नांदा सौख्य भरे...

नांदा सौख्य भरे...

29 एप्रिलप्रिन्स विल्यमस् आणि केट मिडलटन यांचं आज लग्न झालं. आणि त्यांची स्वीट रोमँटिक स्टोरी प्रत्यक्षात आली. वेस्टमिनिस्टर ऍबीमध्ये हा शाही सोहळा संपन्न झाला. लग्नाची तारीख जाहीर झाल्यापासून लंडनमधल्या घराघरात चर्चा होती ती या क्षणाची. लंडनच्या इतिहासातील अनेक क्षणांना साक्षीदार ठरलेली हजार वर्षांची परंपरा असलेली वेस्टमिनिस्टर ऍबी ठरली विल्यम आणि केटच्या लग्नाचीही साक्षीदार.राजघराण्याच्या परंपरेनुसार क्वीन एलिझाबेथने रॉयल टायटल्स बहाल केल्यानंतर बकिंगहॅम पॅलेसमधली मंडळी लग्नासाठी निघाली. तर दुसरीकडे वेस्ट मिनिस्टर ऍबीत देशविदेशातली तब्बल 1900 पाहुणेमंडळी दाखल होत होती. प्रथेनुसार प्रिन्स विल्यम आपला धाकटा भाऊ आणि बेस्ट मॅन प्रिन्स हॅरीसोबत पोहचला. राजघराण्यातल्या व्यक्तीला पाहण्याची उत्सुकता वाढायला सुरुवात झाली. त्यानंतर हॉलमध्ये आली केटची आई कॅरोल मिडलटन.प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिल पार्कर यांच्यानंतर पॅलेसमधून निघाली मानाची स्वारी. क्वीन एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप. या लग्नाची मेड ऑफ ऑनर होती केटची बहिण पीपा मेडलटन. आता सगळ्यांनाच उत्सुकता होती ब्राईड टू बी केट मिडलटनची. केट मिडलटनच्या ड्रेसबद्दल प्रचंड उत्सुकता होती. केटचा वेडिंग गाऊन डिझाईन केला होता सराह बर्टननं. पांढर्‍या शुभ्र ड्रेसवर केलेलं लेसचं डिझाईन लक्ष वेधून घेत होतं. तर विल्यमने खास राजेशाही पोषाख घातला होता. यानंतर आला या दोघांच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण. आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी साथ देण्याची शपथ यावेळी देण्यात आली. प्रिन्स विल्यमला 'ड्युक ऑफ केंब्रिज'चा मान देण्यात आला तर केट असेल 'हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ केंब्रिज. रॉयल कॉयर आणि प्रार्थना झाल्यानंतर ड्यूक ऑफ कैम्ब्रिज आणि डचेस ऑफ कै ब्रिज या दोघांची शाही मिरवणूक वेस्ट मिनिस्टर ऍबीतून निघाली बकिंगहॅम पॅलेसकडे. वेस्टमिनिस्टर ऍबीपासून बकिंगहॅमपर्यंतचा रस्ता अक्षरश: फुलून गेला होता. हे जोडपं राजवाड्यात पोहचलं तरीही गर्दी तशीच होती. कारण जमलेल्या या अलोट गर्दीचे लक्ष होतं. बकिंगहॅम पॅलेसच्या गॅलरीकडे. कारण शाही जोडप्प येथे येऊन लोकांना हात उंचावते. यानंतर पॅलेसपासून सगळीकडे आहे पार्टीचा मूड. जणू आपल्याच घरचं कार्य असल्यासारखा प्रत्येकजण धमाल करत होता. या सगळ्यात एका व्यक्तीची आठवण विल्यमसह प्रत्येक ब्रिटनवासियाला नक्की आली असेल ती म्हणजे. प्रिन्सेस डायना.या शाही सोहळ्यासाठी जगभरातील अनेक सेलिब्रिटीजही उपस्थित होते. फुटबॉल स्टार डेव्हिड बेकहम आणि त्याची स्टार वाईफ व्हिक्टोरीया बेकहमने सर्वात पहिल्यांदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं. या सोहळ्यात पॉप संगीत किंवा इतर कोणतही संगीत सादर झालं नाही. पण सर एल्टन जोन्स यांची उपस्थिती सर्व उणीवा भरुन काढत होती. या सोहळ्यासाठी बेल्जियम, डेन्मार्क, नॉर्वे, सर्बिया, स्पेन, स्वीडन अशा युरोपीय देशांच्या राजघराण्याची मंडळीही उपस्थित होती. पण ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि गॉर्डन ब्राऊन यांना या शाही सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. तर ब्रिटनच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या मार्गारेट थॅचर आणि जॉन मेजर यांना मात्र निमंत्रितांच्या यादीत वरचं स्थान देण्यात आलं होतं. या शाही लग्नसोहळ्यासाठी फक्त निवडक पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पण या नवीन दाम्पत्याला आशार्वाद देण्यासाठी लाखो लोकांनी लंडनचे रस्ते फुलून गेले होते. आज जवळपास 6 लाख लोक हे लंडन आणि जगभरातून या नवीन दाम्पत्याला आशीर्वाद द्यायला जमले होते. लोकांनी तर चक्क तंबू बांधून काही दिवसांपासून लंडनमध्ये ठाण मांडली होती. केट आणि विल्यम यांची बकिंगहम पॅलेसमध्ये तर पार्टी सुरु झाली. पण स्ट्रीट पार्टीजनाही या शाही लग्नसोहळ्यानंतर उधाण आलं. तर या शाही सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जगभरात दाखवण्यात आलं. लाईव्ह टेलिकास्ट तर झालचं. पण त्याचबरोबर यू ट्युबवर पण खास लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आलं होतं. गुगुलने तर या शाही सोहळ्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी 'द रॉयल वेडिंग लाईव्ह' नावाची खास सर्व्हिस आज सुरु केली होती. अनेक वेबसाईट्सने आज या शाही लग्नाचे लाईव्ह अपडेट्स सुद्धा आपल्या वाचकांसाठी दिले होते. त्याचबरोबर फेसबुक असेल, ट्विटर असेल, प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईटवर आज फक्त या शाही लग्नाचीच चलती होती.

  • Share this:

29 एप्रिल

प्रिन्स विल्यमस् आणि केट मिडलटन यांचं आज लग्न झालं. आणि त्यांची स्वीट रोमँटिक स्टोरी प्रत्यक्षात आली. वेस्टमिनिस्टर ऍबीमध्ये हा शाही सोहळा संपन्न झाला. लग्नाची तारीख जाहीर झाल्यापासून लंडनमधल्या घराघरात चर्चा होती ती या क्षणाची. लंडनच्या इतिहासातील अनेक क्षणांना साक्षीदार ठरलेली हजार वर्षांची परंपरा असलेली वेस्टमिनिस्टर ऍबी ठरली विल्यम आणि केटच्या लग्नाचीही साक्षीदार.

राजघराण्याच्या परंपरेनुसार क्वीन एलिझाबेथने रॉयल टायटल्स बहाल केल्यानंतर बकिंगहॅम पॅलेसमधली मंडळी लग्नासाठी निघाली. तर दुसरीकडे वेस्ट मिनिस्टर ऍबीत देशविदेशातली तब्बल 1900 पाहुणेमंडळी दाखल होत होती. प्रथेनुसार प्रिन्स विल्यम आपला धाकटा भाऊ आणि बेस्ट मॅन प्रिन्स हॅरीसोबत पोहचला. राजघराण्यातल्या व्यक्तीला पाहण्याची उत्सुकता वाढायला सुरुवात झाली. त्यानंतर हॉलमध्ये आली केटची आई कॅरोल मिडलटन.

प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिल पार्कर यांच्यानंतर पॅलेसमधून निघाली मानाची स्वारी. क्वीन एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप. या लग्नाची मेड ऑफ ऑनर होती केटची बहिण पीपा मेडलटन. आता सगळ्यांनाच उत्सुकता होती ब्राईड टू बी केट मिडलटनची. केट मिडलटनच्या ड्रेसबद्दल प्रचंड उत्सुकता होती. केटचा वेडिंग गाऊन डिझाईन केला होता सराह बर्टननं. पांढर्‍या शुभ्र ड्रेसवर केलेलं लेसचं डिझाईन लक्ष वेधून घेत होतं. तर विल्यमने खास राजेशाही पोषाख घातला होता.

यानंतर आला या दोघांच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण. आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी साथ देण्याची शपथ यावेळी देण्यात आली. प्रिन्स विल्यमला 'ड्युक ऑफ केंब्रिज'चा मान देण्यात आला तर केट असेल 'हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ केंब्रिज. रॉयल कॉयर आणि प्रार्थना झाल्यानंतर ड्यूक ऑफ कैम्ब्रिज आणि डचेस ऑफ कै ब्रिज या दोघांची शाही मिरवणूक वेस्ट मिनिस्टर ऍबीतून निघाली बकिंगहॅम पॅलेसकडे. वेस्टमिनिस्टर ऍबीपासून बकिंगहॅमपर्यंतचा रस्ता अक्षरश: फुलून गेला होता. हे जोडपं राजवाड्यात पोहचलं तरीही गर्दी तशीच होती.

कारण जमलेल्या या अलोट गर्दीचे लक्ष होतं. बकिंगहॅम पॅलेसच्या गॅलरीकडे. कारण शाही जोडप्प येथे येऊन लोकांना हात उंचावते. यानंतर पॅलेसपासून सगळीकडे आहे पार्टीचा मूड. जणू आपल्याच घरचं कार्य असल्यासारखा प्रत्येकजण धमाल करत होता. या सगळ्यात एका व्यक्तीची आठवण विल्यमसह प्रत्येक ब्रिटनवासियाला नक्की आली असेल ती म्हणजे. प्रिन्सेस डायना.या शाही सोहळ्यासाठी जगभरातील अनेक सेलिब्रिटीजही उपस्थित होते. फुटबॉल स्टार डेव्हिड बेकहम आणि त्याची स्टार वाईफ व्हिक्टोरीया बेकहमने सर्वात पहिल्यांदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं. या सोहळ्यात पॉप संगीत किंवा इतर कोणतही संगीत सादर झालं नाही. पण सर एल्टन जोन्स यांची उपस्थिती सर्व उणीवा भरुन काढत होती.

या सोहळ्यासाठी बेल्जियम, डेन्मार्क, नॉर्वे, सर्बिया, स्पेन, स्वीडन अशा युरोपीय देशांच्या राजघराण्याची मंडळीही उपस्थित होती. पण ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि गॉर्डन ब्राऊन यांना या शाही सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. तर ब्रिटनच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या मार्गारेट थॅचर आणि जॉन मेजर यांना मात्र निमंत्रितांच्या यादीत वरचं स्थान देण्यात आलं होतं. या शाही लग्नसोहळ्यासाठी फक्त निवडक पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पण या नवीन दाम्पत्याला आशार्वाद देण्यासाठी लाखो लोकांनी लंडनचे रस्ते फुलून गेले होते. आज जवळपास 6 लाख लोक हे लंडन आणि जगभरातून या नवीन दाम्पत्याला आशीर्वाद द्यायला जमले होते.

लोकांनी तर चक्क तंबू बांधून काही दिवसांपासून लंडनमध्ये ठाण मांडली होती. केट आणि विल्यम यांची बकिंगहम पॅलेसमध्ये तर पार्टी सुरु झाली. पण स्ट्रीट पार्टीजनाही या शाही लग्नसोहळ्यानंतर उधाण आलं. तर या शाही सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जगभरात दाखवण्यात आलं. लाईव्ह टेलिकास्ट तर झालचं.

पण त्याचबरोबर यू ट्युबवर पण खास लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आलं होतं. गुगुलने तर या शाही सोहळ्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी 'द रॉयल वेडिंग लाईव्ह' नावाची खास सर्व्हिस आज सुरु केली होती. अनेक वेबसाईट्सने आज या शाही लग्नाचे लाईव्ह अपडेट्स सुद्धा आपल्या वाचकांसाठी दिले होते. त्याचबरोबर फेसबुक असेल, ट्विटर असेल, प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईटवर आज फक्त या शाही लग्नाचीच चलती होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2011 12:04 PM IST

ताज्या बातम्या