कृपाशंकर सिंह दोषी आढळले तर कारवाई करावी : मुंबई हायकोर्ट

कृपाशंकर सिंह दोषी आढळले तर कारवाई करावी : मुंबई हायकोर्ट

28 एप्रिल कृपाशंकर सिंह पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी संजय तिवारी यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. इन्फोर्समेंट डिपार्टमेंट, अँटी करप्शन ब्युरो आणि इन्कम टॅक्स विभागांनी याप्रकरणी चौकशी करून आज मुंबई हायकोर्टात त्याचा अहवाल सादर केला. यावर आत्तापर्यंत केलेल्या चौकशीत कृपाशंकर सिंह दोषी आढळले तर कोर्टाच्या आदेशाची वाट न बघता सिंह यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी असे आदेश हायकोर्टाने तपास यंत्रणांना दिले आहे. कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सिंह यांच्या विरोधात याचिकेला हायकोर्टाने तीन तपास यंत्रणांना कृपाशंकर सिंह यांच्यामालमत्तेची चौकशी करून एक अहवाल कोर्टात सादर करायचा आदेश दिला होता. त्याला अनुसरुन तिन्ही तपास यंत्रणांनी आज हायकोर्टात आपला अहवाल सादर केला. यादरम्यान, या अहवालानुसार किंवा आत्तापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे कृपाशंकर सिंह यांच्या मालमत्तेच्या चौकशीच्या आधारे ते दोषी आहेत असं जर आढळलं असेल आणि ते कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर न्यायालयाच्या यांच्यावर कायद्याला अनुसरुन योग्य ती कारवाई करावी.

  • Share this:

28 एप्रिल

कृपाशंकर सिंह पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी संजय तिवारी यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. इन्फोर्समेंट डिपार्टमेंट, अँटी करप्शन ब्युरो आणि इन्कम टॅक्स विभागांनी याप्रकरणी चौकशी करून आज मुंबई हायकोर्टात त्याचा अहवाल सादर केला. यावर आत्तापर्यंत केलेल्या चौकशीत कृपाशंकर सिंह दोषी आढळले तर कोर्टाच्या आदेशाची वाट न बघता सिंह यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी असे आदेश हायकोर्टाने तपास यंत्रणांना दिले आहे.

कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सिंह यांच्या विरोधात याचिकेला हायकोर्टाने तीन तपास यंत्रणांना कृपाशंकर सिंह यांच्यामालमत्तेची चौकशी करून एक अहवाल कोर्टात सादर करायचा आदेश दिला होता. त्याला अनुसरुन तिन्ही तपास यंत्रणांनी आज हायकोर्टात आपला अहवाल सादर केला. यादरम्यान, या अहवालानुसार किंवा आत्तापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे कृपाशंकर सिंह यांच्या मालमत्तेच्या चौकशीच्या आधारे ते दोषी आहेत असं जर आढळलं असेल आणि ते कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर न्यायालयाच्या यांच्यावर कायद्याला अनुसरुन योग्य ती कारवाई करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 01:46 PM IST

ताज्या बातम्या