जे.डे. हत्याप्रकरणी सरकारने भूमिका मांडवी - मुंबई हायकोर्ट

16 जूनपत्रकार जे. डे हत्याप्रकरणी ऍडव्होकेट जनरलला सरकारची भूमिका मांडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने आज दिले. जे. डे हत्येचा सीबीआयने तपास करावा अशी याचिका ऍड. पाटील आणि केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. न्यायाधीश रंजना देसाई आणि रंजित मोरे यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. कोर्टाने सरकारला या हत्येच्या तपासाचा अहवालही सादर करायला सांगितला आहे. दरम्यान, आज पत्रकारांनीही या हत्येचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. कोर्टाने ही याचिकाही आधीच्या याचिकेत सहभागी करून घेतली आहे. आता या याचिकेची पुढील सुनावणी 21 जूनला होणार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2011 10:28 AM IST

जे.डे. हत्याप्रकरणी सरकारने भूमिका मांडवी - मुंबई हायकोर्ट

16 जून

पत्रकार जे. डे हत्याप्रकरणी ऍडव्होकेट जनरलला सरकारची भूमिका मांडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने आज दिले. जे. डे हत्येचा सीबीआयने तपास करावा अशी याचिका ऍड. पाटील आणि केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.

न्यायाधीश रंजना देसाई आणि रंजित मोरे यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. कोर्टाने सरकारला या हत्येच्या तपासाचा अहवालही सादर करायला सांगितला आहे.

दरम्यान, आज पत्रकारांनीही या हत्येचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. कोर्टाने ही याचिकाही आधीच्या याचिकेत सहभागी करून घेतली आहे. आता या याचिकेची पुढील सुनावणी 21 जूनला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...