कनिमोळी यांची हायकोर्टात धाव

कनिमोळी यांची हायकोर्टात धाव

23 मे2 जी प्रकरणी अटकेत असलेल्या कनिमोळी यांना आज पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला. स्पेशल कोर्टाने दिलेल्या अटकेच्या आदेशाला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. दरम्यान, द्रमुकचे अध्यक्ष एम करुणानिधी यांनी कनिमोळी यांची तिहार जेलमध्ये भेट घेतली. एक तासभर ही भेट चालली. नियमाप्रमाणे सकाळी 9 ते 12 या वेळेत तुरुंगातल्या कैद्याची भेट घेता येते. पण करुणानिधींसाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला होता. या भेटीवेळी त्यांच्यासोबत मुलगा ए. के. स्टॅलिन, कनिमोळीची आई रजती अम्माल, पती अरविंदन आणि द्रमुकचे खासदार टी. आर. बाळू होते. करुणानिधी आज सकाळी पुतण्या आणि केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांच्यासोबत दिल्लीत आले होते. पण त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची मात्र भेट घेतली नाही.

  • Share this:

23 मे

2 जी प्रकरणी अटकेत असलेल्या कनिमोळी यांना आज पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला. स्पेशल कोर्टाने दिलेल्या अटकेच्या आदेशाला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे.

दरम्यान, द्रमुकचे अध्यक्ष एम करुणानिधी यांनी कनिमोळी यांची तिहार जेलमध्ये भेट घेतली. एक तासभर ही भेट चालली. नियमाप्रमाणे सकाळी 9 ते 12 या वेळेत तुरुंगातल्या कैद्याची भेट घेता येते. पण करुणानिधींसाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला होता.

या भेटीवेळी त्यांच्यासोबत मुलगा ए. के. स्टॅलिन, कनिमोळीची आई रजती अम्माल, पती अरविंदन आणि द्रमुकचे खासदार टी. आर. बाळू होते. करुणानिधी आज सकाळी पुतण्या आणि केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांच्यासोबत दिल्लीत आले होते. पण त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची मात्र भेट घेतली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 05:19 PM IST

ताज्या बातम्या