संतापजनक! शहीद जवानाच्या पत्नीला विम्याची रक्कम देण्यास विलंब, कंपनीने दिलं 'हे' धक्कादायक कारण

संतापजनक! शहीद जवानाच्या पत्नीला विम्याची रक्कम देण्यास विलंब, कंपनीने दिलं 'हे' धक्कादायक कारण

  • Share this:

रांची, 23 फेब्रुवारी : देशाच्या सेवेसाठी जवान आपल्या प्राणांची आहुती देत असतात. 2014 मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलातील हीरा कुमार झारखंड-बिहारच्या सीमेवर नक्षलींबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. त्यांना 2016 मध्ये त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईनतंर बिहार आणि झारखंड सरकारने शहीद हीरा कुमार यांच्या कुटुंबाला मदतीच्या अनेक घोषणा केल्या. त्यात पत्नीला नोकरी आणि जमिन देण्याचं दोन्ही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. बीएस्सी आणि बीएड झालेल्या हीरा कुमार यांच्या पत्नीला अजूनही नोकरी मिळाली नाही. इतकंच काय सीआरपीएफ जवानांचा विमा उतरवणाऱ्या कंपनीनेदेखील अद्याप विम्याची रक्कम दिलेली नाही.

याबाबत हीरा कुमार यांची पत्नी बीनू झाने न्यूज 18 सोबत बोलताना सांगितले की, सीआरपीएफचे अधिकारी स्वत: विमा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. पण तरीही गेल्य़ा 4 वर्षांपासून कंपनीने विम्याची रक्कम दिलेली नाही. जेव्हा विम्याची रक्कम न देण्याचं कारण विचारलं तेव्हा कंपनीने सांगितलं की, जिथं हीरा कुमार शहीद झाले तो भाग नक्षली भागात येत नाही. त्याचबरोबर हीरा कुमार यांचे नाव झारखंडमध्ये असून ते बिहार राज्यात शहीद झाले असंही धक्कादायक कारण कंपनीने सांगितलं आहे.

हीरा कुमार यांची पत्नी बीनू झा आणि सीआरपीएफचे अधिकारी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. याबद्दल अनेक नेत्यांची भेट घेतली आहे तरीही यावर काहीच सुनावणी झालेली नाही. विमा कंपनीच्या मुंबई मुख्यालयात याबाबत संपर्क साधला असता या प्रकरणाची फाईल मागवली असून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे.

गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हे प्रकरण आताच मला समजले. याची संपूर्ण माहिती घेऊन कंपनीशी चर्चा करेन. जर शहीद जवानाचे कुटुंबाला काही चर्चा करायची असेल तर त्यांचीही भेट घेण्याची तयारी अहीर यांनी दर्शवली आहे.

First published: February 23, 2019, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading