बंगालमध्ये दीदींच राज्य ; तामिळनाडूत 'जय'ललिता

बंगालमध्ये दीदींच राज्य ; तामिळनाडूत 'जय'ललिता

13 मेपश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या साडे तीन दशकांच्या सत्तेला ममता बॅनर्जीनी सुरूंग लावला आहे. 294 पैकी जवळपास दोन तृतीयांश जागांवर ममता बॅनर्जीनी आघाडी घेतली. हा विजय जनतेचा असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जीनी दिली. तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेच्या 13 वर्षानंतर बरोबर 13 तारखेलाच ममता बॅनर्जीना सत्ता मिळाली आहे. ममता बॅनर्जीनी आज तीन दशकांच्या डाव्या राजवटीचा धुव्वा उडवला. पश्चिम बंगालच्या विधानसभेत त्यांना आणि काँग्रेसला मिळून तीन चतुर्थांश बहुमत मिळालंय. काँग्रेसशिवायही ममता दीदी सरकार बनवण्याच्या स्थितीत आहेत. पण त्यांनी काँग्रेसला सरकारमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय. दुसरीकडे ममतांच्या सुनामीत डाव्यांचे अनेक बुरूज कोसळले. खुद्द बुद्धदेव भट्टाचार्यही स्वतःची जागा वाचवू शकले नाहीत.कोलकाता शहराच्या कालीघाटवर वाजणा-या या ढोलांनी डाव्यांच्या गडाला मूळापासून हादरे दिलेत. गेल्या 34 वर्षांत झालेल्या प्रत्येक निवडणुकीनंतर इथं फक्त लाल रंग उधळला जायचा. पण आता हे शहर, हे राज्य, तृणमूलच्या हिरव्या रंगानं रंगलंय. ममता बॅनर्जींच्या परिवर्तनाच्या नार्‍याला बंगली मतदाराने भरभरून प्रतिसाद दिला.गेल्या तीन दशकांपासून डाव्यांना विरोध करणार्‍या ममतांना राज्यभर लोकप्रियता मिळाली. ती शिंगूर आणि नंदीग्रामच्या आंदोलनांनतर. त्यानंतर त्यांचा झंझावात पाहून डाव्यांनी आपल्या भूमिकात अनेक बदल केले. पण तोवर उशीर झाला होता. ममता दीदींनी उभा बंगाल जिंकला होता. आता बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत असताना चांगलं प्रशासन, दडपशाहीपासून मुक्ती आणि विकास या त्रिसूत्रीवर त्या काम करणार आहेत. ममतांची लोकप्रियता पाहून मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनंही मोकळेपणानं मान्य केलं. की हा विजय युतीचा नसून केवळ ममतांचा आहे. ममतांनीही काँग्रेसला सरकारमध्ये सहभागी व्हायचं निमंत्रण दिलंय. दुसरीकडे, माकपचं मुख्यालय असलेल्या आलिमुद्दीन स्ट्रीटवर भकास वातावरण आहे. मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासोबत त्यांच्या कॅबिनेटमधील अनेक वरिष्ठ मंत्री स्वतःचे मतदारसंघसुद्धा राखू शकले नाही. आम्ही पराभवाचं आत्मपरीक्षण करू आणि विरोधात बसून लोकांची कामं करू असं सीपीएम नेतृत्वाने म्हटले आहे. मतदारांनी ममतांचा ऐतिहासिक विजय दिला. पण त्यांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत. आणि हे आव्हान ममता पेलू शकल्या, तरच त्यांना हा जनाधार टिकवता येणार आहे. चेन्नईमध्ये 'जय'ललिताचेन्नईमध्ये करुणानिधींचा पराभव करून जयललिता निर्विवाद विजय मिळवला आहे. तामिळनाडूतल्या 234 जागांपैकी 198 हुन जास्त जागा अण्णाद्रमुकने मिळवल्या आहेत. एकूणच 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा करूणानिधींच्या द्रमुकला चांगलाच भोवला. 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात करूणानिधी यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून स्पष्ट झालं आणि द्रमुकला मोठा झटका बसला. त्याशिवाय करूणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांचीही या प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे. याचाच फायदा जयललिता आणि त्यांच्या एडीएमके यांच्या पक्षाला मिळाला. आपला संपूर्ण प्रचार जयललिता यांनी करूणानिधी यांची कौटुंबिक सत्ता आणि 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा याच मुद्यांवर केला होता. त्याला जनतेनं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि विजय खेचून आणला.केरळमध्ये परंपरेप्रमाणे सत्ताबदल केरळमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीला बहुमत मिळाले आहे. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जागा पाहता, काँग्रेसची मतं कमी झाली आहे. केवळ तीन मतांनी डाव्या आघाडीचं बहुमत हुकलं असलं. तरी सरकार स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार नाही असं म्हणत मावळते मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी हार कबूल केली. पण या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला तो मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन मतांच्या ध्रुवीकरणाचा. केरळमध्ये भाजपने 138 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना एकाही जागे वर विजय मिळाला नाही. विरोधकांना सत्तेत बसवण्याची तीस वर्षांची परंपरा केरळने यंदाही राखली. पाच वर्ष विरोधात बसलेल्या काँग्रेस आघाडीला 2 मतांचं का होईना. पण बहुमत मिळालंय. