दहशतवाद्यांना इस्लाममधून बहिष्कृत करणार - उलेमांचा निर्णय

9 नोव्हेंबर, हैदराबाददहशतवादाला इस्लाममध्ये तीव्र विरोध आहे. त्यामुळेच हैदराबादमध्ये एकत्र आलेल्या उलेमांनी देवबंदच्या फतव्यावर सहमती देऊन दहशतवादाला गैरकृत्य जाहीर केलं. त्याचबरोबर ज्या मुस्लीम व्यक्तिला कोर्ट अतिरेकी कारवायांमध्ये दोषी ठरवेल, त्याला इस्लाममधून बाहेर काढलं जाईल, असा निर्णयही घेण्यात आला. दहशतवादावरून सुरू असलेल्या राजकारणावर चर्चेनं मार्ग काढण्यासाठी देशभरातले उलेमा प्रयत्न करत आहेत. हैदराबादमध्ये जमात-ए-उल्मा-ए-हिंदनं आयोजित केलेल्या संमेलनामध्ये दहशतवादाला थारा नसल्याचं उलेमांनी स्पष्ट केलं. दहशतवादी कारवायांना मुस्लीम समाजाशी जोडणार्‍या घटनांचं यावेळी खंडन करण्यात आलं. त्याचबरोबर जर कोणतीही मुस्लीम व्यक्ती दहशतवादी कारवायांमध्ये सापडली तर त्याला इस्लाममधून बाहेर करण्यात येईल, असं ठरवण्यात आलं.एखाद्या व्यक्तिवर जर फक्त दहशतवादाचा आरोप करण्यात आला, तर त्याच्यावर हा फतवा लागू होत नाही, असंही या संमेलनात ठरवण्यात आलं. पण जर कोर्टानं एखाद्याला दोषी ठरवलं तर मात्र त्याला इस्लामच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. यापूर्वीही काही मुस्लीम संस्थांनी अशा प्रकारचा फतवा काढला होता. पण यावेळी सर्व मुस्लीम धर्मगुरूंची मंजूरी घेतली जात आहे. येत्या दोन दिवसात या फतव्यावर सर्व मुस्लीम धर्मगुरू सही करणार आहेत.सर्व मुस्लिम धर्म गुरूंनी दहशतवादी कारवायांवर नजर ठेवावी, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. जर एखादा युवक दहशतवादाकडं झुकत असेल तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला समजावण्यात येईल. पण गंभीर परिस्थित पोलिसांना कळवण्यात यावं, असंही ठरवण्यात आलं.

  • Share this:

First published: November 9, 2008, 5:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या