दयानिधी मारन यांचा राजीनामा

दयानिधी मारन यांचा राजीनामा

07 जुलै2 जी घोटाळ्याप्रकरणात ए. राजा यांच्यापाठोपाठ वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांनाही मंत्रिपद गमवावे लागले आहे. बुधवारी सीबीआयने सुप्रीम कोर्टात 2 जी प्रकरणात स्टेटस रिपोर्ट सादर केला. सीबीआयच्या अहवालावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, वीरप्पा मोईली, कपील सिब्बल आणि ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांच्याशी आज चर्चा केली. आणि त्यानंतर मारन यांना पदाचा राजीनामा द्यायला सांगण्यात आलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मारन यांनी पंतप्रधानाच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा सादर केला. दरम्यान, मारन यांचा राजीनामा घेण्यापूर्वी काँग्रेसने आपल्याशी चर्चा केली नाही असा आरोप द्रमुकचे अध्यक्ष करूणानिधी यांनी केला.मारन यांनी राजीनामा तर दिला. पणआता त्यांच्यावर पुढे काय कारवाई होते. ए. राजा आणि कनिमोळी यांच्यापाठोपाठ द्रमुकचा आणखी एक नेता तिहार जेलमध्ये जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.मीडिया सम्राट आणि द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांचे भाचे असूनही मारन यांचे मंत्रिपद वाचू शकलं नाही. बुधवारी सीबीआयने 2 जी घोटाळ्याप्रकरणात सुप्रीम कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर केला. आणि मारन यांच्याविरोधातल्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे सांगितलं. त्याचवेळी मारन यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झालं होतं. पण राजीनामा कधी, हा प्रश्नही उपस्थित झाला होता.गुरुवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचं उत्तर मिळालं. सूत्रांच्या माहितीनुसार यापुढे तुमचे मंत्रिपद राहणार नाही, असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मारन यांना सांगून टाकलं. आणि त्यानंतर लगेच राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं म्हणणारे मारन पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले. आणि अवघ्या पाच मिनिटांच्या भेटीत त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांच्या हवाली केला.सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने बुधवारीच याबाबतचा निर्णय द्रमुकला कळवला होता. तामिळनाडूतल्या निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसलेला द्रमुक पक्ष आपल्या मंत्र्याच्या पाठिशी राहण्याच्या स्थितीत नव्हता. तसेच या राजीनाम्याला घराण्यांतर्गत आणि पक्षांतर्गत राजकारणाची किनारही आहे. करुणानिधी यांचे भाचे मारन हे करुणानिधींची मुलगी कनिमोळी यांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. आणि त्यांचा पत्ता कट करण्यासाठी पक्षातूनच काही नेत्यांचे प्रयत्नही सुरू होते. पण, यात मोठा विजय झाला तो तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा.मारन कुटुंबीय त्यांचे सन नेटवर्क आणि त्याशी संबंधित लोकांविरोधात जयललिता यांनी आघाडीच उघडली होती. मारन यांच्या राजीनाम्याची बातमी येताच सन नेटवर्कचे शेअर्स घसरले. मंत्रिपदावरून राजीनामा ही मारन यांच्या अडचणींची केवळ एक सुरुवात आहे. आता 2 जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून त्यांची चौकशी होऊ शकते. आणि त्यापुढे त्यांचे राजकीय भवितव्यही धोक्यात येऊ शकते.सन टीव्हीला फायदा करून देण्याच्या प्रकरणात मारन यांचे पद गेले. मारन घराण्याचे साम्राज्य किती प्रचंड आहे.- 1992 मध्ये सन नेटवर्कची स्थापना - 20 टीव्ही चॅनल्स, 45 एफएम रेडिओ स्टेशन्स - डीटीएच सर्व्हिस, फिल्म डिस्ट्रीब्युशन - 2 वर्तमानपत्रं, 4 मॅगझिन्स - अमेरिका, कॅनडा, युरोप, सिंगापूरसह 27 देशांत सेवा - मार्केटचा विचार करता सन नेटवर्क नंबर दोनवर - 2010 मध्ये स्पाईस जेटची तब्बल 750 कोटींना खरेदी - 2010-2011 या वर्षातला निव्वळ नफा 772 कोटी - कलानिधी मारन आणि त्यांच्या पत्नीचा 2009-10 मधला पगार - 74 कोटी 16 लाख रु. दरम्यान, 2 जी घोटाळा प्रकरणाची सुनावणी 15 जुलैपासून सुरू होणार आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर त्यावेळी आरोप नक्की करण्यात येतील. यामुळे द्रमुकच्या नेत्या कनिमोळींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टाने त्यांना ट्रायल कोर्टात नव्याने अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले होते. एकदा आरोप नक्की झाले की त्या जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतील. याप्रकरणात नीरा राडिया फोन टॅपिंगचा तपशील सादर करणार असल्याचे सीबीआयने सांगितलं. आरोपींनाही हा तपशील देण्यात येणार आहे.दुसरीकडे ए. राजा यांचे जवळचे सहकारी सादिक बाच्छा यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय नव्याने चौकशी करणार आहे. बाच्छा यांच्या सुसाईड नोटचा सीबीआयला पुन्हा बारकाईने अभ्यास करायचा. बाच्छा यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात ही सुसाईड नोट आहे. आणि जबदरस्तीने ती त्यांच्याकडून लिहून घेण्यात आली नाही, असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय. बाच्छा यांनी आत्महत्या केली नव्हती, त्यांचा खून झाला होता, असं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं. त्याविषयीच्या शंका मिटवण्यासाठी सीबीआयने दिल्लीतल्या एम्सच्या डॉक्टरांची मदत मागितली.

  • Share this:

07 जुलै

2 जी घोटाळ्याप्रकरणात ए. राजा यांच्यापाठोपाठ वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांनाही मंत्रिपद गमवावे लागले आहे. बुधवारी सीबीआयने सुप्रीम कोर्टात 2 जी प्रकरणात स्टेटस रिपोर्ट सादर केला. सीबीआयच्या अहवालावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, वीरप्पा मोईली, कपील सिब्बल आणि ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांच्याशी आज चर्चा केली.

आणि त्यानंतर मारन यांना पदाचा राजीनामा द्यायला सांगण्यात आलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मारन यांनी पंतप्रधानाच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा सादर केला. दरम्यान, मारन यांचा राजीनामा घेण्यापूर्वी काँग्रेसने आपल्याशी चर्चा केली नाही असा आरोप द्रमुकचे अध्यक्ष करूणानिधी यांनी केला.

मारन यांनी राजीनामा तर दिला. पणआता त्यांच्यावर पुढे काय कारवाई होते. ए. राजा आणि कनिमोळी यांच्यापाठोपाठ द्रमुकचा आणखी एक नेता तिहार जेलमध्ये जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.मीडिया सम्राट आणि द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांचे भाचे असूनही मारन यांचे मंत्रिपद वाचू शकलं नाही. बुधवारी सीबीआयने 2 जी घोटाळ्याप्रकरणात सुप्रीम कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर केला. आणि मारन यांच्याविरोधातल्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे सांगितलं. त्याचवेळी मारन यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झालं होतं. पण राजीनामा कधी, हा प्रश्नही उपस्थित झाला होता.गुरुवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचं उत्तर मिळालं. सूत्रांच्या माहितीनुसार यापुढे तुमचे मंत्रिपद राहणार नाही, असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मारन यांना सांगून टाकलं. आणि त्यानंतर लगेच राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं म्हणणारे मारन पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले. आणि अवघ्या पाच मिनिटांच्या भेटीत त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांच्या हवाली केला.सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने बुधवारीच याबाबतचा निर्णय द्रमुकला कळवला होता. तामिळनाडूतल्या निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसलेला द्रमुक पक्ष आपल्या मंत्र्याच्या पाठिशी राहण्याच्या स्थितीत नव्हता.

तसेच या राजीनाम्याला घराण्यांतर्गत आणि पक्षांतर्गत राजकारणाची किनारही आहे. करुणानिधी यांचे भाचे मारन हे करुणानिधींची मुलगी कनिमोळी यांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. आणि त्यांचा पत्ता कट करण्यासाठी पक्षातूनच काही नेत्यांचे प्रयत्नही सुरू होते. पण, यात मोठा विजय झाला तो तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा.

मारन कुटुंबीय त्यांचे सन नेटवर्क आणि त्याशी संबंधित लोकांविरोधात जयललिता यांनी आघाडीच उघडली होती. मारन यांच्या राजीनाम्याची बातमी येताच सन नेटवर्कचे शेअर्स घसरले. मंत्रिपदावरून राजीनामा ही मारन यांच्या अडचणींची केवळ एक सुरुवात आहे. आता 2 जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून त्यांची चौकशी होऊ शकते. आणि त्यापुढे त्यांचे राजकीय भवितव्यही धोक्यात येऊ शकते.

सन टीव्हीला फायदा करून देण्याच्या प्रकरणात मारन यांचे पद गेले. मारन घराण्याचे साम्राज्य किती प्रचंड आहे.

- 1992 मध्ये सन नेटवर्कची स्थापना - 20 टीव्ही चॅनल्स, 45 एफएम रेडिओ स्टेशन्स - डीटीएच सर्व्हिस, फिल्म डिस्ट्रीब्युशन - 2 वर्तमानपत्रं, 4 मॅगझिन्स - अमेरिका, कॅनडा, युरोप, सिंगापूरसह 27 देशांत सेवा - मार्केटचा विचार करता सन नेटवर्क नंबर दोनवर - 2010 मध्ये स्पाईस जेटची तब्बल 750 कोटींना खरेदी - 2010-2011 या वर्षातला निव्वळ नफा 772 कोटी - कलानिधी मारन आणि त्यांच्या पत्नीचा 2009-10 मधला पगार - 74 कोटी 16 लाख रु.

दरम्यान, 2 जी घोटाळा प्रकरणाची सुनावणी 15 जुलैपासून सुरू होणार आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर त्यावेळी आरोप नक्की करण्यात येतील. यामुळे द्रमुकच्या नेत्या कनिमोळींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता.

सुप्रीम कोर्टाने त्यांना ट्रायल कोर्टात नव्याने अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले होते. एकदा आरोप नक्की झाले की त्या जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतील. याप्रकरणात नीरा राडिया फोन टॅपिंगचा तपशील सादर करणार असल्याचे सीबीआयने सांगितलं. आरोपींनाही हा तपशील देण्यात येणार आहे.

दुसरीकडे ए. राजा यांचे जवळचे सहकारी सादिक बाच्छा यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय नव्याने चौकशी करणार आहे. बाच्छा यांच्या सुसाईड नोटचा सीबीआयला पुन्हा बारकाईने अभ्यास करायचा. बाच्छा यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात ही सुसाईड नोट आहे.

आणि जबदरस्तीने ती त्यांच्याकडून लिहून घेण्यात आली नाही, असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय. बाच्छा यांनी आत्महत्या केली नव्हती, त्यांचा खून झाला होता, असं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं. त्याविषयीच्या शंका मिटवण्यासाठी सीबीआयने दिल्लीतल्या एम्सच्या डॉक्टरांची मदत मागितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2011 08:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading