'आरक्षण'च्या प्रदर्शनावर बंदी

'आरक्षण'च्या प्रदर्शनावर बंदी

08 ऑगस्टआधीच वादात सापडलेल्या आरक्षण सिनेमावर आता एक नवीन संकट आलं आहे. हा सिनेमा रिलीज करण्यास मद्रास हायकोर्टाने बंदी घातली आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी जीजी (GG) फोटो या कंपनीचे पावणे चार कोटी रुपये थकवले असल्याने या कंपनीने निर्मात्यांविरोधात याचिका दाखल केली होती. थकबाकी देईपर्यंत सिनेमा प्रदर्शित न करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे.दरम्यान, येत्या शुक्रवारी आरक्षण सिनेमा प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण सज्ज असल्याचे गृहखात्याने मुंबई हायकोर्टाला कळवले आहे. त्याच बरोबर प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे स्क्रीनिंग दाखवावे अशी मागणी आपण निर्मात्यांना करणार असल्याचंही गृहखात्याने कळवले. पण एकीकडे गृहखात्याने अशी ग्वाही दिली असताना कोल्हापूरमध्ये पोलिसांनीच थिएटर मालकांना पत्रं लिहून आरक्षण सिनेमा न दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. या चित्रपटामुळे दलितांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा आशयाचे पत्र पोलिसांनी शहरातल्या पार्वती मल्टिप्लेक्स आणि अयोध्या टॉकीज या दोन थिएटर मालकांना लिहीले आहे.

  • Share this:

08 ऑगस्ट

आधीच वादात सापडलेल्या आरक्षण सिनेमावर आता एक नवीन संकट आलं आहे. हा सिनेमा रिलीज करण्यास मद्रास हायकोर्टाने बंदी घातली आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी जीजी (GG) फोटो या कंपनीचे पावणे चार कोटी रुपये थकवले असल्याने या कंपनीने निर्मात्यांविरोधात याचिका दाखल केली होती. थकबाकी देईपर्यंत सिनेमा प्रदर्शित न करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे.

दरम्यान, येत्या शुक्रवारी आरक्षण सिनेमा प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण सज्ज असल्याचे गृहखात्याने मुंबई हायकोर्टाला कळवले आहे. त्याच बरोबर प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे स्क्रीनिंग दाखवावे अशी मागणी आपण निर्मात्यांना करणार असल्याचंही गृहखात्याने कळवले. पण एकीकडे गृहखात्याने अशी ग्वाही दिली असताना कोल्हापूरमध्ये पोलिसांनीच थिएटर मालकांना पत्रं लिहून आरक्षण सिनेमा न दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. या चित्रपटामुळे दलितांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा आशयाचे पत्र पोलिसांनी शहरातल्या पार्वती मल्टिप्लेक्स आणि अयोध्या टॉकीज या दोन थिएटर मालकांना लिहीले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 11:39 AM IST

ताज्या बातम्या