कनिमोळींच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह; उद्या पुन्हा सुनावणी

कनिमोळींच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह; उद्या पुन्हा सुनावणी

06 मे2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांना अटक होणार का हा प्रश्न चर्चेत आहे. याबद्दल आज दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी झाली. ती शनिवारीही सुरू राहणार आहे. 2 जी घोटाळ्यात कनिमोळी या सहआरोपी आहेत. कनिमोळी यांच्यासोबत आज कोर्टात त्यांचे पती आणि कलाईग्नार टीव्हीचे एमडी शरद कुमार, आणि द्रमुकचे 9 खासदार कोर्टात उपस्थित होते. 2 जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्याचे धागेदोरे करुणानिधी कुटुंबीयांपर्यंत पोचलेत. या घोटाळ्याचा पैसा करुणानिधी कुटुंबाच्या मालकीच्या कलाईग्नार टीव्हीपर्यंत पोचल्याचा सीबीआयचा आरोप आहे. आणि सीबीआयच्या चार्जशीटमध्ये कनिमोळींचं नाव आहे. कनिमोळींना अटक झाली तर 2 जी प्रकरणी अटक होणारी करुणानिधी कुटुंबातली ती पहिलीच व्यक्ती असेल. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी कनिमोळी यांचं वकीलपत्र घेतलंय. कनिमोळी या करुणानिधी यांची मुलगी असल्याने त्यांना लक्ष्य केलं जातंय असा आरोप जेठमलानी यांनी आज कोर्टात केला. शाहीद बलवा आणि डी बी रिऍल्टीच्या 2 जी कनेक्शन प्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा दोषी आहेत. कनिमोळी यांना त्यासाठी अटक होऊ शकत नाही असं जेठमलानी म्हणाले. दरम्यान 2 जी घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या पाच कॉर्पोरेट अधिकार्‍यांच्या जामीन याचिकेवरची सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. राम जेठमलानींचा युक्तिवाद- कनिमोळी यांच्याविरोधात कोणताही गुन्हा नाही- कनिमोळींचा 2 जी स्पेक्ट्रमशी संबंध नाही - त्या कलाईग्नार टीव्हीत केवळ एक शेअर होल्डर आहेत - त्या कलाईग्नार टीव्हीत संचालक नाहीत - निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नाही- कनिमोळींनी कोर्टाच्या समन्सचा मान राखला- त्यामुळे त्यांना चांगली वागणूक मिळायला हवीदरम्यान, 2 जी घोटाळ्यातल्या दोषींवर कायदेशीर कारवाई होईल. पण त्यामुळे काँग्रेस आणि द्रमुकच्या आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं काँग्रेसच्या नेत्या जयंती नटराजन यांनी स्पष्ट केलंय. तर 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सहारा उद्योग समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासह इतर दोघांना नोटीस बजावली आहे. तपास अधिकारी राजेश्वर सिंग यांना सहाराकडून धमकी मिळाल्याचे एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने कोर्टात सांगितलं. त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. 2 जी घोटाळा प्रकरणातल्या एस्टेल या कंपनीचे सहारा फायनान्सशी काय संबंध आहेत, याची चौकशी राजेश्वर सिंग करत होते. पण, सहाराने त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारून छळ केला. तसेच त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा गौप्यस्फोट सहारा न्यूज टीव्हीवरून करू, अशी धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचं ईडीचं म्हणणं आहे. या अधिकार्‍याशी संबंधित कोणतीही बातमी प्रसिद्ध करू नये, असे आदेशही कोर्टाने दिले आहे.

  • Share this:

06 मे2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांना अटक होणार का हा प्रश्न चर्चेत आहे. याबद्दल आज दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी झाली. ती शनिवारीही सुरू राहणार आहे. 2 जी घोटाळ्यात कनिमोळी या सहआरोपी आहेत. कनिमोळी यांच्यासोबत आज कोर्टात त्यांचे पती आणि कलाईग्नार टीव्हीचे एमडी शरद कुमार, आणि द्रमुकचे 9 खासदार कोर्टात उपस्थित होते. 2 जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्याचे धागेदोरे करुणानिधी कुटुंबीयांपर्यंत पोचलेत.

या घोटाळ्याचा पैसा करुणानिधी कुटुंबाच्या मालकीच्या कलाईग्नार टीव्हीपर्यंत पोचल्याचा सीबीआयचा आरोप आहे. आणि सीबीआयच्या चार्जशीटमध्ये कनिमोळींचं नाव आहे. कनिमोळींना अटक झाली तर 2 जी प्रकरणी अटक होणारी करुणानिधी कुटुंबातली ती पहिलीच व्यक्ती असेल. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी कनिमोळी यांचं वकीलपत्र घेतलंय.

कनिमोळी या करुणानिधी यांची मुलगी असल्याने त्यांना लक्ष्य केलं जातंय असा आरोप जेठमलानी यांनी आज कोर्टात केला. शाहीद बलवा आणि डी बी रिऍल्टीच्या 2 जी कनेक्शन प्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा दोषी आहेत. कनिमोळी यांना त्यासाठी अटक होऊ शकत नाही असं जेठमलानी म्हणाले. दरम्यान 2 जी घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या पाच कॉर्पोरेट अधिकार्‍यांच्या जामीन याचिकेवरची सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

राम जेठमलानींचा युक्तिवाद

- कनिमोळी यांच्याविरोधात कोणताही गुन्हा नाही- कनिमोळींचा 2 जी स्पेक्ट्रमशी संबंध नाही - त्या कलाईग्नार टीव्हीत केवळ एक शेअर होल्डर आहेत - त्या कलाईग्नार टीव्हीत संचालक नाहीत - निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नाही- कनिमोळींनी कोर्टाच्या समन्सचा मान राखला- त्यामुळे त्यांना चांगली वागणूक मिळायला हवी

दरम्यान, 2 जी घोटाळ्यातल्या दोषींवर कायदेशीर कारवाई होईल. पण त्यामुळे काँग्रेस आणि द्रमुकच्या आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं काँग्रेसच्या नेत्या जयंती नटराजन यांनी स्पष्ट केलंय.

तर 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सहारा उद्योग समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासह इतर दोघांना नोटीस बजावली आहे. तपास अधिकारी राजेश्वर सिंग यांना सहाराकडून धमकी मिळाल्याचे एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने कोर्टात सांगितलं. त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली.

2 जी घोटाळा प्रकरणातल्या एस्टेल या कंपनीचे सहारा फायनान्सशी काय संबंध आहेत, याची चौकशी राजेश्वर सिंग करत होते. पण, सहाराने त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारून छळ केला. तसेच त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा गौप्यस्फोट सहारा न्यूज टीव्हीवरून करू, अशी धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचं ईडीचं म्हणणं आहे. या अधिकार्‍याशी संबंधित कोणतीही बातमी प्रसिद्ध करू नये, असे आदेशही कोर्टाने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 06:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading