दंगलीच्या नैतिक जबाबदारीला मोदींचा नकार !

दंगलीच्या नैतिक जबाबदारीला मोदींचा नकार !

18 सप्टेंबरमोदींच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. काल मोदींनी गुजरात दंगलीत होरपळलेल्या लोकांबाबत सहानूभुती व्यक्त केली होती. पण या दंगलीची नैतिक जबाबदार घेण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. तसेच पंतप्रधानपदाची इच्छा मनात घेऊन आपण उपोषण करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आमचे आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी वीर राघव यांनी मोदींशी बातचीत केली. यावेळी मोदींनी सर्व विषयांना हात घातला. आपल्या सद्भावना उपवासावर आरोप का होताते मला कळत नाही. माझ्या योजनेला असं रूप का दिलं जात आहे. गुजरात शहराची एक औद्योगिक नगरी म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. आपण देशभरात जर योजनांच्या बाबतीत पाहिलं तर प्रत्येक योजना ही तुकड्या तुकड्याने वाटल्या गेल्या आहे. आणि विकासाला राजकारणाचा मुद्दा बनवला गेला आहे. निवडणुकांसाठी एक मतपेटीचा विचार जोडला गेला आहे. माझ या बाबतीत मत आहे की, जोपर्यंत आपण तुकड्या तुकड्याने काम केलं तर विकास होणं दूर आहे. यासाठी सर्व तुकड्यांना एक करून काम केलं पाहिजे. सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं तर सर्वांचा विकास होईल. असा मंत्र हाती घेऊन सद्भावना उपोषणाचं आयोजन केलं आहे. असं मत मोदींना व्यक्त केलं. गुजरातच्या कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात तक्रार नाही. आजपर्यंत जो काही विकास केला आहे तो सर्वांना याचा लाभ व्हावा या दृष्टीकोनातूनच केला आहे. असंही मोदींनी स्पष्ट केलं. मोदींच्या उपोषणाच्या दुसर्‍या दिवशीही पक्षाचे अनेक नेते तिथं हजेरी लावत आहे. तर हे सद्भावना मिशन आहे. याला आमचा पाठिंबा आहे असं भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. याचिका मागे घेण्यासाठी वकिलाला लाच देण्याचा प्रयत्न - मल्लिका साराभाईदरम्यान, नरेंद्र मोदींवर नित्य नवे आरोप होतच आहेत. आज सामाजिक कार्यकर्त्या मल्लिका साराभाई यांनी गुजरात सरकारविरुद्धची याचिका मागे घेण्यासाठी मोदींनी आपल्या वकिलाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. गुजरात सरकारविरोधातील याचिका मागे घेण्यासाठी मोदींनी माझे वकील कृष्णकांत वखारीया यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी याबाबत काहीही माहित नसल्याचं सांगितलं आहे. त्यांच्याकडे तुषार मेहता नावाचा एक ज्युनियर आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार तुषार मेहता यांना पैसे देण्यात आले. त्यानं ते पैसे अगरवाल एन्ड असोसिएट्स यांना ते दिले असावेत असा दावा केला.

  • Share this:

18 सप्टेंबर

मोदींच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. काल मोदींनी गुजरात दंगलीत होरपळलेल्या लोकांबाबत सहानूभुती व्यक्त केली होती. पण या दंगलीची नैतिक जबाबदार घेण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. तसेच पंतप्रधानपदाची इच्छा मनात घेऊन आपण उपोषण करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आमचे आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी वीर राघव यांनी मोदींशी बातचीत केली. यावेळी मोदींनी सर्व विषयांना हात घातला. आपल्या सद्भावना उपवासावर आरोप का होताते मला कळत नाही. माझ्या योजनेला असं रूप का दिलं जात आहे. गुजरात शहराची एक औद्योगिक नगरी म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. आपण देशभरात जर योजनांच्या बाबतीत पाहिलं तर प्रत्येक योजना ही तुकड्या तुकड्याने वाटल्या गेल्या आहे. आणि विकासाला राजकारणाचा मुद्दा बनवला गेला आहे. निवडणुकांसाठी एक मतपेटीचा विचार जोडला गेला आहे. माझ या बाबतीत मत आहे की, जोपर्यंत आपण तुकड्या तुकड्याने काम केलं तर विकास होणं दूर आहे. यासाठी सर्व तुकड्यांना एक करून काम केलं पाहिजे. सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं तर सर्वांचा विकास होईल. असा मंत्र हाती घेऊन सद्भावना उपोषणाचं आयोजन केलं आहे. असं मत मोदींना व्यक्त केलं. गुजरातच्या कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात तक्रार नाही. आजपर्यंत जो काही विकास केला आहे तो सर्वांना याचा लाभ व्हावा या दृष्टीकोनातूनच केला आहे. असंही मोदींनी स्पष्ट केलं. मोदींच्या उपोषणाच्या दुसर्‍या दिवशीही पक्षाचे अनेक नेते तिथं हजेरी लावत आहे. तर हे सद्भावना मिशन आहे. याला आमचा पाठिंबा आहे असं भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

याचिका मागे घेण्यासाठी वकिलाला लाच देण्याचा प्रयत्न - मल्लिका साराभाई

दरम्यान, नरेंद्र मोदींवर नित्य नवे आरोप होतच आहेत. आज सामाजिक कार्यकर्त्या मल्लिका साराभाई यांनी गुजरात सरकारविरुद्धची याचिका मागे घेण्यासाठी मोदींनी आपल्या वकिलाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. गुजरात सरकारविरोधातील याचिका मागे घेण्यासाठी मोदींनी माझे वकील कृष्णकांत वखारीया यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी याबाबत काहीही माहित नसल्याचं सांगितलं आहे. त्यांच्याकडे तुषार मेहता नावाचा एक ज्युनियर आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार तुषार मेहता यांना पैसे देण्यात आले. त्यानं ते पैसे अगरवाल एन्ड असोसिएट्स यांना ते दिले असावेत असा दावा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 10:16 AM IST

ताज्या बातम्या