हरियाणातल्या मराठी कुटुंबाला हरियाणा सोडण्याची धमकी

8 नोव्हेंबर, हरियाणामुंबईत उत्तर भारतींयांविरूध्द सुरू असलेल्या मनसेच्या आंदोलनाचे दुष्परिणाम आता इतर राज्यात दिसत आहेत. हरियाणातील कर्नाल इथं राहणार्‍या एका मराठी कुटुंबाला राज्य सोडण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे हे कुटुंब हादरून गेलं आहे. मुळचं जळगावचं असलेलं हे सूर्यवंशी कुटुंब गेल्या 15 वर्षांपासून कर्नालमध्ये राहत आहे.दोन-तीन लोकांनी या कुटुंबाला धमकावलं. बंदूक काढून ' तुम्ही महाराष्ट्रात रहाणारे आहेत, तेव्हा परत महाराष्ट्रात निघून जा ', असं त्यांना सांगितलं. ' राज ठाकरे महाराष्ट्रात जे करत आहेत, त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत, तेव्हा त्यांनी याचा विचार करावा ', अशी कळवळीची विनंती कल्पना सूर्यवंशी यांनी केली. गेली 15 वर्ष हरियाणात राहिल्यावर आम्ही हरियाणाचेच होत नाही का ? असा प्रश्नंही त्यांनी विचारला. राज ठाकरेंनी छेडलेल्या मराठी-अमराठी वादाचे पडसाद गेले काही दिवस उत्तर भारतात उमटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी गाझियाबादमध्ये एका मराठी विद्यार्थ्याला धमकावण्यात आलं होतं. पाटण्यात मराठी आयएएस अधिकार्‍याच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. दिल्लीमध्ये मधुर भांडारकर यांच्या चित्रपटाचं स्क्रिनिंग थांबवण्याचा प्रयत्न झाला होता. पण पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे एखादी घटना समोर आली आहे.या प्रश्नाबाबत शिवसेनेची भूमिका नेहमीच संयमाची राहिली आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने लढा द्यायचा प्रयत्न केला आहे. आम्ही कधीच उत्तरभारतीयांनी मुंबई सोडून जायची धमकी दिली नाही. आम्हाला या परिणामांची कल्पना होती, म्हणूनच आम्ही काळजी घेली. पण गेले काही दिवस हे आंदोलन भरकटवलं गेलं. त्याचाच हा दुष्परिणाम आहे ', असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. पण याच वेळी जर इतर राज्यातल्या मराठी माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला, तर त्यांच्या सुरक्षेची काळजी शिवसेना नक्की घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं ' जर महाराष्ट्रातल्या आंदोलनामुळे देशाची अखंडता धोक्यात येणार असेल, तर आता या प्रकारावर केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे ?, असा प्रश्न विचारत ' आता तरी सगळ्या मराठी नेत्यांनी एकत्र यावं ' अशी प्रतिक्रिया मनसे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी दिली.

  • Share this:

First published: November 8, 2008, 10:18 AM IST
Tags:

ताज्या बातम्या