S M L

अशोक चव्हाणांची आपल्याच साखर कारखान्यासाठी झुंज

संदीप काळे, नांदेड 16 मार्चआदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. त्यातच एफआयआर मध्ये नाव आल्यामुळे चव्हाण आता काँग्रेस पक्षात एकाकी पडलेत आहेत. या परिस्थीतीत अशोकरांवापुढे आव्हान आहे ते आपला साखर कारखाना वाचवण्याचे. आता विरोधकही अखेरचा हादरा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. चव्हाणांचे आधी मुख्यमंत्रीपद गेले त्यानंतर आमदारकीची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात आलीय. एकापाठोपाठ संकट येत असतांना अशोकरावांना आता मतदार संघात दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. निमित्त आहे भाऊराव चव्हाण साखर कारखान्याची निवडणुकीचं. अशोकरावांच्या विरुध्द सर्व विरोधी पक्ष उभे ठाकले आहेत. विलासराव देशमुखांचे खंदे समर्थक माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे या निवडणुकीत सक्रीय झाले आहे. घराचे वासे फिरलेकी सगळेच हळू हळू सर्व बदलते याचा अनुभव या निवडणुकीत अशोक चव्हाणांना येतोय. त्यामुळेच ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. गेल्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेवून विजयी होणार्‍या अशोकरावांना आज आपल्याच साखर कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागते. विरोधकांची रणनिती बघता अशोकरांवाना हादरा बसल्याचं नवल वाटू नये.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 10:19 AM IST

अशोक चव्हाणांची आपल्याच साखर कारखान्यासाठी झुंज

संदीप काळे, नांदेड

16 मार्च

आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. त्यातच एफआयआर मध्ये नाव आल्यामुळे चव्हाण आता काँग्रेस पक्षात एकाकी पडलेत आहेत. या परिस्थीतीत अशोकरांवापुढे आव्हान आहे ते आपला साखर कारखाना वाचवण्याचे. आता विरोधकही अखेरचा हादरा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

चव्हाणांचे आधी मुख्यमंत्रीपद गेले त्यानंतर आमदारकीची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात आलीय. एकापाठोपाठ संकट येत असतांना अशोकरावांना आता मतदार संघात दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. निमित्त आहे भाऊराव चव्हाण साखर कारखान्याची निवडणुकीचं. अशोकरावांच्या विरुध्द सर्व विरोधी पक्ष उभे ठाकले आहेत. विलासराव देशमुखांचे खंदे समर्थक माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे या निवडणुकीत सक्रीय झाले आहे. घराचे वासे फिरलेकी सगळेच हळू हळू सर्व बदलते याचा अनुभव या निवडणुकीत अशोक चव्हाणांना येतोय. त्यामुळेच ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. गेल्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेवून विजयी होणार्‍या अशोकरावांना आज आपल्याच साखर कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागते. विरोधकांची रणनिती बघता अशोकरांवाना हादरा बसल्याचं नवल वाटू नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 10:19 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close