S M L

'गोध्रा दंगल मोदींनी पेटवली' !

22 एप्रिलगुजरातमध्ये दंगली घडत असताना नरेंद्र मोदींनी त्याचे समर्थन केल्याचा आरोप गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी केला आहे. सोबतच या दंगलींचा तपास करणारी एसआयटी सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही भट यांचं म्हणणं आहे. पण ज्या बैठकीचा उल्लेख भट करतायत त्या बैठकीला ते उपस्थितच नसल्याचे म्हणत गुजरात सरकारने पलटवार केला. गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या दंगली पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना अडचणीत आणणार असं दिसतंय. गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. गोध्रा रेल्वे जळीत घटनेनंतर मोदींनी 27 एप्रिल 2002मध्ये घेतलेल्या बैठकीला आपण उपस्थित असल्याचे संजीव भट यांनी या 18 पानी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. संजीव भट म्हणतात, विहिंपने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं. हिंदूंच्या भावना आता प्रक्षोभित असून त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले होत. यासोबतच गुजरात दंगलींचा तपास करणार्‍या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमवर आपला विश्वास नसून सत्य लपवण्याचा प्रयत्न एसआयटी करत असल्याचं भट यांनी म्हटलंय. भट यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. 27 एप्रिलला आपण बैठक घेतल्याचे मोदींनी मान्य केलं असलं तरी दंगलींबाबत आपण असं कोणतंही विधान केल्याचं मोदींनी फेटाळलंय. इतकंच नाही तर या बैठकीला भट हजरच नसल्याचे सांगत भाजप आणि गुजरात सरकारने नवीनच मुद्दा उपस्थित केला आहे. मोदींच्या विरोध पहिल्यांदाच एखाद्या पोलीस अधिकार्‍याने अशाप्रकारचा पवित्रा घेतला आहे. संजीव भट यांच्या या प्रतिज्ञापत्रावर आता पुढच्या महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल आणि 2002 मधल्या गुजरात दंगलींचा तपास करणार्‍या एसआयटीसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकेल.संजीव भट्ट यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गोध्रा दंगलीसंदर्भातील अनेक वादाचे मुद्दे पुढे आले आहेत. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काय आदेश दिले आणि काय चर्चा झाली हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे तेव्हा मोदी काय म्हणाले यावर आताच कुठलाही दावा करता येणार नाही. पण संजीव भट्ट यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय हे पाहणं मात्र महत्त्वाचे आहे.गोध्राच्या घटनेनंतर तिथं जो दंगा भडकला त्यानंतर हिंदूंच्या भावनांना आवर घालू नका, असा आदेश गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी त्यांच्या अधिकार्‍यांना दिला होता का हाच प्रश्न खरंतर गेल्या आठवर्षांपासून विचारला जातोय. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालात मात्र गोध्रामध्ये दंगल भडकण्याच्या आदल्या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी 27 फेब्रुवारी 2002 ला एक बैठक झाल्याचे नमूद करण्यात आलंय.या कटात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, तत्कालीन पोलीस महासंचालक के. चक्रवर्ती आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्त पी. सी. पांडे यांना दोषी ठरवण्यात आलं. या बैठकीत उपस्थित दोन अधिकार्‍यांनी त्यावेळी मोदींनी पोलिसांना असा आदेश दिल्याचे आठवत नसल्याचे सांगितलं. मोदींनी पोलिसांनी अशाप्रकारचा आदेश दिला, याचा चार पोलीस अधिकार्‍यांनी स्पष्टपणे इन्कार केला. यापैकी दोन अधिकार्‍यांना राज्य सरकारने त्यांच्या निवृत्तीनंतरही सेवेत सामावून घेतलं होतं. विशेष म्हणजे संजीव भट्ट हे त्यावेळी खूपच ज्युनिअर अधिकारी होते, त्यामुळे अशाप्रकारच्या उच्चस्तरीय बैठकीला त्यांना बोलावलं गेलं नसेल, असं एसआयटी प्रमुख आर. के. राघवन यांनी म्हटलं आहे. पण गुजरातच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख आर.बी.श्रीकुमार यांनी मात्र भट्ट जे बोलताहेत, ते सत्य असल्याचं म्हटलंय. मोदींच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री हरेन पांड्या यांनीही यात सक्रीय सहभाग दर्शवला होता. त्यावेळी मोदींनी दंगलखोरांच्याबाबतीत सौम्य भूमिका घ्या, असा आदेश पोलिसांना दिला होता. त्यानंतर एका वर्षाने पांड्या यांची हत्या झाली. आणि आता संजीव भट्ट यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे याप्रकरणाला नवं वळण मिळालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2011 10:18 AM IST

'गोध्रा दंगल मोदींनी पेटवली' !

