हसन अलीचे अनेक राजकारण्यांशी जवळचे संबंध !

27 मेसुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटनं हसन अलीचे 12 कबुलीजबाब रेकॉर्ड केले आहे. काँग्रेसपासून समाजवादी पक्षातल्या नेत्यांपर्यंत हसन अलीचे कसे संबंध आहेत याचा उलगडा तापुरियानं केला.कोट्यवधींच्या घोटाळ्यातला आरोपी हसन अलीचं राजकीय कनेक्शन कसं आहे. याची माहिती सहआरोपी काशीनाथ तापुरियाने यापूर्वी आयबीएन-नेटवर्कला दिली होती. आता तापुरियाने हसन अलीचे अनेक राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याचा दावा केला आहे. रेणुका चौधरी ते सुरेश कलमाडींपासून समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जयाप्रदा यांच्याशी हसन अलीचे संबंध असल्याचं तापुरियानं म्हटलं आहे. अनेक दिवस टाळाटाळ केल्यानंतर तापुरिया यानं अखेर आपलं तोंड उघडलंय. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने केलेल्या चौकशीतला हा तपशील आहे.प्रश्न - 30 मार्च 2011 रोजी तुम्ही दिलेल्या कबुलीजबाबत हसन अली खानचे राजकीय संबंध दिसून येतात. हसन अली खानने त्याच्या संपर्कात असलेल्या काही नेत्यांची नावं तुम्हाला कधी सांगितली होती का ?तापुरिया - विजय भास्कर रेड्डी, ए. एस. चौधरी, जयाप्रदा आणि सुरेश कलमाडी यांच्यासारख्या राजकारण्यांशी संबंध असल्याचं हसन अलीनं मला सांगितलं होतं. त्यानं या लोकांविषयी मला असं सांगितलं.सुब्बरामी रेड्डी हे आंध्रप्रदेशातील राजकारणी आहेत. दिल्ली किंवा मुंबईतल्या एअरपोर्ट प्रकल्पांशी त्यांचा संबंध आहे. सुब्बरामी रेड्डी आपले चांगले मित्र असल्याचं हसन अलीनं मला सांगितलं. रेणुका चौधरींशी माझे एक मित्र जगदीश टायटलर यांच्या माध्यमातून भेट झाली. 1994-95 मध्ये जयाप्रदा यांच्याशी चांगली ओळख असल्याचं हसन अलीनं मला सांगितलं. 1996 मध्ये ओबेरॉय हॉटेलमध्ये हसन अलीसोबत मी जयाप्रदा यांना भेटलो होतो. हसन अलीनं मला सुरेश कलमाडी यांच्याविषयीसुद्धा सांगितलं. पण माझा त्यावर विश्वास नाही. एक राजकारणी म्हणून मी कलमाडींना व्यक्तिगत ओळखतो. 1986 मध्ये दिल्लीत मी त्यांना भेटलोही होतो. प्रश्न - 31 जानेवारी 2007 रोजी तुम्ही दिलेल्या कबुलीजबाबात ए. एस. चौधरी तसेच आंध्रप्रदेशातील विजय भास्कर रेड्डी यांनी हसन अली खानच्या नावाची शिफारस केल्याचं सांगितलं होतं. हे विजय भास्कर रेड्डी कोण? ते आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत का? आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांनी तुमची हसन अलीशी ओळख करून दिली, हे तुम्ही 28 मार्च 2011 च्या कबुलीजबाबत का लपवलं?तापुरिया - हसन अलीनं मला ए. एस. चौधरी आणि विजय भास्कर रेड्डी यांच्याकडे नेलं. ते हसन अलीशी खूप चांगलं बोलत होते. मी त्यांच्याशी हसन अलीबरोबर 2000 मध्ये भेटलो होतो. ए. एस. चौधरी हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. आणि विजय भास्कर रेड्डी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. मी रेड्डी यांना त्यांच्या दिल्लीतल्या घरात भेटलो होतो. माझं त्यांच्याकडे कोणतंच वैयक्तिक काम नव्हतं. पण हसन अलीला त्याची ओळख दाखवायची होती. हवाला ऑपरेटर अब्बास नक्वी याच्याविषयी विचारल्यानंतर तापुरिया यानं रेणुका चौधरी यांचं नावं घेतल्याचे चौकशी अहवालात दिसतंय. एडी - अब्बास नक्वी नावाच्या व्यक्तीला तुम्ही ओळखता ?तापुरिया - हो. अब्बास नक्वी हा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्यामार्फत मी मंुबईतून हिरा खरेदी केला होता. त्याची किंमत होती 1 कोटी 20 लाख रुपये.पण हसन अलीनं तो हिरा माझ्याकडून घेतला. एका महत्त्वाच्या व्यक्तिला तो हिरा द्यायचा असल्याचे हसन अलीने मला सांगितलं. आणि रेणुका चौधरींचं नाव त्यानं घेतलं. रेणुका चौधरी या राजकारणी आहेत. त्यांच्याशी आपली चांगली मैत्री असल्याचं हसन अलीनं मला सांगितलं. या चौकशी अहवालामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्यावरचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा तापुरियाचा हा प्रयत्न आहे की त्याच्या दाव्यामुळे काळा पैसा आणि राजकारणी यांच्या कनेक्शनची खोल चौकशी होण्याची गरज आहे.?

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 27, 2011 05:40 PM IST

हसन अलीचे अनेक राजकारण्यांशी जवळचे संबंध !

27 मे

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटनं हसन अलीचे 12 कबुलीजबाब रेकॉर्ड केले आहे. काँग्रेसपासून समाजवादी पक्षातल्या नेत्यांपर्यंत हसन अलीचे कसे संबंध आहेत याचा उलगडा तापुरियानं केला.

कोट्यवधींच्या घोटाळ्यातला आरोपी हसन अलीचं राजकीय कनेक्शन कसं आहे. याची माहिती सहआरोपी काशीनाथ तापुरियाने यापूर्वी आयबीएन-नेटवर्कला दिली होती. आता तापुरियाने हसन अलीचे अनेक राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याचा दावा केला आहे.

रेणुका चौधरी ते सुरेश कलमाडींपासून समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जयाप्रदा यांच्याशी हसन अलीचे संबंध असल्याचं तापुरियानं म्हटलं आहे. अनेक दिवस टाळाटाळ केल्यानंतर तापुरिया यानं अखेर आपलं तोंड उघडलंय. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने केलेल्या चौकशीतला हा तपशील आहे.प्रश्न - 30 मार्च 2011 रोजी तुम्ही दिलेल्या कबुलीजबाबत हसन अली खानचे राजकीय संबंध दिसून येतात. हसन अली खानने त्याच्या संपर्कात असलेल्या काही नेत्यांची नावं तुम्हाला कधी सांगितली होती का ?

तापुरिया - विजय भास्कर रेड्डी, ए. एस. चौधरी, जयाप्रदा आणि सुरेश कलमाडी यांच्यासारख्या राजकारण्यांशी संबंध असल्याचं हसन अलीनं मला सांगितलं होतं. त्यानं या लोकांविषयी मला असं सांगितलं.

सुब्बरामी रेड्डी हे आंध्रप्रदेशातील राजकारणी आहेत. दिल्ली किंवा मुंबईतल्या एअरपोर्ट प्रकल्पांशी त्यांचा संबंध आहे. सुब्बरामी रेड्डी आपले चांगले मित्र असल्याचं हसन अलीनं मला सांगितलं. रेणुका चौधरींशी माझे एक मित्र जगदीश टायटलर यांच्या माध्यमातून भेट झाली.

1994-95 मध्ये जयाप्रदा यांच्याशी चांगली ओळख असल्याचं हसन अलीनं मला सांगितलं. 1996 मध्ये ओबेरॉय हॉटेलमध्ये हसन अलीसोबत मी जयाप्रदा यांना भेटलो होतो.

हसन अलीनं मला सुरेश कलमाडी यांच्याविषयीसुद्धा सांगितलं. पण माझा त्यावर विश्वास नाही. एक राजकारणी म्हणून मी कलमाडींना व्यक्तिगत ओळखतो. 1986 मध्ये दिल्लीत मी त्यांना भेटलोही होतो.

प्रश्न - 31 जानेवारी 2007 रोजी तुम्ही दिलेल्या कबुलीजबाबात ए. एस. चौधरी तसेच आंध्रप्रदेशातील विजय भास्कर रेड्डी यांनी हसन अली खानच्या नावाची शिफारस केल्याचं सांगितलं होतं. हे विजय भास्कर रेड्डी कोण? ते आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत का? आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांनी तुमची हसन अलीशी ओळख करून दिली, हे तुम्ही 28 मार्च 2011 च्या कबुलीजबाबत का लपवलं?

तापुरिया - हसन अलीनं मला ए. एस. चौधरी आणि विजय भास्कर रेड्डी यांच्याकडे नेलं. ते हसन अलीशी खूप चांगलं बोलत होते. मी त्यांच्याशी हसन अलीबरोबर 2000 मध्ये भेटलो होतो.

ए. एस. चौधरी हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. आणि विजय भास्कर रेड्डी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. मी रेड्डी यांना त्यांच्या दिल्लीतल्या घरात भेटलो होतो. माझं त्यांच्याकडे कोणतंच वैयक्तिक काम नव्हतं. पण हसन अलीला त्याची ओळख दाखवायची होती.

हवाला ऑपरेटर अब्बास नक्वी याच्याविषयी विचारल्यानंतर तापुरिया यानं रेणुका चौधरी यांचं नावं घेतल्याचे चौकशी अहवालात दिसतंय.

एडी - अब्बास नक्वी नावाच्या व्यक्तीला तुम्ही ओळखता ?

तापुरिया - हो. अब्बास नक्वी हा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्यामार्फत मी मंुबईतून हिरा खरेदी केला होता. त्याची किंमत होती 1 कोटी 20 लाख रुपये.पण हसन अलीनं तो हिरा माझ्याकडून घेतला.

एका महत्त्वाच्या व्यक्तिला तो हिरा द्यायचा असल्याचे हसन अलीने मला सांगितलं. आणि रेणुका चौधरींचं नाव त्यानं घेतलं. रेणुका चौधरी या राजकारणी आहेत. त्यांच्याशी आपली चांगली मैत्री असल्याचं हसन अलीनं मला सांगितलं.

या चौकशी अहवालामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्यावरचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा तापुरियाचा हा प्रयत्न आहे की त्याच्या दाव्यामुळे काळा पैसा आणि राजकारणी यांच्या कनेक्शनची खोल चौकशी होण्याची गरज आहे.?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...