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये वीसपैकी सोळा जागा मिळाल्यानंतर काँग्रेसला घवघवीत यशाची अपेक्षा होती. म्हणूनच सत्ता आली तरी जनाधार कमी झाल्याची बाब काँग्रेसला खुपतेय. मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार ओमान चांडी यांनी तसं बोलूनही दाखवलं. डाव्या आघाडीचे मावळते मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांच्या कामावर लोक समाधानी होते, असं आयबीएन नेटवर्कच्या सर्व्हेत दिसून आलं. पण अच्युतानंदन आणि त्यांच्याच पक्षात अनेक मतभेद निवडणुकीच्या निकालांमध्येही प्रतिबिंबित होत आहे. सत्ता केवळ तीन आकडे दूर असली, तरी फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा पराजय स्वीकारत डाव्यांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेससोबत असलेल्या मुस्लिम लीगला 20 जागा मिळाल्या. मुस्लिम मतांचे एवढं ध्रुवीकरण झालं नसतं तर कदाचित काँग्रेसला विरोधात बसावे लागले असते. माकपचे मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांनी काही कट्टर इस्लामिक संस्थांना विरोध केल्यामुळे हिंदूंची मतं माकपच्या मागे एकवटली. असाही निष्कर्ष अनेक जागांच्या निकालावरून काढता येईल. आसाममध्ये काँग्रेसची विजयाची हॅट्ट्रिक तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये काँग्रेसनं सलग तिसर्‍यांदा विजय मिळवला आहे. आसाम गण परिषद आणि भाजपचा धुव्वा उडायला आहे. भाजपनं 121 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं. गेल्यावेळेपेक्षा त्यांना सहा जागांचा तोटा झाला आहे. पण, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटीक फ्रंट म्हणजेच एआययूडीएफनं भाजप आणि आसाम गण परिषदेला मागे सारत 17 जागा पटकावल्या आहे. विकास आणि शांततेची हमी देत काँग्रेसनं आसाममधली सत्ता सलग तिसर्‍या वर्षी राखण्यात यश मिळवलंय. पण यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. 2006 मध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर येताना काँग्रेसला बोडोलँड पीपल्स फ्रंटला सोबत घ्यावं लागलं होतं. पण मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केलेल्या कामांचा फायदा काँग्रेसला झाला. 75 वर्षांचे गोगोई सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहे. विरोधी पक्षातली आघाडीच यंदा फुटलीय. त्यामुळे त्यांच्या मतांचा टक्काही घसरला. व्होटिंग मशीनमध्ये काँग्रेसने फेरफार केल्यामुळेच आमचा पराभव झाल्याचा आरोप आसाम गण परिषदेचे नेते प्रफुल्लकुमार महंतो यांनी केला. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या महंतो यांचा समगुडीत पराभव झाला. तर बरहामपूरमधली जागा मात्र त्यांनी राखली. तसेच आसाम गण परिषदेचे माजी अध्यक्ष वंृदावन गोस्वामी यांचा तेजपूरमधून पराभव झाला.इतर महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आसाम गण परिषदेचे अध्यक्ष चंद्रमोहन पटवारी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजित दत्त यांचा पराभव झाला. दुसरीकडे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली. उल्फासह राज्यातल्या अनेक अतिरेकी संघटनांना चर्चेच्या टेबलवर आणणं, शांतता आणि आर्थिक स्थिरता राखण्यात गोगोई यशस्वी झाल्यामुळे जनतेनं काँग्रेसवर पुन्हा विश्वास टाकला. प्रशासन आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर गोगोई यशस्वी झाले आहे. सलग सहावेळा खासदार राहिलेल्या गोगोई यांनी 17 मे 2001 रोजी आसाम गण परिषदेला बाजूला सारत पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता ते तिसर्‍यांदा शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुदुच्चेरीत काँग्रेसच्या 12 वर्षांच्या सत्तेला खिंडारपुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची 12 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. ज्युनिअर कामराज या नावाने प्रसिध्द असलेले एन रंगास्वामी यांनी काँग्रेसमधून हकालपट्टी काढल्याचा वचपा काढला आहे. रंगास्वामी यांनी काही महिन्यांपूर्वीच अखिल भारतीय नमतू राज्यम काँग्रेसची स्थापना केली होती. या पक्षाची अण्णाद्रमुकबरोबर आघाडी आहे. पुदुच्चेरीमध्ये विधानसभेच्या एकूण 30 जागा आहेत. 2006 मध्ये काँग्रेस आघाडीला 20 जागा मिळाल्या होत्या. आणि आता नेमकं उलटं चित्र आहे. रंगास्वामी यांच्या पक्षाला वीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळाला आहे. पुदुच्चेरीमध्ये तामिळ आणि तेलगू मतदारांबरोबरच फ्रेंच मतदारही आहेत.

  • Share this:

13 मे

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या साडे तीन दशकांच्या सत्तेला ममता बॅनर्जीनी सुरूंग लावला आहे. 294 पैकी जवळपास दोन तृतीयांश जागांवर ममता बॅनर्जीनी आघाडी घेतली. हा विजय जनतेचा असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जीनी दिली. तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेच्या 13 वर्षानंतर बरोबर 13 तारखेलाच ममता बॅनर्जीना सत्ता मिळाली आहे.

ममता बॅनर्जीनी आज तीन दशकांच्या डाव्या राजवटीचा धुव्वा उडवला. पश्चिम बंगालच्या विधानसभेत त्यांना आणि काँग्रेसला मिळून तीन चतुर्थांश बहुमत मिळालंय. काँग्रेसशिवायही ममता दीदी सरकार बनवण्याच्या स्थितीत आहेत. पण त्यांनी काँग्रेसला सरकारमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय. दुसरीकडे ममतांच्या सुनामीत डाव्यांचे अनेक बुरूज कोसळले. खुद्द बुद्धदेव भट्टाचार्यही स्वतःची जागा वाचवू शकले नाहीत.

कोलकाता शहराच्या कालीघाटवर वाजणा-या या ढोलांनी डाव्यांच्या गडाला मूळापासून हादरे दिलेत. गेल्या 34 वर्षांत झालेल्या प्रत्येक निवडणुकीनंतर इथं फक्त लाल रंग उधळला जायचा. पण आता हे शहर, हे राज्य, तृणमूलच्या हिरव्या रंगानं रंगलंय. ममता बॅनर्जींच्या परिवर्तनाच्या नार्‍याला बंगली मतदाराने भरभरून प्रतिसाद दिला.

गेल्या तीन दशकांपासून डाव्यांना विरोध करणार्‍या ममतांना राज्यभर लोकप्रियता मिळाली. ती शिंगूर आणि नंदीग्रामच्या आंदोलनांनतर. त्यानंतर त्यांचा झंझावात पाहून डाव्यांनी आपल्या भूमिकात अनेक बदल केले. पण तोवर उशीर झाला होता.

ममता दीदींनी उभा बंगाल जिंकला होता. आता बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत असताना चांगलं प्रशासन, दडपशाहीपासून मुक्ती आणि विकास या त्रिसूत्रीवर त्या काम करणार आहेत.

ममतांची लोकप्रियता पाहून मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनंही मोकळेपणानं मान्य केलं. की हा विजय युतीचा नसून केवळ ममतांचा आहे. ममतांनीही काँग्रेसला सरकारमध्ये सहभागी व्हायचं निमंत्रण दिलंय.

दुसरीकडे, माकपचं मुख्यालय असलेल्या आलिमुद्दीन स्ट्रीटवर भकास वातावरण आहे. मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासोबत त्यांच्या कॅबिनेटमधील अनेक वरिष्ठ मंत्री स्वतःचे मतदारसंघसुद्धा राखू शकले नाही.

आम्ही पराभवाचं आत्मपरीक्षण करू आणि विरोधात बसून लोकांची कामं करू असं सीपीएम नेतृत्वाने म्हटले आहे. मतदारांनी ममतांचा ऐतिहासिक विजय दिला. पण त्यांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत. आणि हे आव्हान ममता पेलू शकल्या, तरच त्यांना हा जनाधार टिकवता येणार आहे.

चेन्नईमध्ये 'जय'ललिता

चेन्नईमध्ये करुणानिधींचा पराभव करून जयललिता निर्विवाद विजय मिळवला आहे. तामिळनाडूतल्या 234 जागांपैकी 198 हुन जास्त जागा अण्णाद्रमुकने मिळवल्या आहेत. एकूणच 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा करूणानिधींच्या द्रमुकला चांगलाच भोवला.

2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात करूणानिधी यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून स्पष्ट झालं आणि द्रमुकला मोठा झटका बसला. त्याशिवाय करूणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांचीही या प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे.

याचाच फायदा जयललिता आणि त्यांच्या एडीएमके यांच्या पक्षाला मिळाला. आपला संपूर्ण प्रचार जयललिता यांनी करूणानिधी यांची कौटुंबिक सत्ता आणि 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा याच मुद्यांवर केला होता. त्याला जनतेनं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि विजय खेचून आणला.

केरळमध्ये परंपरेप्रमाणे सत्ताबदल

केरळमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीला बहुमत मिळाले आहे. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जागा पाहता, काँग्रेसची मतं कमी झाली आहे. केवळ तीन मतांनी डाव्या आघाडीचं बहुमत हुकलं असलं. तरी सरकार स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार नाही असं म्हणत मावळते मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी हार कबूल केली. पण या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला तो मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन मतांच्या ध्रुवीकरणाचा. केरळमध्ये भाजपने 138 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना एकाही जागे वर विजय मिळाला नाही.

विरोधकांना सत्तेत बसवण्याची तीस वर्षांची परंपरा केरळने यंदाही राखली. पाच वर्ष विरोधात बसलेल्या काँग्रेस आघाडीला 2 मतांचं का होईना. पण बहुमत मिळालंय. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये वीसपैकी सोळा जागा मिळाल्यानंतर काँग्रेसला घवघवीत यशाची अपेक्षा होती. म्हणूनच सत्ता आली तरी जनाधार कमी झाल्याची बाब काँग्रेसला खुपतेय. मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार ओमान चांडी यांनी तसं बोलूनही दाखवलं.

डाव्या आघाडीचे मावळते मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांच्या कामावर लोक समाधानी होते, असं आयबीएन नेटवर्कच्या सर्व्हेत दिसून आलं. पण अच्युतानंदन आणि त्यांच्याच पक्षात अनेक मतभेद निवडणुकीच्या निकालांमध्येही प्रतिबिंबित होत आहे. सत्ता केवळ तीन आकडे दूर असली, तरी फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा पराजय स्वीकारत डाव्यांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला.

या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेससोबत असलेल्या मुस्लिम लीगला 20 जागा मिळाल्या. मुस्लिम मतांचे एवढं ध्रुवीकरण झालं नसतं तर कदाचित काँग्रेसला विरोधात बसावे लागले असते. माकपचे मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांनी काही कट्टर इस्लामिक संस्थांना विरोध केल्यामुळे हिंदूंची मतं माकपच्या मागे एकवटली. असाही निष्कर्ष अनेक जागांच्या निकालावरून काढता येईल.

आसाममध्ये काँग्रेसची विजयाची हॅट्ट्रिक तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये काँग्रेसनं सलग तिसर्‍यांदा विजय मिळवला आहे. आसाम गण परिषद आणि भाजपचा धुव्वा उडायला आहे. भाजपनं 121 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं.

गेल्यावेळेपेक्षा त्यांना सहा जागांचा तोटा झाला आहे. पण, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटीक फ्रंट म्हणजेच एआययूडीएफनं भाजप आणि आसाम गण परिषदेला मागे सारत 17 जागा पटकावल्या आहे. विकास आणि शांततेची हमी देत काँग्रेसनं आसाममधली सत्ता सलग तिसर्‍या वर्षी राखण्यात यश मिळवलंय. पण यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे.

2006 मध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर येताना काँग्रेसला बोडोलँड पीपल्स फ्रंटला सोबत घ्यावं लागलं होतं. पण मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केलेल्या कामांचा फायदा काँग्रेसला झाला. 75 वर्षांचे गोगोई सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहे.

विरोधी पक्षातली आघाडीच यंदा फुटलीय. त्यामुळे त्यांच्या मतांचा टक्काही घसरला. व्होटिंग मशीनमध्ये काँग्रेसने फेरफार केल्यामुळेच आमचा पराभव झाल्याचा आरोप आसाम गण परिषदेचे नेते प्रफुल्लकुमार महंतो यांनी केला.

दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या महंतो यांचा समगुडीत पराभव झाला. तर बरहामपूरमधली जागा मात्र त्यांनी राखली. तसेच आसाम गण परिषदेचे माजी अध्यक्ष वंृदावन गोस्वामी यांचा तेजपूरमधून पराभव झाला.

इतर महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आसाम गण परिषदेचे अध्यक्ष चंद्रमोहन पटवारी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजित दत्त यांचा पराभव झाला.

दुसरीकडे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली. उल्फासह राज्यातल्या अनेक अतिरेकी संघटनांना चर्चेच्या टेबलवर आणणं, शांतता आणि आर्थिक स्थिरता राखण्यात गोगोई यशस्वी झाल्यामुळे जनतेनं काँग्रेसवर पुन्हा विश्वास टाकला.

प्रशासन आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर गोगोई यशस्वी झाले आहे. सलग सहावेळा खासदार राहिलेल्या गोगोई यांनी 17 मे 2001 रोजी आसाम गण परिषदेला बाजूला सारत पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता ते तिसर्‍यांदा शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पुदुच्चेरीत काँग्रेसच्या 12 वर्षांच्या सत्तेला खिंडार

पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची 12 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. ज्युनिअर कामराज या नावाने प्रसिध्द असलेले एन रंगास्वामी यांनी काँग्रेसमधून हकालपट्टी काढल्याचा वचपा काढला आहे. रंगास्वामी यांनी काही महिन्यांपूर्वीच अखिल भारतीय नमतू राज्यम काँग्रेसची स्थापना केली होती. या पक्षाची अण्णाद्रमुकबरोबर आघाडी आहे.

पुदुच्चेरीमध्ये विधानसभेच्या एकूण 30 जागा आहेत. 2006 मध्ये काँग्रेस आघाडीला 20 जागा मिळाल्या होत्या. आणि आता नेमकं उलटं चित्र आहे. रंगास्वामी यांच्या पक्षाला वीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळाला आहे. पुदुच्चेरीमध्ये तामिळ आणि तेलगू मतदारांबरोबरच फ्रेंच मतदारही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 11:38 AM IST

ताज्या बातम्या