अण्णा हजारे उद्या तिहारबाहेर

18 ऑगस्टतिहार तुरुंगाच्या बाहेर अण्णा कधी पडणार हाच प्रश्न आज त्यांच्या समर्थकांना पडला होता. पण त्यांची आजही थोडी निराशा झाली. रामलीला मैदानात तयारी व्हायला वेळ लागतोय. त्यामुळे अण्णा उद्या सकाळी तिथे जातील. दरम्यान, अण्णांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या काही बिगर सरकारी संस्थांच्या मदतीने या चर्चेला सुरवात होण्याची शक्यता आहे.हम भी अन्ना.. तुम भी अन्ना.. अब सारा देश है अन्ना.. असे नारे देत शेकडो तरूण.. तिहार तुरुंगाच्या गेट नंबर 4 वर दिवसभर अण्णांची वाट पाहात उभे होते. पोलिसांशी वाटाघाटी यशस्वी झाल्यानंतर बुधवारी रात्री अण्णांना रामलीला मैदानात 15 दिवस उपोषण करण्याची परवानगी देण्यात आली. मग गुरुवारी सकाळी रामलीला मैदानात तयारीला सुरवात झाली. पण पावसामुळे साफसफाई व इतर कामांत वेळ लागतोय. म्हणून आता अण्णा शुक्रवारी सकाळीच तिथं जातील.अण्णांच्या उपोषणाचा तिसरा दिवस उलटला. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारचा कयास आहे की पाचव्या किंवा सहाव्या दिवसानंतर अण्णांची प्रकृती स्थिर राहू शकण्याची शक्यता कमी आहे. त्यानिमित्ताने त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये हलवून रामलीला मैदानातल्या आंदोलनात अडथळा आणला जाऊ शकतो. तसेच, सरकारला मिळालेल्या माहितीनुसार.अण्णांच्या आंदोलनाला येत्या काही दिवसात पाठिंबा कमी होऊ शकतो. म्हणूनच सुरवातीला सरकारचे मंत्री अण्णांशी वाटाघाटी करण्याची शक्यता कमी आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या काही बिगर सरकारी संस्थांना मध्यस्थीसाठी बोलवले जाणार आहे. पण जनलोकपालाचा मसुदा संसदेच्या पटलावर ठेवत नाहीत. तोवर मी उपोषण मागे घेणार नाही, या मागणीवर अण्णा आणि त्यांची टीम ठाम आहे. 'रामलीला'परिसरात कोंबिंग ऑपरेशन रामलीला मैदानावर उपोषणाचा अण्णांचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मैदानावर कोंबिंग ऑपरेशन सुरु केले आहे. श्वानपथक आणि मेटल डिटेक्टर्ससह पोलीस मैदानाची कसून तपासणी करत आहे. तपासणी पूर्ण होईपर्यंत मीडियासहित मैदानात असणार्‍या सगळ्यांना सुरक्षातपासणीसाठी मैदानाबाहेर जाण्यास सांगण्यात आले.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2011 08:19 AM IST

अण्णा हजारे उद्या तिहारबाहेर

18 ऑगस्ट

तिहार तुरुंगाच्या बाहेर अण्णा कधी पडणार हाच प्रश्न आज त्यांच्या समर्थकांना पडला होता. पण त्यांची आजही थोडी निराशा झाली. रामलीला मैदानात तयारी व्हायला वेळ लागतोय. त्यामुळे अण्णा उद्या सकाळी तिथे जातील. दरम्यान, अण्णांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या काही बिगर सरकारी संस्थांच्या मदतीने या चर्चेला सुरवात होण्याची शक्यता आहे.

हम भी अन्ना.. तुम भी अन्ना.. अब सारा देश है अन्ना.. असे नारे देत शेकडो तरूण.. तिहार तुरुंगाच्या गेट नंबर 4 वर दिवसभर अण्णांची वाट पाहात उभे होते. पोलिसांशी वाटाघाटी यशस्वी झाल्यानंतर बुधवारी रात्री अण्णांना रामलीला मैदानात 15 दिवस उपोषण करण्याची परवानगी देण्यात आली. मग गुरुवारी सकाळी रामलीला मैदानात तयारीला सुरवात झाली. पण पावसामुळे साफसफाई व इतर कामांत वेळ लागतोय. म्हणून आता अण्णा शुक्रवारी सकाळीच तिथं जातील.

अण्णांच्या उपोषणाचा तिसरा दिवस उलटला. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारचा कयास आहे की पाचव्या किंवा सहाव्या दिवसानंतर अण्णांची प्रकृती स्थिर राहू शकण्याची शक्यता कमी आहे. त्यानिमित्ताने त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये हलवून रामलीला मैदानातल्या आंदोलनात अडथळा आणला जाऊ शकतो.

तसेच, सरकारला मिळालेल्या माहितीनुसार.अण्णांच्या आंदोलनाला येत्या काही दिवसात पाठिंबा कमी होऊ शकतो. म्हणूनच सुरवातीला सरकारचे मंत्री अण्णांशी वाटाघाटी करण्याची शक्यता कमी आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या काही बिगर सरकारी संस्थांना मध्यस्थीसाठी बोलवले जाणार आहे. पण जनलोकपालाचा मसुदा संसदेच्या पटलावर ठेवत नाहीत. तोवर मी उपोषण मागे घेणार नाही, या मागणीवर अण्णा आणि त्यांची टीम ठाम आहे.

'रामलीला'परिसरात कोंबिंग ऑपरेशन

रामलीला मैदानावर उपोषणाचा अण्णांचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मैदानावर कोंबिंग ऑपरेशन सुरु केले आहे. श्वानपथक आणि मेटल डिटेक्टर्ससह पोलीस मैदानाची कसून तपासणी करत आहे. तपासणी पूर्ण होईपर्यंत मीडियासहित मैदानात असणार्‍या सगळ्यांना सुरक्षातपासणीसाठी मैदानाबाहेर जाण्यास सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2011 08:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...