राज्यात महिला अत्याचारामध्ये वाढ

राज्यात महिला अत्याचारामध्ये वाढ

22 मार्चविधिमंडळात दोन्ही सभागृहात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधानपरिषदेत हा अहवाल मांडला. बुधवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे राज्याच्या या आर्थिक पाहणीला महत्व आहे. बलात्कार, विनयभंग, मुलांवरच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचा निष्क र्ष या पाहणी अहवालात काढण्यात आला. तर दुसरीकडे, यावर्षी उद्योग क्षेत्रात 9.1 टक्क्यांची तर सेवा क्षेत्रात 10.9 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. या आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील वाईन उद्योगाचं कौतुक करण्यात आलंय. देशातील एकूण वाईन उत्पादनापैकी 87 % उत्पादन वाईनची निर्मिती महाराष्ट्रात होते. याबद्दल राज्यातल्या वाईन उद्योगाचं कौतुक करण्यात आलंय. राज्यात गुन्हेगारीत वाढ- 2009 मधील बलात्काराच्या घटना- बिहारपेक्षा महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक- महाराष्ट्राची सरासरी 6.9 % तर बिहारची 4.3 %विनयभंगाचे गुन्हे- महाराष्ट्राची सरासरी 8.3%- बिहारची टक्केवारी फक्त 1.9%- बालकांवरील अत्याचारात वाढ- 2008 मध्ये 2709 गुन्हे दाखल- 2009 मध्ये 2894 गुन्हे दाखल13 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी - 13 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सहाय्यक अनुदानांची शिफारस- 1,511 कोटी रुपये राज्याला मिळणं अपेक्षित- 2010-11 साठी मिळणार सहाय्यक अनुदान- यापैकी 8.8 कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकरिताबजेटमधील काही ठळक तरतुदी- 2010-11 मधील अर्थसंकल्पीय अंदाज- महसुली खर्च 1,04,698 कोटी अपेक्षित- 2010-11 मधील महसुली तूट 7,654 कोटी- 2010-11 मधील वित्तीय तूट 2,09,648 कोटी अपेक्षितविकासदर वाढण्याची अपेक्षा- जेडिपी (स्थूल राज्य उत्पन्न) 8.7% वरुन 10.5 % पर्यंत पोचेल- गेल्यावर्षीच्या तुलनेत जेडिपी मध्ये 16.6 % वाढअन्नधान्याचं उत्पादन - अन्नधान्याच्या उत्पादनात 22.9 % वाढ अपेक्षित- गेल्यावर्षी 125.85 लाख मेट्रीक टन होतं- यंदा 154.63 मेट्रीक टन उत्पादन अपेक्षितवाईनमध्ये अग्रेसर महाराष्ट्र- देशातील 38 वाईनरीपैकी 36 महाराष्ट्रात- देशातील वाईनचं एकूण 87 % उत्पादन महाराष्ट्रात

  • Share this:

22 मार्च

विधिमंडळात दोन्ही सभागृहात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधानपरिषदेत हा अहवाल मांडला. बुधवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे राज्याच्या या आर्थिक पाहणीला महत्व आहे. बलात्कार, विनयभंग, मुलांवरच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचा निष्क र्ष या पाहणी अहवालात काढण्यात आला.

तर दुसरीकडे, यावर्षी उद्योग क्षेत्रात 9.1 टक्क्यांची तर सेवा क्षेत्रात 10.9 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. या आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील वाईन उद्योगाचं कौतुक करण्यात आलंय. देशातील एकूण वाईन उत्पादनापैकी 87 % उत्पादन वाईनची निर्मिती महाराष्ट्रात होते. याबद्दल राज्यातल्या वाईन उद्योगाचं कौतुक करण्यात आलंय.

राज्यात गुन्हेगारीत वाढ

- 2009 मधील बलात्काराच्या घटना- बिहारपेक्षा महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक- महाराष्ट्राची सरासरी 6.9 % तर बिहारची 4.3 %

विनयभंगाचे गुन्हे

- महाराष्ट्राची सरासरी 8.3%- बिहारची टक्केवारी फक्त 1.9%- बालकांवरील अत्याचारात वाढ- 2008 मध्ये 2709 गुन्हे दाखल- 2009 मध्ये 2894 गुन्हे दाखल

13 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी

- 13 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सहाय्यक अनुदानांची शिफारस- 1,511 कोटी रुपये राज्याला मिळणं अपेक्षित- 2010-11 साठी मिळणार सहाय्यक अनुदान- यापैकी 8.8 कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता

बजेटमधील काही ठळक तरतुदी

- 2010-11 मधील अर्थसंकल्पीय अंदाज- महसुली खर्च 1,04,698 कोटी अपेक्षित- 2010-11 मधील महसुली तूट 7,654 कोटी- 2010-11 मधील वित्तीय तूट 2,09,648 कोटी अपेक्षित

विकासदर वाढण्याची अपेक्षा

- जेडिपी (स्थूल राज्य उत्पन्न) 8.7% वरुन 10.5 % पर्यंत पोचेल- गेल्यावर्षीच्या तुलनेत जेडिपी मध्ये 16.6 % वाढ

अन्नधान्याचं उत्पादन

- अन्नधान्याच्या उत्पादनात 22.9 % वाढ अपेक्षित- गेल्यावर्षी 125.85 लाख मेट्रीक टन होतं- यंदा 154.63 मेट्रीक टन उत्पादन अपेक्षित

वाईनमध्ये अग्रेसर महाराष्ट्र

- देशातील 38 वाईनरीपैकी 36 महाराष्ट्रात- देशातील वाईनचं एकूण 87 % उत्पादन महाराष्ट्रात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 06:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading