मरडॉक यांच्या चौकशीनंतर पंतप्रधानांकडून विचारपूस

20 जुलैमीडिया सम्राट रुपर्ट मरडॉक यांच्या उलट तपासणीनंतर आज इंग्लडचे पंतप्रधान डेविड कॅमेरुन यांना संसदेत खासदारांच्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे. मरडॉक यांच्या न्यूज ऑफ द वर्ल्ड या वृत्तपत्राचे माजी संपादक ऍंडी कोल्सन यांना आपला प्रसिध्दी प्रमुख म्हणून नियुक्त केल्याप्रकरणी कॅमेरॉन यांच्यावर जोरदार टिका होती. कोल्सन यांना फोन हँकिंग प्रकरणात अटक झाली होती फण ते जामीनावर सुटले आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर कोल्सन यांनी प्रसिध्दी प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर कॅमेरॉन हे दक्षिण आफ्रिकेचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2011 01:20 PM IST

मरडॉक यांच्या चौकशीनंतर पंतप्रधानांकडून विचारपूस

20 जुलै

मीडिया सम्राट रुपर्ट मरडॉक यांच्या उलट तपासणीनंतर आज इंग्लडचे पंतप्रधान डेविड कॅमेरुन यांना संसदेत खासदारांच्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे. मरडॉक यांच्या न्यूज ऑफ द वर्ल्ड या वृत्तपत्राचे माजी संपादक ऍंडी कोल्सन यांना आपला प्रसिध्दी प्रमुख म्हणून नियुक्त केल्याप्रकरणी कॅमेरॉन यांच्यावर जोरदार टिका होती.

कोल्सन यांना फोन हँकिंग प्रकरणात अटक झाली होती फण ते जामीनावर सुटले आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर कोल्सन यांनी प्रसिध्दी प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर कॅमेरॉन हे दक्षिण आफ्रिकेचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2011 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...