उपोषण मागे नाहीच, अण्णांचं पंतप्रधानांना पत्र

उपोषण मागे नाहीच, अण्णांचं पंतप्रधानांना पत्र

26 ऑगस्टजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असं ठणकावून पंतप्रधानांना सांगितले. अण्णांच्या उपोषणाच्या आज 11 दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून सरकार आणि टीम अण्णांमध्ये चर्चेची रस्सीखेचेला पूर्णविराम मिळणार अशी दाट शक्यता निर्माण झाली होती मात्र असं होऊ शकलं नाही. आज जनलोकपाल विधेयकावर संसदेत चर्चा झाली. लोकपाल विधेयकावर राहुल गांधी यांनी भूमिका मांडत लोकपाल विधेयक हे भ्रष्टाचार संपवण्यास पुरेसं नाही असं स्पष्टीकरण दिलं. यानंतर अण्णांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. आपल्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल अण्णांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पण जो पर्यंत आपल्या अटी मान्य मान्य होत नाही आपण आपलं उपोषण सोडणार नाही असं ही स्पष्ट केलं. मी कोणत्याही स्वार्थासाठी उपोषणाला बसलो नाही. ज्या प्रकारे आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य करत आहात. मी सुध्दा तसाच विचार करत आहे. माझ्याकडे कोणतीही सत्ता नाही. मी एक सामान्य नागरिक आहे. आणि सर्वसामान्य जनतेसाठी काही करण्याची इच्छा आहे. आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आंदोलन हे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आहे. या आंदोलनाच्या काळात आमच्या टीमकडून काही शब्द चुकीचे वापरले गेले असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणाला दुख पोचवण्याचा आमचा हेतू नाही. सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचाराला सामोर जावं लागतं आहे. याचा पूर्णपणे नायनाट करणे आज महत्वाचे आहे. - कनिष्ठ अधिकारीसुद्धा लोकपालाच्या कक्षेत आणा- सर्व राज्यात लोकायुक्त नेमावेत- विशिष्ट मुदतीत काम झालंच पाहिजे, याचं बंधन अधिकार्‍यांवर असावंया तीन अटी संसदेत आणता येईल का ? मला पूर्ण विश्वास आहे की सर्व सदस्य या मागन्यासाठी सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी आपला पाठिंबा देतील. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही मी माझं उपोषण सोडणार नाही. जोपर्यंत संसदेत काही निर्णय होत नाही तोपर्यंत मी माझ्या समर्थकांसह रामलीला मैदानावरच बसून राहील. कारण हा जनतेचा आवाज आहे.भ्रष्टाचाराविरोधात या आंदोलनात सर्व संसद सदस्यांना सहभागी होण्यासाठी मी आवाहन करतो. आपण सर्व मिळून हे सुधारू शकतो. - कि.बा.उर्फ अण्णा हजारे

  • Share this:

26 ऑगस्ट

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असं ठणकावून पंतप्रधानांना सांगितले. अण्णांच्या उपोषणाच्या आज 11 दिवस आहे.

गेल्या चार दिवसांपासून सरकार आणि टीम अण्णांमध्ये चर्चेची रस्सीखेचेला पूर्णविराम मिळणार अशी दाट शक्यता निर्माण झाली होती मात्र असं होऊ शकलं नाही. आज जनलोकपाल विधेयकावर संसदेत चर्चा झाली. लोकपाल विधेयकावर राहुल गांधी यांनी भूमिका मांडत लोकपाल विधेयक हे भ्रष्टाचार संपवण्यास पुरेसं नाही असं स्पष्टीकरण दिलं. यानंतर अण्णांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं.

आपल्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल अण्णांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पण जो पर्यंत आपल्या अटी मान्य मान्य होत नाही आपण आपलं उपोषण सोडणार नाही असं ही स्पष्ट केलं. मी कोणत्याही स्वार्थासाठी उपोषणाला बसलो नाही. ज्या प्रकारे आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य करत आहात. मी सुध्दा तसाच विचार करत आहे. माझ्याकडे कोणतीही सत्ता नाही. मी एक सामान्य नागरिक आहे. आणि सर्वसामान्य जनतेसाठी काही करण्याची इच्छा आहे.

आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आंदोलन हे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आहे. या आंदोलनाच्या काळात आमच्या टीमकडून काही शब्द चुकीचे वापरले गेले असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणाला दुख पोचवण्याचा आमचा हेतू नाही. सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचाराला सामोर जावं लागतं आहे. याचा पूर्णपणे नायनाट करणे आज महत्वाचे आहे. - कनिष्ठ अधिकारीसुद्धा लोकपालाच्या कक्षेत आणा- सर्व राज्यात लोकायुक्त नेमावेत- विशिष्ट मुदतीत काम झालंच पाहिजे, याचं बंधन अधिकार्‍यांवर असावं

या तीन अटी संसदेत आणता येईल का ? मला पूर्ण विश्वास आहे की सर्व सदस्य या मागन्यासाठी सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी आपला पाठिंबा देतील. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही मी माझं उपोषण सोडणार नाही. जोपर्यंत संसदेत काही निर्णय होत नाही तोपर्यंत मी माझ्या समर्थकांसह रामलीला मैदानावरच बसून राहील. कारण हा जनतेचा आवाज आहे.भ्रष्टाचाराविरोधात या आंदोलनात सर्व संसद सदस्यांना सहभागी होण्यासाठी मी आवाहन करतो. आपण सर्व मिळून हे सुधारू शकतो.

- कि.बा.उर्फ अण्णा हजारे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2011 10:41 AM IST

ताज्या बातम्या