Article 370 : आशियातल्या मोठ्या कंपनीचा काश्मिरात हेल्मेट फॅक्टरीचा प्रस्ताव

आशियातली सर्वात मोठी कंपनी स्टीलबर्ड हाईटेक इंडिया (Steelbird Hi-tech India) ने काश्मिरात हेल्मेट बनविण्याचा कारखाना उभारण्याचा प्रस्ताव दिलाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 07:14 PM IST

Article 370 : आशियातल्या मोठ्या कंपनीचा काश्मिरात हेल्मेट फॅक्टरीचा प्रस्ताव

नवी दिल्ली 6 ऑगस्ट :  जम्मू आणि काश्मीरमधून 370 हे कलम हटविण्याची औपचारिकता पूर्ण झालेली नसतानाच आता राज्यात उद्योग उभारण्याचे प्रस्ताव येत आहेत. हेल्मेट बनविणारी आशियातली सर्वात मोठी कंपनी  स्टीलबर्ड हाईटेक इंडिया (Steelbird Hi-tech India) ने काश्मिरात हेल्मेट बनविण्याचा कारखाना उभारण्याचा प्रस्ताव दिलाय. आत्तापर्यंत काश्मिरमध्ये राज्याबाहेरची कुठलीही व्यक्ती संपत्ती विकत घेऊ शकत नव्हती. नियम 35(A) अंतर्गत काश्मिरमध्ये देशातल्या इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना जागा घेण्यास बंदी होती. 370 हे कलम निष्प्रभ झाल्यानंतर 35(A) लाही कुठलाही अर्थ राहिला नाही त्यामुळे आता उद्योग धंद्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

VIDEO : सुप्रिया सुळेंच्या शंकांवर अमित शहांनी हे दिलं उत्तर

स्टीलबर्ड हेल्मेट्स चे संचालक सुभाष कपूर यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीर आता मुख्य प्रवाहात सामील होणार आहे. सरकारच्या या प्रक्रियेत आम्हीही सहभागी होऊ इच्छतो अशी भावनाही कपूर यांनी व्यक्त केली.

कपूर यांच्याप्रमाणेच इतर अनेक उद्योग आणि व्यावसायिकही काश्मिरात उद्योग उभारण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. 370 मुळे राज्याचा विकास खुंटल्याचा आरोप वारंवार करण्यात येत होता. दोन दिवस झालेल्या राज्यसभा आणि लोकसभेतल्या चर्चेतही  गृहमंत्री अमित शहा यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता.

VIDEO : लोकसभेत असं काय बोलल्या नवनीत राणा की, अमित शहांनाही आलं हसू

Loading...

राज्यसभेनंतर मंगळवारी लोकसभेतही हे विधेयक मंजूर झालं. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या कलमाचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये आता होतील हे 10 मोठे बदल, 70 वर्षातला मोठा निर्णय

1) जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांचा दुहेरी नागरिकत्व संपणार. इतर राज्यांप्रमाणेच तेही भारताचे नागरिक होतील.

2) आता देशातल्या इतर राज्यांमध्ये नागरिक जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन आणि संपत्ती घेऊ शकतील.

3) केंद्र सरकारच्या सर्व कायद्यांची आता जम्मू आणि काश्मीरमध्ये थेट अंमलबजावणी होईल.

4) जम्मू आणि काश्मीरसाठी वेगळे कायदे करण्याची गरज राहणार नाही.

5) कलम 360 नुसार केंद्र सरकार आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकते.

Article 370 : हडबडलेल्या पाकिस्तानने भारताला दिली युद्धाची धमकी

6) आतापर्यंत राज्याचा आणि केंद्राचा असे दोन राष्ट्रध्वज होते. आता मात्र फक्त तिरंगा हा एकच ध्वज असेल.

7) देशातल्या इतर राज्यांप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता दर पाच वर्षांनी निवडणुका होती. आधी दर सहा वर्षांनी निवडणुका होत होत्या.

8) राज्यातलं पोलीस दल आता केंद्राच्या अधिकारात येईल.

9) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि काश्मीर खोऱ्यात शाखा उघडता येतील.

10) आता खोऱ्यातही हिंदू आमदार निवडून येऊ शकतील.

घटनेतलं हे कलम हटविणं हा जनसंघापासून भाजपचा अजेंडा होता. त्यामुळे आता गेली अनेक वर्ष दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचा दावा भाजप करणार आहे. स्वातंत्र्यानंतर 370 कलम काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं होतं. राज्याला देण्यात आलेल्या विशेष अधिकारामुळं राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचाही अधिकार नव्हता. देशात आर्थिक आणीबाणी लागू केली तरी ती काश्मीरमध्ये मात्र लागू होत नव्हती . भारतातील इतर राज्यांत लागू झालेले कायदेही इथं लागू करता येत नव्हते. आता हे सगळच बदलणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...