जम्मू काश्मीर मुस्लिम बहुल असल्यानेच '370' हटवलं, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद

जम्मू काश्मीर मुस्लिम बहुल असल्यानेच '370' हटवलं, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद

'जम्मू आणि काश्मीर हे हिंदू बहुल राज्य असतं तर नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचं कलम हटवलं नसतं.'

  • Share this:

चेन्नई 11 ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केलाय. मात्र काँग्रेसच्याच अनेक नेत्यांनी परस्परविरोधी वक्तव्य केल्याने पक्षात एकमत नसल्याचं उघड झालंय. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय. जम्मू आणि काश्मीर हे मुस्लिम बहुल असल्यानेच केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने हे कलम हटवलं असा गंभीर आरोप चिदंबरम यांनी केलाय. या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारची नवी योजना, स्वयंपाकाच्या तेलापासून 'अशी' चालेल तुमची कार

चेन्नईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना चिदंबरम म्हणाले, जम्मू आणि काश्मीर हे हिंदू बहुल राज्य असतं तर त्यांनी अशा प्रकारचं कलम हटवलं नसतं. त्यांना आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे त्यामुळेच त्यांनी असा निर्णय घेतल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. या निर्णयामुळे परिस्थिती तर सुधारणार नाहीच मात्र आणखी चिघळेल असंही ते म्हणाले.

चिदंबरम यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. देशात ज्या प्रकारचं जनमत निर्माण झालंय त्यावरून हा अंदाज बांधला जातोय. काँग्रेसचे नेते डॉ. करणसिंह, जनार्दन व्दिवेदी आणि युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. त्यामुळे काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचं पुढे आलं.

प्रेग्नंट तरुणीवर 11 वेळा गँगरेप, बॉयफ्रेंडसमोरच अत्याचार, त्याचीही आत्महत्या

तर काँग्रेसचे दुसरे नेते मणिशंकर अय्यर यांनीही सरकारवर टीका केलीय. सरकारने काश्मीरचं पॅलेस्टाईन केलं असा आरोपही त्यांनी केली. काँग्रेसच्या या दोन नेत्यांच्या आरोपांमुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

First published: August 12, 2019, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading