पोर्तुगीज फेस्टिवलला गोव्यात विरोध

पोर्तुगीज फेस्टिवलला गोव्यात विरोध

08 नोव्हेंबर गोवा, गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या पोर्तुगीज फेस्टिवलला विरोधाचा सामना करावा लागत आहे. हा फेस्टिवल पोर्तुगीज सरकारनं 7 ते 15 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केला आहे. पोर्तुगीजांविरुद्ध लढून गोव्याला 1961 साली स्वातंत्र्य मिळालं होतं. याच पोर्तुगाल सरकारनं आयोजित केलेला फेस्टिवल हे देशविरोधी कृत्य असल्याचं गोव्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांचं म्हणणं आहे. एकीकडे गोव्यात पोर्तुगीज ग्रुप फेस्टिवलच्या रंगीत तालमीत व्यस्त होते. तर दुसरीकडे गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक याचा तीव्र विरोध करीत होते. हा आम्ही लढलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा अपमान असल्याचं स्वातंत्र्यसैनिकांच म्हणणं आहे. पोर्तुगालच्या राज्यातून गोवा 1961 साली मुक्त झाला. त्यावेळी पोर्तुगाल सैनिकांनी केलेले अनन्वित छळ गोव्याचे हे स्वातंत्र्यसैनिक विसरलेले नाहीत. गोवा मुक्तीस्वातंत्र हा इतिहासाचा एक भाग आहे . तसंच गोव्याच्या संस्कृतीवरअजूनही पोर्तुगाल संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे अशाप्रकारचे फेस्टिवल हे दोन देशांमधले संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत असं आयोजकांचं म्हणणं आहे.

  • Share this:

First published: November 8, 2008, 5:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या