नाराज मुंडे काँग्रेसच्या वाटेवर ?

नाराज मुंडे काँग्रेसच्या वाटेवर ?

20 जूननाराज गोपीनाथ मुंडे यांच दबावतंत्र अजूनही सुरू आहे. मुंडे सध्या काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी ही माहिती दिली. गोपीनाथ मुंडेनी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तर मुंडेंना भेटल्याचा मोहन प्रकाश यांनी मात्र इन्कार केला आहे. या अगोदर ही मुंडे यांची महाराष्ट्रात भेट सत्र सुरू असताना विलासराव देशमुख यांची ही भेट घेतली होती. याबद्दल विलासरावांनी आम्ही शेजारी शेजारी आहोत असं उत्तर आपल्या शैलीत दिलं होतं. मात्र काल अडवाणी यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर मुंडे यांनी आपल्या व्यथा पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. मात्र चर्चा अजून सुरू आहे असं मुंडे यांनी यावेळी सांगितले.भाजप वरीष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आज पुन्हा नॉट रिचेबल झाले आहे. त्यामुळेच दिवसभर चर्चेला उधाण आलं आणि मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत की काय अशी शक्यता निर्माण झाली. सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या माहितीनूसार गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना फोनवरुन संपर्क साधला आणि प्रवेशाच्या शक्यतेची चाचपणी केली. पण मुंडेच्या निकटवर्तीयांनी मात्र या शक्यतेचा इन्कार केला. आणि मुंडे भाजपमध्येच राहतील असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी सुध्दा मुंडे मला भेटले नाही. असा खुलासा केला. मात्र गेल्या 12 तासांमध्ये मुंडे कुठे आहेत या विषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही तसेच या विषयावर बोलायला काँग्रेस, भाजपच्या सर्व प्रवक्त्यांनी इन्कार केला आहे. त्यामुळेच शंका, कुशकांना वाव मिळाला. काल रात्री मुंडे यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती आणि चर्चा सकारात्मक झाल्याचे म्हटलं होतं. पण नाराजी मात्र पुर्णता दूर होवू शकली नव्हती. दरम्यान, नाराज गोपीनाथ मुंडे यांच दबावतंत्र अजूनही सुरू आहे. ते सध्या काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी ही माहिती दिली आहे. गोपीनाथ मुंडेनी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तर मुंडेंना भेटल्याचा मोहन प्रकाश यांनी मात्र इन्कार केला. नाराज गोपीनाथ मुंडेची मागणी- मुंडेंना पाहिजे विरोधपक्षनेतेपद- विधानसभेचं विरोधीपक्षेतेपद- खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यात परतण्याची इच्छा- मुलगी पंकजाला खासदारकी देऊन राज्यात परत येणार

  • Share this:

20 जून

नाराज गोपीनाथ मुंडे यांच दबावतंत्र अजूनही सुरू आहे. मुंडे सध्या काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी ही माहिती दिली. गोपीनाथ मुंडेनी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तर मुंडेंना भेटल्याचा मोहन प्रकाश यांनी मात्र इन्कार केला आहे.

या अगोदर ही मुंडे यांची महाराष्ट्रात भेट सत्र सुरू असताना विलासराव देशमुख यांची ही भेट घेतली होती. याबद्दल विलासरावांनी आम्ही शेजारी शेजारी आहोत असं उत्तर आपल्या शैलीत दिलं होतं. मात्र काल अडवाणी यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर मुंडे यांनी आपल्या व्यथा पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. मात्र चर्चा अजून सुरू आहे असं मुंडे यांनी यावेळी सांगितले.

भाजप वरीष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आज पुन्हा नॉट रिचेबल झाले आहे. त्यामुळेच दिवसभर चर्चेला उधाण आलं आणि मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत की काय अशी शक्यता निर्माण झाली.

सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या माहितीनूसार गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना फोनवरुन संपर्क साधला आणि प्रवेशाच्या शक्यतेची चाचपणी केली. पण मुंडेच्या निकटवर्तीयांनी मात्र या शक्यतेचा इन्कार केला. आणि मुंडे भाजपमध्येच राहतील असा विश्वास व्यक्त केला.

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी सुध्दा मुंडे मला भेटले नाही. असा खुलासा केला. मात्र गेल्या 12 तासांमध्ये मुंडे कुठे आहेत या विषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही तसेच या विषयावर बोलायला काँग्रेस, भाजपच्या सर्व प्रवक्त्यांनी इन्कार केला आहे. त्यामुळेच शंका, कुशकांना वाव मिळाला.

काल रात्री मुंडे यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती आणि चर्चा सकारात्मक झाल्याचे म्हटलं होतं. पण नाराजी मात्र पुर्णता दूर होवू शकली नव्हती.

दरम्यान, नाराज गोपीनाथ मुंडे यांच दबावतंत्र अजूनही सुरू आहे. ते सध्या काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी ही माहिती दिली आहे. गोपीनाथ मुंडेनी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तर मुंडेंना भेटल्याचा मोहन प्रकाश यांनी मात्र इन्कार केला.

नाराज गोपीनाथ मुंडेची मागणी

- मुंडेंना पाहिजे विरोधपक्षनेतेपद- विधानसभेचं विरोधीपक्षेतेपद- खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यात परतण्याची इच्छा- मुलगी पंकजाला खासदारकी देऊन राज्यात परत येणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2011 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading