खाणसम्राट बंधूंची कोठडीत रवानगी

खाणसम्राट बंधूंची कोठडीत रवानगी

05 सप्टेंबरकर्नाटकातील खाणसम्राट रेड्डी बंधूंवर अखेरीस सीबीआयने कारवाई केली. येडियुरप्पा सरकारमधील मंत्री आणि भाजपचे आमदार जनार्दन रेड्डी आणि त्याचा मेहुणा श्रीनिवास रेड्डी यांना आज अटक करण्यात आली. आणि हैद्राबादमधल्या विशेष कोर्टाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी रेड्डींवर लोकायुक्तांनी ठपका ठेवला होता. आणि सुप्रीम कोर्टाने ताशेरेही ओढले होते. या अटकेमुळे कर्नाटक आणि आंध्राच्या सीमेवर राजकीय भूकंप झाला आहेत. आधी कर्नाटकातला मंत्री. खाणींचा सम्राट आणि आता हैद्राबादेतल्या चांचलगुडा तुरुंगातला आरोपी. जनार्दन रेड्डी. अजूनही दावा करतो की तो निर्दोष आहेत. पण सीबीआयला विश्वास आहे की बेल्लारीचा कुप्रसिद्ध माफिया आता त्यांच्या तावडीत सापडला आहे. सोमवारी सकाळी सीबीआयच्या 10 जणांच्या पथकाने जनार्दन रेड्डी आणि त्याचा मेहुणा श्रीनिवास यांना बेल्लारी आणि बंगळुरू इथून अटक केली. बेकायदेशीर खाणकाम करताना फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या घरातून 30 किलो सोनं, साडे चार कोटी रुपये रोख आणि महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली. हैद्राबादमधल्या विशेष कोर्टाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीने शिफारस केल्यानंतर 2009 साली रेड्डी बंधूंच्या ओबुलापुरम खाण कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. दीड हजार पानांचे पुरावे गोळा केल्यानंतर आणि 85 जणांची साक्ष नोंदवल्यानंतर सीबीआयने रेड्डी बंधूंना अटक केली. पण कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला बेल्लारीच्या पापाचे धनी फक्त दोघे रेड्डी भाऊच नाही. त्यांचे लागेबांधे कर्नाटक, आंध्र आणि दिल्लीतल्या बड्या राजकीय नेत्यांशी आहेत. जगनमोहन रेड्डी अडचणीतकर्नाटकातल्या रेड्डी बधूंना अटक केल्याने आता आंध्रप्रदेशचे जगनमोहन रेड्डी हेसुद्धा अडचणीत आलेत. कारण जगनमोहन यांचे रेड्डी बंधूंशी जवळचे संबंध आहेत. जगनमोहन यांच्याविरोधातही सीबीआयची कारवाई सुरू झाली. तर दुसरीकडे रेड्डी बंधूंशी संबंध असल्याच्या आरोपावरून भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली. बेल्लारीच्या रेड्डी बंधूंशी संबंध असल्याचा आरोप जगनमोहन रेड्डी कितीही नाकारत असले तरी वास्तव वेगळं आहे. जगनमोहन यांचे वडील आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर राजशेखर रेड्डी यांनी कर्नाटकात रेड्डी बधूंसाठी निवडणूक प्रचार केल्याचा आरोप आहे. आणि आता गाली जनार्दन रेड्डी यांची अटक म्हणजे काँग्रेसविरोधात दंड थोपटलेल्या जगनमोहन यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.2010 मध्ये रेड्डी बंधूंनी येडियुरप्पा यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. त्यावेळी जगनमोहन यांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जातंय. जनार्दन रेड्डी यांची अटक झाली असतानाच आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्याभोवती सीबीआयचा पाशही आवळत चालला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सीबीआय जगनमोहन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या तयारीत आहे. हा राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत जगनमोहन यांनी भाजपशी जवळकीचे संकेत दिले आहेत. दरम्यान ही संधी साधत काँग्रेसने सुषमा स्वराज आणि व्यंकय्या नायडू यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांचे रेड्डी बंधूंशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली. सुषमा स्वराजनी दिग्विजय सिंहांना उत्तर दिलंय. ही चौकशी व्हावी, म्हणजे सत्य समोर येईल असं स्वराज यांनी म्हटले आहे. सध्या कर्नाटकातील सरकार स्थिर ठेवणं ही भाजपासाठी चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळेच भाजपने भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेऊनही रेड्डी बंधूंना हात लावण्याचे धाडस केलं नव्हतं. पण, सीबीआयच्या कारवाईमुळे आता भाजपचे संकट वाढले. आणि याची छळ आंध्रप्रदेशातल्या राजकारणालाही बसण्याची शक्यता आहे.कोण आहेत रेड्डी बंधू ?गाली जनार्दन रेड्डी हे भाजपचे कर्नाटकातील आमदार आहे. जनार्दन, श्रीनिवास, श्रीरामुलू, करुणाकर आणि सोमशेखर ओबुलापुरम् खाण कंपनीचे मालक आहे. कर्नाटकात बेल्लारी आणि आंध्र प्रदेशात अनंतपूरमध्ये कोट्यवधींचा खाण उद्योग. बेकायदेशीर पद्धतीने खाणकाम केल्याचा लोकायुक्तांचा ठपका आणि सुप्रीम कोर्टाचे ताशेरे येडियुरप्पा सरकार बनवण्यात मोठा वाटा 1999 च्या लोकसभा निवजणुकीत मदत केल्यामुळे सुषमा स्वराज यांच्याशी जवळीक होती.

  • Share this:

05 सप्टेंबर

कर्नाटकातील खाणसम्राट रेड्डी बंधूंवर अखेरीस सीबीआयने कारवाई केली. येडियुरप्पा सरकारमधील मंत्री आणि भाजपचे आमदार जनार्दन रेड्डी आणि त्याचा मेहुणा श्रीनिवास रेड्डी यांना आज अटक करण्यात आली. आणि हैद्राबादमधल्या विशेष कोर्टाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी रेड्डींवर लोकायुक्तांनी ठपका ठेवला होता. आणि सुप्रीम कोर्टाने ताशेरेही ओढले होते. या अटकेमुळे कर्नाटक आणि आंध्राच्या सीमेवर राजकीय भूकंप झाला आहेत.

आधी कर्नाटकातला मंत्री. खाणींचा सम्राट आणि आता हैद्राबादेतल्या चांचलगुडा तुरुंगातला आरोपी. जनार्दन रेड्डी. अजूनही दावा करतो की तो निर्दोष आहेत. पण सीबीआयला विश्वास आहे की बेल्लारीचा कुप्रसिद्ध माफिया आता त्यांच्या तावडीत सापडला आहे. सोमवारी सकाळी सीबीआयच्या 10 जणांच्या पथकाने जनार्दन रेड्डी आणि त्याचा मेहुणा श्रीनिवास यांना बेल्लारी आणि बंगळुरू इथून अटक केली.

बेकायदेशीर खाणकाम करताना फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या घरातून 30 किलो सोनं, साडे चार कोटी रुपये रोख आणि महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली. हैद्राबादमधल्या विशेष कोर्टाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीने शिफारस केल्यानंतर 2009 साली रेड्डी बंधूंच्या ओबुलापुरम खाण कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. दीड हजार पानांचे पुरावे गोळा केल्यानंतर आणि 85 जणांची साक्ष नोंदवल्यानंतर सीबीआयने रेड्डी बंधूंना अटक केली. पण कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला बेल्लारीच्या पापाचे धनी फक्त दोघे रेड्डी भाऊच नाही. त्यांचे लागेबांधे कर्नाटक, आंध्र आणि दिल्लीतल्या बड्या राजकीय नेत्यांशी आहेत.

जगनमोहन रेड्डी अडचणीत

कर्नाटकातल्या रेड्डी बधूंना अटक केल्याने आता आंध्रप्रदेशचे जगनमोहन रेड्डी हेसुद्धा अडचणीत आलेत. कारण जगनमोहन यांचे रेड्डी बंधूंशी जवळचे संबंध आहेत. जगनमोहन यांच्याविरोधातही सीबीआयची कारवाई सुरू झाली. तर दुसरीकडे रेड्डी बंधूंशी संबंध असल्याच्या आरोपावरून भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली.

बेल्लारीच्या रेड्डी बंधूंशी संबंध असल्याचा आरोप जगनमोहन रेड्डी कितीही नाकारत असले तरी वास्तव वेगळं आहे. जगनमोहन यांचे वडील आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर राजशेखर रेड्डी यांनी कर्नाटकात रेड्डी बधूंसाठी निवडणूक प्रचार केल्याचा आरोप आहे. आणि आता गाली जनार्दन रेड्डी यांची अटक म्हणजे काँग्रेसविरोधात दंड थोपटलेल्या जगनमोहन यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

2010 मध्ये रेड्डी बंधूंनी येडियुरप्पा यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. त्यावेळी जगनमोहन यांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जातंय. जनार्दन रेड्डी यांची अटक झाली असतानाच आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्याभोवती सीबीआयचा पाशही आवळत चालला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सीबीआय जगनमोहन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या तयारीत आहे. हा राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत जगनमोहन यांनी भाजपशी जवळकीचे संकेत दिले आहेत.

दरम्यान ही संधी साधत काँग्रेसने सुषमा स्वराज आणि व्यंकय्या नायडू यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांचे रेड्डी बंधूंशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली.

सुषमा स्वराजनी दिग्विजय सिंहांना उत्तर दिलंय. ही चौकशी व्हावी, म्हणजे सत्य समोर येईल असं स्वराज यांनी म्हटले आहे. सध्या कर्नाटकातील सरकार स्थिर ठेवणं ही भाजपासाठी चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळेच भाजपने भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेऊनही रेड्डी बंधूंना हात लावण्याचे धाडस केलं नव्हतं. पण, सीबीआयच्या कारवाईमुळे आता भाजपचे संकट वाढले. आणि याची छळ आंध्रप्रदेशातल्या राजकारणालाही बसण्याची शक्यता आहे.

कोण आहेत रेड्डी बंधू ?

गाली जनार्दन रेड्डी हे भाजपचे कर्नाटकातील आमदार आहे. जनार्दन, श्रीनिवास, श्रीरामुलू, करुणाकर आणि सोमशेखर ओबुलापुरम् खाण कंपनीचे मालक आहे. कर्नाटकात बेल्लारी आणि आंध्र प्रदेशात अनंतपूरमध्ये कोट्यवधींचा खाण उद्योग. बेकायदेशीर पद्धतीने खाणकाम केल्याचा लोकायुक्तांचा ठपका आणि सुप्रीम कोर्टाचे ताशेरे येडियुरप्पा सरकार बनवण्यात मोठा वाटा 1999 च्या लोकसभा निवजणुकीत मदत केल्यामुळे सुषमा स्वराज यांच्याशी जवळीक होती.

First published: September 5, 2011, 4:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading