विलासराव करणार मध्यस्थी ?

23 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस. अण्णांच्या प्रकृतीबद्दल सरकारला चिंता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनिया गांधींना सर्व घडामोडींची माहिती देण्यात आली आहे असंही सूत्रांनी सांगितले. उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीसंदर्भातही सोनियांना माहिती असल्याचे समजतंय. अरविंद केजरीवाल सलमान खुर्शीद यांच्या संपर्कात आहेत. तसेच या आठवड्यात तिढा सुटण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितले. मध्यस्थ म्हणून विलासरावांची भूमिकाही महत्वाची मानली जात आहे. विलासरावांनी राज्यात अण्णांची उपोषणे हाताळली असल्याने विलासरावांची मदत घेण्यात येणार असल्याचे समजतं आहे. माहितीचा अधिकार, ग्रामविकास योजना अशा अनेक प्रश्नी अण्णांनी आतापर्यंत 15 उपोषण केली आहे. अण्णांच्या उपोषणाच्या वेळी राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अण्णांशी चर्चा करून वाटाघाटी केली आहे. यावेळी सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख तसेच गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांनी महत्वाचा वाटा उचलला आहे. आता अण्णांचे 16 वे उपोषण थेट राज्याचा उंबरठा ओलांडून दिल्ली दरबारी रामलीला मैदानावर सुरू आहे. टीम अण्णांनी, 'आपण चर्चा करणार तर थेट पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्याशीच. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही' अशी घोषणा करून सरकारला चांगलेच पेचात पाडले आहे. जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाच्यावेळी केंद्रातील मंत्र्यांनी पुढाकार घेऊल वाटाघाटी केली होती. पण आता परिस्थीती वेगळीच आहे. 30 ऑगस्टपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर करा अन्यथा चालते व्हा असा इशारा टीम अण्णांनी दिला आहे. आता अण्णांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांनीही मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.पण हायकमांडने सांगितले तरच आपण काही करू शकतो असं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे मेधा पाटकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी अशी भूमिका घेतली आहे. आज उपोषणाच्या आठव्यादिवशी अण्णांच्या प्रकृतीबद्दल सरकारला चिंता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनिया गांधींना सर्व घडामोडींची माहिती देण्यात आली आहे असंही सूत्रांनी सांगितले. उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीसंदर्भातही सोनियांना माहिती असल्याचे समजतंय. अरविंद केजरीवाल सलमान खुर्शीद यांच्या संपर्कात आहेत. तसेच या आठवड्यात तिढा सुटण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितले. मध्यस्थ म्हणून विलासरावांची भूमिकाही महत्वाची मानली जात आहे. विलासरावांनी राज्यात अण्णांची उपोषणे हाताळली असल्याने विलासरावांची मदत घेण्यात येणार असल्याचे समजतं आहे. अण्णांचे उपोषण कसं सोडवता येईल असा प्रश्नचं सरकारसमोर उभा ठाकला आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2011 09:34 AM IST

विलासराव करणार मध्यस्थी ?

23 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस. अण्णांच्या प्रकृतीबद्दल सरकारला चिंता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनिया गांधींना सर्व घडामोडींची माहिती देण्यात आली आहे असंही सूत्रांनी सांगितले. उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीसंदर्भातही सोनियांना माहिती असल्याचे समजतंय. अरविंद केजरीवाल सलमान खुर्शीद यांच्या संपर्कात आहेत. तसेच या आठवड्यात तिढा सुटण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितले. मध्यस्थ म्हणून विलासरावांची भूमिकाही महत्वाची मानली जात आहे. विलासरावांनी राज्यात अण्णांची उपोषणे हाताळली असल्याने विलासरावांची मदत घेण्यात येणार असल्याचे समजतं आहे.

माहितीचा अधिकार, ग्रामविकास योजना अशा अनेक प्रश्नी अण्णांनी आतापर्यंत 15 उपोषण केली आहे. अण्णांच्या उपोषणाच्या वेळी राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अण्णांशी चर्चा करून वाटाघाटी केली आहे. यावेळी सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख तसेच गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांनी महत्वाचा वाटा उचलला आहे.

आता अण्णांचे 16 वे उपोषण थेट राज्याचा उंबरठा ओलांडून दिल्ली दरबारी रामलीला मैदानावर सुरू आहे. टीम अण्णांनी, 'आपण चर्चा करणार तर थेट पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्याशीच. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही' अशी घोषणा करून सरकारला चांगलेच पेचात पाडले आहे.

जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाच्यावेळी केंद्रातील मंत्र्यांनी पुढाकार घेऊल वाटाघाटी केली होती. पण आता परिस्थीती वेगळीच आहे. 30 ऑगस्टपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर करा अन्यथा चालते व्हा असा इशारा टीम अण्णांनी दिला आहे. आता अण्णांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांनीही मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.पण हायकमांडने सांगितले तरच आपण काही करू शकतो असं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे मेधा पाटकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी अशी भूमिका घेतली आहे. आज उपोषणाच्या आठव्यादिवशी अण्णांच्या प्रकृतीबद्दल सरकारला चिंता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोनिया गांधींना सर्व घडामोडींची माहिती देण्यात आली आहे असंही सूत्रांनी सांगितले. उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीसंदर्भातही सोनियांना माहिती असल्याचे समजतंय. अरविंद केजरीवाल सलमान खुर्शीद यांच्या संपर्कात आहेत. तसेच या आठवड्यात तिढा सुटण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितले. मध्यस्थ म्हणून विलासरावांची भूमिकाही महत्वाची मानली जात आहे.

विलासरावांनी राज्यात अण्णांची उपोषणे हाताळली असल्याने विलासरावांची मदत घेण्यात येणार असल्याचे समजतं आहे. अण्णांचे उपोषण कसं सोडवता येईल असा प्रश्नचं सरकारसमोर उभा ठाकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2011 09:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...