मुंबईत हजारो सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार - मुख्यमंत्री

मुंबईत हजारो सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार - मुख्यमंत्री

15 जुलैमुंबईत झालेल्या साखळी स्फोटानंतर सरकारने सुरक्षेसाठी काही ठोस पाऊल उचलली आहे. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना मुंबईची सुरक्षा वाढवण्यासाठी शहरातील सर्व रस्त्यांवर हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच राज्यात असलेल्या तणाव परिस्थितीत विरोधकांनी राजकारणाची पोळी भाजण्यापेक्षा काही उपयोगाच्या सूचना करा असं आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केलं.साखळी बॉम्बस्फोटानंतर सर्वात प्रथमच मुख्यमंत्र्यांनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या सुरक्षेसाठी देशातील, परदेशातील गुप्तचर यंत्रणांशी सारखा संपर्क सुरू असतो. तसेच सुरक्षेसाठी महाराष्ट्र इन्टेलिजन्स ऍकडमी, फोर्स वन,अशी विशेष ट्रेनिंग यंत्रणा उभी केली आहे. गुप्तचर यंत्रणेत विशेष लोकांची भरती करून त्यांना खास परदेशी एक्सपर्ट मागवून ट्रेनिंग दिली जाते. 26/11 ला जो हल्ला झाला होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर कोस्ट गार्ड सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ मुंबई शहराला अधिक सुरक्षित करण्यासाठी हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. ही योजना अगोदर रेंगाळली होती पण ती लवकरच अंमलात आणली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. स्फोटानंतर विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलं. विरोधांकाचा समाचार घेत मुख्यमंत्री म्हणाले, माझी राजकीय पक्षांना एकच विनंती आहे की, राजकारण करण्यापेक्षा राष्ट्रीय आपत्ती म्हणून लक्ष दिलं पाहिजे. राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये आणि जर कोणी पक्ष असं करत असेल तर ते खरचं दुर्देवी आहे आणि ते निषेर्धात आहे. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा काही भरीव उपाय योजना, सुचना कराव्यात सरकार नक्कीच त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करेल. पण कोणावरही आरोप करू नये. असं सल्लावजा आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. दरम्यान बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. सह्याद्री अतिथीगृहात संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे.

  • Share this:

15 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी स्फोटानंतर सरकारने सुरक्षेसाठी काही ठोस पाऊल उचलली आहे. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना मुंबईची सुरक्षा वाढवण्यासाठी शहरातील सर्व रस्त्यांवर हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच राज्यात असलेल्या तणाव परिस्थितीत विरोधकांनी राजकारणाची पोळी भाजण्यापेक्षा काही उपयोगाच्या सूचना करा असं आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केलं.

साखळी बॉम्बस्फोटानंतर सर्वात प्रथमच मुख्यमंत्र्यांनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या सुरक्षेसाठी देशातील, परदेशातील गुप्तचर यंत्रणांशी सारखा संपर्क सुरू असतो. तसेच सुरक्षेसाठी महाराष्ट्र इन्टेलिजन्स ऍकडमी, फोर्स वन,अशी विशेष ट्रेनिंग यंत्रणा उभी केली आहे. गुप्तचर यंत्रणेत विशेष लोकांची भरती करून त्यांना खास परदेशी एक्सपर्ट मागवून ट्रेनिंग दिली जाते.

26/11 ला जो हल्ला झाला होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर कोस्ट गार्ड सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ मुंबई शहराला अधिक सुरक्षित करण्यासाठी हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. ही योजना अगोदर रेंगाळली होती पण ती लवकरच अंमलात आणली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

स्फोटानंतर विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलं. विरोधांकाचा समाचार घेत मुख्यमंत्री म्हणाले, माझी राजकीय पक्षांना एकच विनंती आहे की, राजकारण करण्यापेक्षा राष्ट्रीय आपत्ती म्हणून लक्ष दिलं पाहिजे. राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये आणि जर कोणी पक्ष असं करत असेल तर ते खरचं दुर्देवी आहे आणि ते निषेर्धात आहे. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा काही भरीव उपाय योजना, सुचना कराव्यात सरकार नक्कीच त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करेल. पण कोणावरही आरोप करू नये. असं सल्लावजा आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

दरम्यान बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. सह्याद्री अतिथीगृहात संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे.

First published: July 15, 2011, 10:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading