नितीन गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले

नितीन गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले

  • Share this:

Gadkari accidenty

24 जून : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पश्चिम बंगालच्या हल्दिया जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पश्चिम बंगालमधल्या हल्दिया इथं नवीन बंदराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते इथे आले होते. हेलिकॉप्टर लँड होत असताना हेलिपॅडवरील अंथरण्यात आलेले कार्पेट उडू लागले. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही.

प.बंगालच्या इस्ट मिदनापूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गडकरी जात होते. हेलिकॉप्टर लँड होत असताना हेलिपॅडवरचं कार्पेटं उडाल्याने अपघाताची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड केले. हेलिकॉप्टरवरील पंख्याच्या वेगाने खाली अंथरण्यात आलेले कार्पेट अचानक उडू लागले. जर हे कार्पेट हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकले असते तर हेलिकॉप्टरचा अपघात होण्याची दाट शक्यता होती. पण सुदैवाने तसं झालं नाही. त्यानंतर नितीन गडकरी नियोज कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि नंतर त्याच ते हेलिकॉप्टरनं कोलकत्याला रवानाही झाले.

दरम्यान, काळजीचं कुठलंही कारण नसल्याची माहिती नितीन गडकरींच्या सहाय्यक चारूदत्त बोकाडे यांनी दिली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 24, 2015, 1:58 PM IST

ताज्या बातम्या