मोदी सरकारची नोकरदार वर्गाला दिलासा;PFच्या व्याजदरात वाढ

मोदी सरकारची नोकरदार वर्गाला दिलासा;PFच्या व्याजदरात वाढ

मोदी सरकारनं नोकरदार वर्गाचं पुन्हा एकदा तोंड गोड केलं आहे.

  • Share this:

दिल्ली, 21 फेब्रुवारी :  अर्थसंकल्पात  नोकारदार वर्गाला दिलासा दिल्यानंतर आता मोदी सरकारनं आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारनं PF अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता 2018 - 19 या आर्थिक वर्षामध्ये पीएफवरील व्याजदरात 0.10 टक्के वाढ होणार आहे. सरकारनं 8.55 टक्के व्याजदरावरून 8.65 टक्के व्याजदर केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा 6 कोटी नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीमध्ये व्याजदर वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर मंजुरीसाठी सदरचा प्रस्ताव हा अर्थमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.

सर्वात कमी व्याज दर

2017 - 18 या आर्थिक वर्षामध्ये पीएफवर 8.55 टक्के व्याज देण्यात आलं होतं. मागील पाच वर्षाचा विचार करता 8.55 टक्के व्याजदर सर्वात कमी ठरला होता. यापूर्वी 2016 - 17मध्ये 8.65 टक्के, 2015 - 16मध्ये 8.8 टक्के व्याज देण्यात आलं होतं.

बजेटमध्ये कर मर्यादा वाढवली

बजेट सादर करताना मोदी सरकारनं बजेटमध्ये सामान्यांना कर दिलासा दिला होता. कर मर्यादा 2.5 लाखावरून 5 लाख करण्यात आली होती. शिवाय, शेतकऱ्यांना देखील वर्षाला 6 हजार रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर पीएफच्या व्याज दरात वाढ करून सरकारनं मास्टर स्ट्रोक मारला आहे.

VIDEO: काश्मिरी मुस्लीम तरुणीने गायलं 'पसायदान'

First published: February 21, 2019, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading