोटींच्या घरात आहे. या धक्क्यातून सावरायला सिक्कीमला अनेक महिने लागणार आहेत.

मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बागडोरा आणि गंगटोकला जाणारे दोन नॅशनल हायवेज खुले करण्यात लष्कराला यश आलंय. पण, इतर भागात मदतकार्य पोहोचवण्याचे मोठं संकट लष्करापुढे आहे. 400 परदेशी पर्यटक भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या उत्तर सिक्कीममध्ये अडकले आहेत. रस्ते बंद झाल्याने लोकांना भूकंप प्रभावित भागातून बाहेर पडणं कठीण बनलं आहे.

गंगटोकसह काही महत्त्वाची शहरं वगळता इतर ठिकाणी अजून मोबाईल आणि फोनची सेवा सुरू झालेली नाही. रविवारच्या धक्क्यातून लोक अजून सावरले नाहीत. पुन्हा भूकंप होईल, या भीतीपोटी घरात जायलाही लोक घाबरत आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज सिक्कीमला भेट दिली. आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. राहुल गांधी आज मेघालयला जाणार होते. पण आपला नियोजीत दौरा रद्द करत ते सिक्कीमला गेले. त्यांनी भूकंपग्रस्तांची भेट घेतली आणि तिथली परिस्थिती जाणून घेतली. तुम्हाला भूकंपग्रस्तांसाठी मदत करायची असेल किंवा अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता.

सिक्कीम भूकंप हेल्पलाईन अधिक माहितीसाठी संपर्क करा

ई-मेल - http://www.disasterresponse@indianredcross.orgफोन - 011 2371 6441 फॅक्स - 011 2371 7454

तुम्ही सिक्कीमच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी चेक किंवा डीडीनं मदत पाठवू शकता त्यासाठी पत्ता आहे.

प्रधान सचिव,मुख्यमंत्री कार्यालयगंगटोक, सिक्कीम-737101

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...