भूमाफिया विरोधात 81 व्या वर्षीही लढा ; निर्णयाची अपेक्षा

01 ऑगस्टएक निवृत्त सरकारी कर्मचारी वयाच्या 81 व्या वर्षीही न्यायासाठी लढा देत आहेत. सध्या पुण्यात स्थायिक असलेले श्यामसुंदर अढावदकर. त्यांची वडिलोपार्जित जमीन धुळ्यातला लँडमाफिया अशोक पाटकरने हडप केली. सततच्या न्यायालयीन लढाईवरुन ते आता व्यथित झाले होते. गेल्या 22 वर्षापासून ते लढा देत आहे. न्याय मिळेल की नाही, याची खात्री नाही, पण किमान निर्णय तरी द्या अशी याचना ते करत आहेत.श्यामसुंदर अढावदकर. वय वर्षे 81 त्यांची धुळ्यातील 11 एकर वडिलोपार्जित जमीन एकेकाळचा तडीपार गुंड असलेला आणि आताचा बिल्डर अशोक पाटकरने खोटी कागदपत्रं बनवून बळकावल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला मात्र त्यानंतर लगेचच पाटकर जामिनावर सुटलाही. सध्या धुळ्याच्या दिवाणी कोर्टात आणि हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांची केस प्रलंबित आहे.अढावदकरांच्या हडप केलेल्या जागेवर बेकायदेशीर हाऊसिंग सोसायटी उभारण्यात आली. पाटकरला राजकीय वरदहस्त लाभल्याने अढावदकरांची सरकार दरबारी कुणीच दखल घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकरणात त्यांच्या सख्ख्या भावानंही विरोधकांशी हातमिळवणी केल्याची खंतही अढावदकारांना आहे. आत्तापर्यंत लाखो रुपये कोर्टकचेरी आणि प्रवासात खर्च झालेत. त्यामुळे निर्णय कुठलाही असू दे, पण तो द्या, अशी विनवणी ते करताहेत. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2011 10:59 AM IST

भूमाफिया  विरोधात 81 व्या वर्षीही लढा ; निर्णयाची अपेक्षा

01 ऑगस्ट

एक निवृत्त सरकारी कर्मचारी वयाच्या 81 व्या वर्षीही न्यायासाठी लढा देत आहेत. सध्या पुण्यात स्थायिक असलेले श्यामसुंदर अढावदकर. त्यांची वडिलोपार्जित जमीन धुळ्यातला लँडमाफिया अशोक पाटकरने हडप केली. सततच्या न्यायालयीन लढाईवरुन ते आता व्यथित झाले होते. गेल्या 22 वर्षापासून ते लढा देत आहे. न्याय मिळेल की नाही, याची खात्री नाही, पण किमान निर्णय तरी द्या अशी याचना ते करत आहेत.

श्यामसुंदर अढावदकर. वय वर्षे 81 त्यांची धुळ्यातील 11 एकर वडिलोपार्जित जमीन एकेकाळचा तडीपार गुंड असलेला आणि आताचा बिल्डर अशोक पाटकरने खोटी कागदपत्रं बनवून बळकावल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला मात्र त्यानंतर लगेचच पाटकर जामिनावर सुटलाही. सध्या धुळ्याच्या दिवाणी कोर्टात आणि हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांची केस प्रलंबित आहे.

अढावदकरांच्या हडप केलेल्या जागेवर बेकायदेशीर हाऊसिंग सोसायटी उभारण्यात आली. पाटकरला राजकीय वरदहस्त लाभल्याने अढावदकरांची सरकार दरबारी कुणीच दखल घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

या सगळ्या प्रकरणात त्यांच्या सख्ख्या भावानंही विरोधकांशी हातमिळवणी केल्याची खंतही अढावदकारांना आहे. आत्तापर्यंत लाखो रुपये कोर्टकचेरी आणि प्रवासात खर्च झालेत. त्यामुळे निर्णय कुठलाही असू दे, पण तो द्या, अशी विनवणी ते करताहेत. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 10:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...