22 एप्रिल

गुजरातमध्ये दंगली घडत असताना नरेंद्र मोदींनी त्याचे समर्थन केल्याचा आरोप गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी केला आहे. सोबतच या दंगलींचा तपास करणारी एसआयटी सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही भट यांचं म्हणणं आहे. पण ज्या बैठकीचा उल्लेख भट करतायत त्या बैठकीला ते उपस्थितच नसल्याचे म्हणत गुजरात सरकारने पलटवार केला.

गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या दंगली पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना अडचणीत आणणार असं दिसतंय. गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. गोध्रा रेल्वे जळीत घटनेनंतर मोदींनी 27 एप्रिल 2002मध्ये घेतलेल्या बैठकीला आपण उपस्थित असल्याचे संजीव भट यांनी या 18 पानी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.

संजीव भट म्हणतात, विहिंपने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं. हिंदूंच्या भावना आता प्रक्षोभित असून त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले होत. यासोबतच गुजरात दंगलींचा तपास करणार्‍या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमवर आपला विश्वास नसून सत्य लपवण्याचा प्रयत्न एसआयटी करत असल्याचं भट यांनी म्हटलंय. भट यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय.

27 एप्रिलला आपण बैठक घेतल्याचे मोदींनी मान्य केलं असलं तरी दंगलींबाबत आपण असं कोणतंही विधान केल्याचं मोदींनी फेटाळलंय. इतकंच नाही तर या बैठकीला भट हजरच नसल्याचे सांगत भाजप आणि गुजरात सरकारने नवीनच मुद्दा उपस्थित केला आहे. मोदींच्या विरोध पहिल्यांदाच एखाद्या पोलीस अधिकार्‍याने अशाप्रकारचा पवित्रा घेतला आहे. संजीव भट यांच्या या प्रतिज्ञापत्रावर आता पुढच्या महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल आणि 2002 मधल्या गुजरात दंगलींचा तपास करणार्‍या एसआयटीसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकेल.संजीव भट्ट यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गोध्रा दंगलीसंदर्भातील अनेक वादाचे मुद्दे पुढे आले आहेत. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काय आदेश दिले आणि काय चर्चा झाली हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे तेव्हा मोदी काय म्हणाले यावर आताच कुठलाही दावा करता येणार नाही. पण संजीव भट्ट यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय हे पाहणं मात्र महत्त्वाचे आहे.

गोध्राच्या घटनेनंतर तिथं जो दंगा भडकला त्यानंतर हिंदूंच्या भावनांना आवर घालू नका, असा आदेश गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी त्यांच्या अधिकार्‍यांना दिला होता का हाच प्रश्न खरंतर गेल्या आठवर्षांपासून विचारला जातोय. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालात मात्र गोध्रामध्ये दंगल भडकण्याच्या आदल्या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी 27 फेब्रुवारी 2002 ला एक बैठक झाल्याचे नमूद करण्यात आलंय.

या कटात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, तत्कालीन पोलीस महासंचालक के. चक्रवर्ती आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्त पी. सी. पांडे यांना दोषी ठरवण्यात आलं. या बैठकीत उपस्थित दोन अधिकार्‍यांनी त्यावेळी मोदींनी पोलिसांना असा आदेश दिल्याचे आठवत नसल्याचे सांगितलं. मोदींनी पोलिसांनी अशाप्रकारचा आदेश दिला, याचा चार पोलीस अधिकार्‍यांनी स्पष्टपणे इन्कार केला. यापैकी दोन अधिकार्‍यांना राज्य सरकारने त्यांच्या निवृत्तीनंतरही सेवेत सामावून घेतलं होतं.

विशेष म्हणजे संजीव भट्ट हे त्यावेळी खूपच ज्युनिअर अधिकारी होते, त्यामुळे अशाप्रकारच्या उच्चस्तरीय बैठकीला त्यांना बोलावलं गेलं नसेल, असं एसआयटी प्रमुख आर. के. राघवन यांनी म्हटलं आहे. पण गुजरातच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख आर.बी.श्रीकुमार यांनी मात्र भट्ट जे बोलताहेत, ते सत्य असल्याचं म्हटलंय.

मोदींच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री हरेन पांड्या यांनीही यात सक्रीय सहभाग दर्शवला होता. त्यावेळी मोदींनी दंगलखोरांच्याबाबतीत सौम्य भूमिका घ्या, असा आदेश पोलिसांना दिला होता. त्यानंतर एका वर्षाने पांड्या यांची हत्या झाली. आणि आता संजीव भट्ट यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे याप्रकरणाला नवं वळण मिळालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2011 10:18 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close