अखेर मेखळीतला टगेखोर वळू पकडला

19 जूनउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या उल्लेखामुळे चर्चेत आलेला बारामती तालुक्यातील मेखळीतला वळू पकडण्यात यश आले आहे. या वळूला पकडण्यासाठी अधिकार्‍यांपुढे मोठे आव्हान उभे होते. या वळुने 16 बैलांचा जीव घेतला आहे तर 50 हुन अधिक बैलांना जखमी केले आहे. वळूला पकण्यासाठी वनअधिकार्‍यांना सांगण्यात आले होते. पण हे प्रकरण आमच्या अर्तंगत येत नाही असे वनाधिकार्‍यांनी सांगितले होते. पण आपण बारामतीच्या आत येण्याआधी वळूचा बंदोबस्त करा असे अजित पवार यांनी फर्मावले. त्यामुळे अधिकार्‍यांनी चांगलीच धास्ती घेतली आणि अजित पवार उद्या येत असल्याने या वळूला पकडण्यासाठी जुन्नर येथील माणिकढोह येथील बिबट्या निवारण केंद्रातील पथकाला बोलावण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या नेत्वृत्वात दहा पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांची मदत घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास वळूला बेशुद्ध करुन पकडण्यात आले. या वळूच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी गावाची ग्रामसभा घेऊन ठरवण्यात येणार आहे. इतर बातम्या वळू पकडून द्या, थेट अजितदादांनाच साकडं

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2011 03:10 PM IST

अखेर मेखळीतला टगेखोर वळू पकडला

19 जून

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या उल्लेखामुळे चर्चेत आलेला बारामती तालुक्यातील मेखळीतला वळू पकडण्यात यश आले आहे. या वळूला पकडण्यासाठी अधिकार्‍यांपुढे मोठे आव्हान उभे होते. या वळुने 16 बैलांचा जीव घेतला आहे तर 50 हुन अधिक बैलांना जखमी केले आहे.

वळूला पकण्यासाठी वनअधिकार्‍यांना सांगण्यात आले होते. पण हे प्रकरण आमच्या अर्तंगत येत नाही असे वनाधिकार्‍यांनी सांगितले होते. पण आपण बारामतीच्या आत येण्याआधी वळूचा बंदोबस्त करा असे अजित पवार यांनी फर्मावले.

त्यामुळे अधिकार्‍यांनी चांगलीच धास्ती घेतली आणि अजित पवार उद्या येत असल्याने या वळूला पकडण्यासाठी जुन्नर येथील माणिकढोह येथील बिबट्या निवारण केंद्रातील पथकाला बोलावण्यात आले होते.

यावेळी प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या नेत्वृत्वात दहा पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांची मदत घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास वळूला बेशुद्ध करुन पकडण्यात आले. या वळूच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी गावाची ग्रामसभा घेऊन ठरवण्यात येणार आहे.

इतर बातम्या

वळू पकडून द्या, थेट अजितदादांनाच साकडं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 03:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...