07 जुलै
लोकपालच्या मुद्यावरून सध्या देशभर चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांसहीत न्यायापालिका लोकपालाच्या कक्षेत यावेत का ? हा मतभेदाचा यात मुख्य मुद्दा आहे. शिवसेनेच खासदार भारतकुमार राऊत यांनी या वादावर तोडगा सुचवत पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. राष्ट्रपतींनाच लोकपालाचे अधिकार देण्यात यावेत असं मत भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केले.
लोकपालाला सर्वाधिकार दिले तर लोकपाल हुकूमशहा बनण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे अनेक नवे प्रश्नही निर्माण होऊ शकतात. राष्ट्रपती पद हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. राष्ट्रपतींकडेच लोकपालाचे सर्वाधिकार आलेत तर पंतप्रधान, न्यायापालिका, तिन्ही लष्करी दले आणि खासदारांविरूध्द तक्रार आल्यास राष्ट्रपतींना त्याची चौकशी करण्यात काही अडचण येणार नाही असंही राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. या सूचनेची देशपातळीवर चर्चा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा