राजीव गांधी ट्रस्टच्या जमिनीवरून गांधी कुटुंब अडचणीत

राजीव गांधी ट्रस्टच्या जमिनीवरून गांधी कुटुंब अडचणीत

03 ऑगस्टअनेक घोटाळ्यांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या काँग्रेस पक्षासमोर आता एक नवा पेच निर्माण झाला. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे विश्वस्त असलेल्या राजीव गांधी ट्रस्टने नियमबाह्य पद्धतीने भूखंड मिळवल्याचे प्रकरण आयबीएन नेटवर्कनं उघडकीला आणले. हरियाणातल्या गुरगाव जवळची ही आठ एकर जागा आहे. ते ताब्यात घेणार्‍या मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी राजीनामा द्यावा आणि सोनिया गांधींनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आता भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींनी केली.उत्तर प्रदेशात भूसंदानाविरोधात आंदोलन करणा-या काँग्रेस पक्षाला आता हरियाणात घरचा आहेर मिळाला. हरियाणातल्या भूपिंदरसिंग हुडा यांच्या काँग्रेस सरकारनं. नियमांना वाकवून गुडगावमध्ये राजीव गांधी ट्रस्टला आठ एकर जागा दिल्याचं उघड झाले. तीन दिवसांपूर्वी ही बातमी सगळ्यात आधी आयबीएन नेटवर्कनं दिली. या ट्रस्टचे विश्वस्त सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी असल्यामुळे त्यांच्या दबावामुळे नियम वाकवले गेले, असं गावकर्‍यांचे म्हणणं आहे.या बातमीचे पडसाद संसदेत पाहायला मिळाले. विरोधकांनी राज्यसभेत मागणी केली की या प्रकरणी सोनिया गांधींनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच गैरमार्गाने जमीन संपादित करणा-या मुख्यमंत्री हूडा यांनी राजीनामा द्यावा. गुडगावमधील भूसंपादन नियमांप्रमाणेच झाल्याचा दावा राजीव गांधी ट्रस्टचे सीईओ वाय एस पी थोरात यांनी केला. ही ट्रस्ट जनकल्याणकारी कामं करत असून तिच्या भूसंपादनाची तुलना येडियुरप्पांच्या भूखंड घोटाळ्याशी करणं चुकीचं आहे असं काँग्रेसनं म्हटले आहेत. आयबीएन नेटवर्कने ही बातमी दाखवल्यानंतर हरियाणा सरकारने ताबडतोब जाहीर केलं की राजीव गांधी ट्रस्टला देण्यात आलेल्या 850 एकर जागेबद्दल पुनर्विचार केला जाईल. पण त्यावर गावक-यांचं समाधान झालं नाही. गावक-यांना त्यांची जमीन परत हवी. हरियाणा सरकारशी चर्चा करायला इन्कार करून आता कोर्टाच्याच मार्गाने न्याय मिळवू अशी त्यांची भूमिका आहे. सोनिया गांधींवर जेव्हा ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणी आरोप झाले होते. तेव्हा त्यांनी ताबडतोब खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता त्या काय स्पष्टीकरण देतात. याकडे विरोधक लक्ष ठेवून आहेत.

  • Share this:

03 ऑगस्ट

अनेक घोटाळ्यांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या काँग्रेस पक्षासमोर आता एक नवा पेच निर्माण झाला. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे विश्वस्त असलेल्या राजीव गांधी ट्रस्टने नियमबाह्य पद्धतीने भूखंड मिळवल्याचे प्रकरण आयबीएन नेटवर्कनं उघडकीला आणले. हरियाणातल्या गुरगाव जवळची ही आठ एकर जागा आहे. ते ताब्यात घेणार्‍या मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी राजीनामा द्यावा आणि सोनिया गांधींनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आता भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींनी केली.

उत्तर प्रदेशात भूसंदानाविरोधात आंदोलन करणा-या काँग्रेस पक्षाला आता हरियाणात घरचा आहेर मिळाला. हरियाणातल्या भूपिंदरसिंग हुडा यांच्या काँग्रेस सरकारनं. नियमांना वाकवून गुडगावमध्ये राजीव गांधी ट्रस्टला आठ एकर जागा दिल्याचं उघड झाले. तीन दिवसांपूर्वी ही बातमी सगळ्यात आधी आयबीएन नेटवर्कनं दिली. या ट्रस्टचे विश्वस्त सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी असल्यामुळे त्यांच्या दबावामुळे नियम वाकवले गेले, असं गावकर्‍यांचे म्हणणं आहे.

या बातमीचे पडसाद संसदेत पाहायला मिळाले. विरोधकांनी राज्यसभेत मागणी केली की या प्रकरणी सोनिया गांधींनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच गैरमार्गाने जमीन संपादित करणा-या मुख्यमंत्री हूडा यांनी राजीनामा द्यावा. गुडगावमधील भूसंपादन नियमांप्रमाणेच झाल्याचा दावा राजीव गांधी ट्रस्टचे सीईओ वाय एस पी थोरात यांनी केला. ही ट्रस्ट जनकल्याणकारी कामं करत असून तिच्या भूसंपादनाची तुलना येडियुरप्पांच्या भूखंड घोटाळ्याशी करणं चुकीचं आहे असं काँग्रेसनं म्हटले आहेत.

आयबीएन नेटवर्कने ही बातमी दाखवल्यानंतर हरियाणा सरकारने ताबडतोब जाहीर केलं की राजीव गांधी ट्रस्टला देण्यात आलेल्या 850 एकर जागेबद्दल पुनर्विचार केला जाईल. पण त्यावर गावक-यांचं समाधान झालं नाही. गावक-यांना त्यांची जमीन परत हवी. हरियाणा सरकारशी चर्चा करायला इन्कार करून आता कोर्टाच्याच मार्गाने न्याय मिळवू अशी त्यांची भूमिका आहे. सोनिया गांधींवर जेव्हा ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणी आरोप झाले होते. तेव्हा त्यांनी ताबडतोब खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता त्या काय स्पष्टीकरण देतात. याकडे विरोधक लक्ष ठेवून आहेत.

First published: August 3, 2011, 11:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading