वसई-विरार गाव वगळण्याप्रकरणी युतीकडून सभात्याग

18 एप्रिलवसई विरार महापालिकेची गावं वगळण्याचा मुद्यावर विधासभेत सेना भाजपने सभात्याग केला आहे. सुभाष देसाई यांनी यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडला. त्यानंतर अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे सरकारला दिले आहेत. पण यानंतरही समाधान न झाल्याने विरोधकांनी सभा त्याग केला.दरम्यान वसई विरार महापालिकेतून 35 गावं वगळावी असा सरकारचा निर्णय झालेला असूनही अंतिम अधिसूचना अजूनही निघालेली नाही. ही अधिसूचना तत्काळ काढावी या मागणीसाठी वसई जनआंदोलन समितीनं आता पुन्हा आंदोलन सुरू केलंय. काल या 35 गावांमधून नागरिकांनी वसई ते विधानभवन असा मोर्चा काढला होता. हा मोर्चाआज विधानभवनावर धडकणार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2011 09:54 AM IST

वसई-विरार गाव वगळण्याप्रकरणी युतीकडून सभात्याग

18 एप्रिल

वसई विरार महापालिकेची गावं वगळण्याचा मुद्यावर विधासभेत सेना भाजपने सभात्याग केला आहे. सुभाष देसाई यांनी यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडला. त्यानंतर अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे सरकारला दिले आहेत. पण यानंतरही समाधान न झाल्याने विरोधकांनी सभा त्याग केला.

दरम्यान वसई विरार महापालिकेतून 35 गावं वगळावी असा सरकारचा निर्णय झालेला असूनही अंतिम अधिसूचना अजूनही निघालेली नाही. ही अधिसूचना तत्काळ काढावी या मागणीसाठी वसई जनआंदोलन समितीनं आता पुन्हा आंदोलन सुरू केलंय. काल या 35 गावांमधून नागरिकांनी वसई ते विधानभवन असा मोर्चा काढला होता. हा मोर्चाआज विधानभवनावर धडकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...