Food Delivery देणाऱ्या Swiggy ने पहिल्यांदाच केली तृतीयपंथीयाची नेमणूक, सपोर्ट ग्रुपही करणार सुरू

Food Delivery देणाऱ्या Swiggy ने पहिल्यांदाच केली तृतीयपंथीयाची नेमणूक, सपोर्ट ग्रुपही करणार सुरू

Swiggy, Samyukta Vijayan - स्विगीनं पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाची नेमणूक केलीय. तिचं करियर खूपच उल्लेखनीय आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : स्विगीवरून आपण अनेकदा पदार्थांची ऑर्डर करत असतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का ही कंपनी किती पुरोगामी आहे ते. नुकतंच स्विगीनं एका तृतीयपंथीला मुख्य प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्त केलंय. त्या आहेत संयुक्ता विजयन. त्यांनी युरोप आणि अमेरिकेत काम केलंय. अनेक वर्ष त्या अमेझाॅन कंपनीत काम करत होत्या. त्यांचा TouteStudio असा एक स्टुडिओ होता. तिथे तृतीयपंथी लोकांना मेकअप, हेअरस्टाइल,फॅशन करण्यासाठी मदत केली जायची.

2017मध्ये त्या भारतात परतल्या. स्विगीमध्ये आता त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. इंग्लिश मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'भारतीय काॅर्पोरेट हाऊसेस आता तृतीयपंथीयांना पाठिंबा देतायत. पण त्यांनी संस्थेत तृतीयपंथीयांना पाठिंबा देण्यासाठी सपोर्ट ग्रुपही स्थापन करावा.'

SBI ग्राहकांसाठी खूशखबर, 1ऑगस्टपासून बँकेच्या 'या' सेवा होतील मोफत

त्या म्हणाल्या, 'अनेक तृतीयपंथींमध्ये शैक्षणिक पात्रता नसते. मलाही कुटुंबाचं सहकार्य मिळालं असतं तर मी शिक्षण आणि इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकले असते. सध्या मी कुणाच्याही पाठिंब्याशिवाय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे इतर तृतीयपंथींपेक्षा माझ्यापुढची आव्हानं वेगळी आहेत.'

फ्लिपकार्ड लाँच करतंय क्रेडिट कार्ड, खरेदीवर ग्राहकांना मिळतील 'या' सवलती

'तृतीयपंथींमध्ये अनेक क्षेत्रात काम करण्याची क्षमता असते. पण त्यांच्याकडे आवश्यक असं क्वालिफिकेशन नसतं. त्यांना प्रशिक्षण दिलं तर त्यांनाही नोकरी मिळू शकते.'

'या' तारखेनंतर IT रिटर्न भरला तर 'इतका' पडेल दंड

त्या म्हणाल्या, ' मी स्विगीमध्ये आल्यावर 'वुमेन इन टेक' ग्रुपमध्ये काम सुरू केलं. कंपनीनं तृतीयपंथींसाठीही काम सुरू केलंय. आम्ही लवकरच तृतीयपंथींना नोकऱ्या देणार आहोत. '

संयुक्ता विजयन यांची यशस्वी कारकीर्द सुरू आहे. त्यांना अजून बऱ्याच महत्त्वाकांक्षी गोष्टी करायच्यात.

VIDEO : RSSच्या शाखेत दोन गटात तुफान हाणामारी

First published: July 12, 2019, 4:40 PM IST
Tags: swiggy

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading